kshiti jog and mugdha karnik sakal
लाइफस्टाइल

मैत्रीचा घट्ट धागा

कधीकधी एखाद्या व्यक्तीशी आपली मैत्री इतकी घट्ट होऊन जाते, की ती व्यक्ती आपल्या कुटुंबाचा एक भाग बनते! मराठी चित्रपटसृष्टीतील अशाच दोन मैत्रिणी म्हणजे अभिनेत्री क्षिती जोग आणि अभिनेत्री मुग्धा कर्णिक.

सकाळ वृत्तसेवा

- क्षिती जोग / मुग्धा कर्णिक

कधीकधी एखाद्या व्यक्तीशी आपली मैत्री इतकी घट्ट होऊन जाते, की ती व्यक्ती आपल्या कुटुंबाचा एक भाग बनते! मराठी चित्रपटसृष्टीतील अशाच दोन मैत्रिणी म्हणजे अभिनेत्री क्षिती जोग आणि अभिनेत्री मुग्धा कर्णिक. या दोघींची पहिली भेट रुईया नाट्यवलयामध्ये एका इंग्लिश नाटकादरम्यान झाली. क्षिती आणि मुग्धा रुईया कॉलेजमध्येच शिकत होत्या. तिथे क्षिती मुग्धाला दोन वर्षांनी सीनियर होती.

क्षिती म्हणाली, ‘आम्ही नाटकाच्या ग्रुपमध्ये बराच काळ एकत्र होतो आणि अवघ्या सहा महिन्यांतच आम्ही अगदी जवळच्या मैत्रिणी झालो. आता आमच्या फॅमिलीजसुद्धा एकमेकांना ओळखतात, इथपर्यंत आम्ही घट्ट मैत्रिणी झालो. कॉलेजमधील नाटकाच्या तालमीदरम्यान सुरू झालेली मैत्री गेली २३ वर्षे कायम आहे.’

मुग्धा म्हणाली, ‘मी क्षितीला पहिल्यांदा भेटले, तेव्हा ती ऑलरेडी ‘दामिनी’ ही मराठी मालिका करत होती. तिला प्रत्यक्षात भेटण्याआधीपासूनच मी तिचं काम पहिलं होतं. त्यामुळे मला तिच्या कामाबद्दल नेहमीच उत्सुकता असायची. आमची ओळख झाली, तेव्हा मला समजलं, की क्षिती एक व्यक्ती म्हणून खूप चांगली आहे.

तिला माहिती आहे तिला करायचं आहे ते. ती ते करतेच आणि समोरच्याकडूनही ती ते करवून घेते, हा तिचा स्वभाव मला जास्त भावला. तिनं मला नेहमीच प्रोटेक्ट केलं आहे, असं मी नक्कीच म्हणीन. आजही मला कोणत्या कामात काही अडचण आली, किंवा कोणत्याही मदतीची गरज असेल, तर माझ्या पहिला कॉल क्षितीलाच जातो.

कारण मला माहिती असतं, की क्षिती मला नक्कीच मदत करेल. ती माझ्यासाठी आणि फक्त माझ्यासाठीच नव्हे, तर जी जी माणसं तिच्या आयुष्यात आहेत, त्या सगळ्यांसाठी ती नेहमीच असते.’

क्षिती सांगत होती, ‘मुग्धा स्वभावानं खूप शांत आहे. म्हणजे आम्ही एकत्र असतो तेव्हा मज्जा मस्ती करते ती; पण ती मुळातच खूप शांत आहे. तिचं नेचर प्रचंड हेल्पफुल आहे. गरज असते, तिथं मदत करायला ती नेहमीच हजर असते. तिचा मला आवडणारा गुण म्हणजे ती खूप चांगली लिसनर आहे. तिला पटत नसलं, तरी ती तुमचा मुद्दा खूप शांतपणे ऐकून घेऊ शकते. ती मनातल्या गोष्टी पटकन नाही बोलत, मनातच ठेवते आणि याबाबतीत मी तिच्याविरुद्ध आहे.

मी मनात येतं ते पटकन बोलून टाकते. एखादी गोष्ट पटली नाही तर मी स्पष्ट बोलते; पण मुग्धा ते बोलायला वेळ घेते. समोरच्याला काय वाटेल, हा विचार करून ती वागत असते, जे मला बऱ्याचदा नाही पटत. तिनं स्पष्ट बोललं पाहिजे, कारण मनातल्या गोष्टी मनात ठेवल्यानं याचा तिलाच त्रास होतो. अभिनेत्री म्हणून ती प्रचंड हार्डवर्किंग आहे आणि मला तिचा प्रचंड अभिमान आहे.’

मुग्धानं सांगितलं, ‘मी तिच्याकडून एक कलाकार म्हणून आणि एक व्यक्ती म्हणूनही अनेक गोष्टी शिकले. मुख्य म्हणजे वक्तशीरपणा. वेळ पाळणं, हा माझ्या स्वभावाचा आधीपासून एक भाग होताच; पण एक ॲक्टर म्हणून त्याचं महत्त्व किती आहे हे मला तिनं सांगितलं. ती मला नेहमी म्हणते, मुग्धा तुला दिलेल्या कॉल टाइमला सेटवर पोचलंच पाहिजे. मग शूट कधीही असूदेत; पण दिलेला कॉल टाइम पाळलाच पाहिजे. क्षिती स्पष्टवक्ती आहे.

जे वाटतं ते ती बिनधास्तपणे बोलते. यामुळे ती कोणाला कठोर वाटू शकते; पण जी माणसं तिला ओळखतात त्यांना माहितीये ती कशी आहे. तिचा फक्त हा गुण माझ्याविरुद्ध आहे. बाकी आमचे सगळे विचार अगदी तंतोतंत जुळतात. आम्ही बऱ्याचदा एका विषयावर सेम बोलतो. आमची विचारधारा बऱ्यापैकी सारखी आहे.’

(शब्दांकन - मयूरी गावडे)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Dhan Rate: हंगामाच्या सुरुवातीलाच धान पिकाला विक्रमी दर; ‘ए’ ग्रेड’ला 2700 रुपयांचा दर

Ajit Pawar : ‘सहा महिन्यांत शेतकऱ्यांना दिवसाही होणार वीजपुरवठा’

Maharashtra Election: मतदारांना भुलवण्यासाठी गैरप्रकारांचा सुळसुळाट! आचारसंहिता भंगाच्या ६ हजारापेक्षा अधिक तक्रारी

Latest Maharashtra News Updates : देश-विदेशात दिवसभरात काय घडलं? जाणून घ्या एका क्लिकवर

Ultraman Dashrath Jadhav : डोर्लेवाडीतील लोहपुरुष ठरला ‘अल्ट्रामॅन’चा मानकरी; दशरथ जाधव यांनी वयाच्या ६६ व्या वर्षी जिंकली अत्यंत खडतर स्पर्धा

SCROLL FOR NEXT