Lemon For Glowing Skin : सध्या मान्सून दाखल झाला आहे आणि तेलकट चेहरा असणाऱ्यांना काळजी लागते ती चेहऱ्यावर पुरळ उटण्यासारख्या समस्येपासून बचावाची. मग सुरू होतात क्रीमसह अन्य सौंदर्यप्रसाधनं वापरण्याचे प्रयोग; मात्र या वस्तू केमिकलयुक्त असल्याने त्वचेचं नुकसानच अधिक करतात.
त्याचा वाईट प्रभावही अधिक काळ राहतो. त्यामुळे तेलकट चेहऱ्यावर घरगुती उपाय खूप उपयोगी ठरणारे आहेत. हे उपाय घरच्या घरी करता येतीलच. शिवाय तेलकट चेहरा नैसर्गिकरीत्या उजळेलं. पावसाळ्यात त्वचेशी संबंधित समस्या वाढतात. या ऋतूमध्ये चेहऱ्यावर भरपूर तेल असते, त्यामुळे जर तुम्हीही तेलकट त्वचेमुळे त्रस्त असाल तर आम्ही तुम्हाला यासाठी लिंबाचा वापर सांगणार आहोत.
चेहऱ्यावर लिंबाचा वापर केल्याने तुम्हाला झटपट चमक येईल आणि चेहऱ्यावरील डागही दूर होतील. व्हिटॅमिन सी समृद्ध लिंबू देखील कोलेजन प्रोटीन तयार करण्यास मदत करते. त्वचेवर लिंबू कसे लावायचे ते जाणून घेऊया.(Lemon For Glowing Skin : Use lemon for instant glow on the face, know the right way to apply it)
चेहऱ्यावरील ब्लॅकहेड्स दूर करण्यासाठी आणि तेल घालवण्यासाठी लिंबाच्या रसामध्ये साखर घालून स्क्रब तयार करा. यासाठी 1 लिंबाच्या रसात 1 चमचे साखर मिसळा आणि या मिश्रणाने चेहरा स्क्रब करा. लिंबू आणि साखरेचा स्क्रब तेलकट त्वचेची समस्या संपवेल आणि तुमचा चेहरा सुधारेल.
१ लिंबाच्या रसात १ चमचा मध मिसळून चेहऱ्यावर लावल्याने चेहरा उजळतो. यासाठी दोन्ही एकत्र करून पेस्ट बनवा आणि या पेस्टने चेहऱ्याला ५ मिनिटे मसाज करा. हलक्या हातांनी केलेल्या या मसाजमुळे चमक येईल. लिंबू आणि मधाच्या या मिश्रणामुळे चेहऱ्यावरील डाग कमी होतात. (Monsoon Care Tips)
तांदळाच्या पिठात लिंबू मिसळून लावल्याने चेहरा घट्ट होतो. यासोबतच डाग कमी होतील आणि चेहऱ्यावर ग्लोही येईल. लिंबू आणि तांदळाच्या पिठाचा पॅक बनवण्यासाठी 2 चमचे तांदळाचे पीठ घ्या आणि त्यात 1 लिंबाचा रस घाला, आवश्यक असल्यास आपण त्यात थोडे पाणी देखील घालू शकता. हा पॅक चेहऱ्यावर 10 ते 15 मिनिटे लावून ठेवा आणि नंतर स्वच्छ पाण्याने धुवा.
पावसाळ्यात शरीरातली ऊर्जा कमी होऊ लागते आणि त्यामुळे लवकर थकवा येतो. त्याचा परिणाम चेहऱ्यावरही दिसतो, चेहरा अधिक तेलकट दिसतो. त्यामुळे शरीराला हायड्रेटेड ठेवण्यासाठी भरपूर पाणी प्यावं. दिवसभरात 2 ते 3 लिटर पाणी पिणं आवश्यक आहे. शिवाय आहारात रसाळ फळं, भाज्यांचा समावेश करावा.(Monsoon)
तेलकट चेहऱ्याला नियमित टच अप्सची आवश्यकता असते आणि ब्लॉटिंग पेपर हे काम चांगलं करतात. या कागदाच्या छोट्या पट्ट्या मेकअप खराब न करता चेहऱ्यावरचं तेल शोषून घेतात. तेलकट त्वचेसाठी ब्लॉटिंग पेपर सोबत ठेवावा.
मॉइश्चरायझरमुळे चेहरा हायड्रेट करण्यासास मदत होते. त्वचा मॉइश्चरायझरचा ओलावा शोषून घेते आणि दीर्घ काळ निरोगी राहते. सेलिसिलिक अॅसिड, टी ट्री ऑइल, कोरफड, हायलुरोनिक अॅसिड यांसारख्या मॉइश्चरायइरचा वापर करता येईल. (Skin Care)
कोरड्या त्वचेसाठी मान्सूनमध्येही सनस्क्रीन वापरता येईल. त्यासाठी जेलयुक्त आणि लाइटवेट सनस्क्रीन उपयुक्त ठरणारं आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.