Janmashtami 2023 Decoration Ideas Sakal
लाइफस्टाइल

Janmashtami 2023 Decoration Ideas : जन्माष्टमीसाठी सुंदर व हटके पद्धतीने करा डेकोरेशन, जाणून घ्या Top 10 DIY Ideas

जन्माष्टमीच्या पूजेसाठी सुंदर व आगळेवेगळे डेकोरेशन करण्यासाठी पाहा या Top 10 DIY Ideas

Harshada Shirsekar

Janmashtami 2023 : हिंदू धर्मामध्ये कृष्ण जन्माष्टमीच्या सणाचे खास महत्त्व आहे. श्रावण वद्य अष्टमीला रात्री 12 वाजता भगवान कृष्णाचा जन्म झाला. म्हणूनच या दिवसास ‘गोकुळाष्टमी’ किंवा ‘जन्माष्टमी’ या नावाने ओळखला जातो. कृष्ण म्हणजे भगवान विष्णूचा आठवा अवतार.

यंदा ६ सप्टेंबर (बुधवार) या दिवशी जन्माष्टमीचा उत्सव साजरा केला जाणार आहे. या दिवशी भगवान कृष्णाची विधिवत पूजा करून त्यांच्या जन्माचा उत्सव जल्लोषात साजरा केला जातो. या दिवशी कृष्णाची मनोभावे पूजा केल्यास सुख, शांती, समृद्धी मिळते; असे मानले जाते. दरम्यान मंदिर तसंच घरांमध्येही जन्माष्टमीच्या पूजेनिमित्त सुंदर-सुंदर सजावट केली जाते. 

या लेखाच्या माध्यमातून आपण काही खास व सुंदर सजावटीचे प्रकार पाहणार आहोत, ज्याद्वारे तुम्हाला जन्माष्टमीच्या सजावटीसाठी नवनवीन आयडिया मिळण्यास नक्की मदत मिळू शकते.

या व्हिडीओमध्ये दाखवल्याप्रमाणे घरातील टाकाऊ गोष्टी जसे की काडेपेटी, वहीचा पुठ्ठा यासारख्या वस्तूंपासून आपण जन्माष्टमीसाठीचे सुंदर डेकोरेशन तयार करू शकता.

Video Credit Instagram @bikhre_rang

जन्माष्टमीच्या पूजेकरिता पाळणा तयार करण्यासाठी आपण दांडियांचा वापर करू शकता. दांडिया नसतील तर घरातील वापरात नसलेले पाईपचाही डेकोरेशनमध्ये समावेश करू शकता. मातीचा दिवा, रंगीबेरंगी लेस, फुले यासारख्या गोष्टींचा वापर करून आपणही सुंदर डेकोरेशन करू शकता. 

Video Credit Instagram @cozyyylilcorner

लोकर व रंगीबेरंगी मण्यांचा वापर करून बाळगोपाळसाठी हा सुंदर झोपाळा तयार करण्यात आला आहे. अगदी कमीत कमी साहित्यापासून तयार केलेली ही सुंदर सजावट आपण या व्हिडीओमध्ये पाहू शकता.

Video Credit Instagram @mydecorworld1

हे डेकोरेशन देखील आपल्याला नक्की आवडेल. ताजी फुले, पांढऱ्या रंगाच्या मण्यांची माळ, मोरपंख, आकर्षक दिवे यासारख्या साहित्यांचा वापर करून अतिशय नाजूक पद्धतीने जन्माष्टमीची सजावट केली आहे.

Video Credit Instagram @kumaoni_soul @furniblooms

विड्याची पाने, ताजी फुले, सुंदर दिवे यासारख्या वस्तूंपासून सुंदर व आकर्षक असे डेकोरेशन करण्यात आले आहे.

Video Credit Instagram @kumaoni_soul @furniblooms

कमीत कमी साहित्यापासून तयार करण्यात सुंदर व रंगीबेरंगी सजावटीचा हा उत्तम व्हिडीओ आहे. सजावटीसाठी येथे केवळ केळीचे पाने, गुलाबाच्या पाकळ्यांचा वापर करून इकोफ्रेंडली डेकोरेशन करण्यात आले आहे.

Video Credit Instagram @creative_callings

हे देखील इकोफ्रेंडली डेकोरेशन आहे. यासाठी कापड आणि रंगीबेरंगी लेसचा वापर करण्यात आला आहे.

Video Credit Instagram @neon_arts_and_crafts

घरातील टाकाऊ वस्तू तसेच कापडापासून हे सुंदर डेकोरेशन करण्यात आले आहे. आपणही घरातील वेगवेगळ्या रंगसंगतीचे कापड वापरून अशा पद्धतीने जन्माष्टमीची सजावट करू शकता.

Video Credit Instagram @thecustomisedtrunk

Video Credit Instagram @thecustomisedtrunk

Video Credit Instagram @cozyyylilcorner

आशा आहे की वरील सर्व व्हिडीओ पाहून तुम्हाला जन्माष्टमीच्या पूजेचे डेकोरेशन करण्यासाठी नक्कीच मदत मिळेल.

डिस्क्लेमर : सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. सकाळ माध्यम समूह अशा कोणत्याही गोष्टींची पुष्टी करत नाही. अधिक तपशीलांसाठी तुम्ही तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेऊ शकता.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mahayuti Manifesto: महायुतीकडून कोल्हापूरच्या प्रचार सभेत वचननामा जाहीर; जनतेला दिली ‘ही’ १० आश्वासनं

Sharada Sinha: बिहारच्या गानकोकिळा शारदा सिन्हा यांचं निधन! दिल्लीच्या एम्समध्ये घेतला शेवटचा श्वास

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींसाठी मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा, महिन्याला मिळणार 2100 रुपये

Latest Marathi News Updates : देश-विदेशात दिवसभरात काय घडलं? वाचा एका क्लिकवर

Porsche Car Accident : रक्ताचे नमुने बदलण्यास सांगणाऱ्याचा अटकपूर्व जामीन सर्वोच्च न्यायालयानेही फेटाळला

SCROLL FOR NEXT