Law for Lovers : अविवाहित आणि प्रेमीयुगुलांना अनेकदा अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत असल्याचे दिसून आले आहे.
Also read- Love Jihad: प्रेमाला धर्म आहे...?
अनेकवेळा तुम्ही चित्रपटांमध्येही पाहिलं असेल की, अविवाहित जोडप्यांना हॉटेल्स किंवा पार्क्समध्ये छापे टाकून त्रास दिला जातो. हे केवळ चित्रपटातच नाही तर वास्तवातही घडते. मात्र, अविवाहित जोडप्यांनाही भारतात अनेक अधिकार मिळाले आहेत.
सर्व अविवाहित जोडप्यांना या अधिकारांबद्दल माहिती असणे आवश्यक आहे. आज आम्ही अविवाहित जोडपे आणि प्रमीयुगुलांसाठी भारतात अस्तित्त्वात असलेल्या कायद्यांबद्दल माहिती सांगणार आहोत.
1. लिव्ह-इन रिलेशनशिप कायदा : या कायद्यानुसार कोणतेही जोडपे लग्न न करता एकत्र राहू शकतात. न्यायालयाच्या नियमानुसार लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहणाऱ्या कपलमध्ये मुलाचे वय 21 वर्षांपेक्षा जास्त आणि मुलीचे वय 18 वर्षांपेक्षा जास्त असणे आवश्यक आहे. याशिवाय दोघांची इच्छा असेल तर ते शारीरिक संबंध देखील ठेवू शकतात.
2006 मध्ये सर्वोच्च न्यायालयाने एका खटल्याचा निकाल देताना म्हटले होते की, प्रौढ झाल्यानंतर कोणतीही व्यक्ती त्याला हव्या असलेल्या व्यक्तीसोबत राहण्यास आणि लग्न करण्यास स्वतंत्र आहे. मात्र, न्यायालय विवाहित जोडप्याप्रमाणे लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये असलेल्या जोडप्यालाही दंड करू शकते. उदाहरणार्थ, घटस्फोटानंतर पती पत्नीला पोटगी देण्याचा कायदा आहे.
2. हॉटेलमध्ये राहण्याचे नियम : अविवाहित जोडप्यांनाही हॉटेलमध्ये राहण्याचा अधिकार आहे. भारतीय कायद्यानुसार प्रौढ जोडपे कोणत्याही हॉटेलमध्ये राहू शकतात. यासाठी जोडप्यांना हॉटेलमध्ये रूम घेण्यासाठी ओळखपत्र किंवा ग्राह्य असलेले कोणतेही कागदपत्र दाखवावे लागेल.
3. सार्वजनिक ठिकाणी बसण्याचे नियम : विवाहित जोडप्यांप्रमाणेच अविवाहित जोडपेदेखील सार्वजनिक ठिकाणी बसू शकतात. सार्वजनिक ठिकाणी अश्लील कृत्य करण्यास मनाई आहे.
जर कोणी सार्वजनिक ठिकाणी अश्लील कृत्य केले तर, त्याला कलम 294 अंतर्गत 3 महिन्यांची शिक्षा होऊ शकते. पण जर एखादे जोडपे सार्वजनिक ठिकाणी बसून बोलत असेल तर त्यांना अटक करण्याचा कोणताही कायदा नाही.
4. अपशब्ध विरोधातील कायदा : लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये अनेकदा मुलींना त्रास दिल्याचे प्रकार समोर येतात. अशा परिस्थितीत मुलगी महिला सुरक्षा कायदा 2005 अंतर्गत संरक्षणाची मागणी करू शकते.
5. शारीरिक संबंधांसाठीचे नियम : भारतीय राज्यघटनेच्या कलम 21 अंतर्गत सर्व नागरिकांना गोपनीयतेचा अधिकार देण्यात आला आहे. कोणतेही प्रौढ जोडपे खाजगी ठिकाणी शारीरिक संबंध निर्माण करू शकतात. सुप्रीम कोर्टाने दोन प्रकरणांमध्ये दिलेल्या निकालांमध्ये याच मुद्द्याचा पुनरुच्चार केला आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.