धोके दुपारी झोपण्याचे Esakal
लाइफस्टाइल

Afternoon Sleep तुमच्या जीवावर बेतू शकते, दुपारच्या झोपेमुळे बिघडतं हृदयाचं आरोग्य

दुपारच्या एका डुलकीमुळे Afternoon Nap तुम्हाला विश्रांती मिळाल्यानी खूप ऊर्जा मिळते. मात्र तुम्ही दुपारी किती वेळ झोपताय यावर त्याचा तुमच्या आरोग्यावर Health परिणाम होत असतो

Kirti Wadkar

दुपारी जेवल्यानंतर झोपण्याचा Sleep मोह अनेकांना आवरत नाही. सगळी कामं उरकून दुपारी कधी एकदा झोपी जातोय असं अनेकांना वाटतं. खास करून गृहिणींमध्ये Housewives हे प्रमाण जास्त पाहायला मिळतं. Lifestyle Tips Marathi Afternoon long sleep not good for health

दुपारपर्यंत घरातील सर्व काम उरकल्यानंतर अनेक गृहिणी दुपारच्या वेळेला थोडी विश्रांती Rest घेतात. त्याशिवाय इतर अनेकजण खास करून सुट्टीच्या दिवशी Holiday दुपारी छान झोप घ्यायचं खास प्लॅनिंगही करतात.

खरं तर दुपारच्या एका डुलकीमुळे Afternnoon Nap तुम्हाला विश्रांती मिळाल्यानी खूप ऊर्जा मिळते. मात्र तुम्ही दुपारी किती वेळ झोपताय यावर त्याचा तुमच्या आरोग्यावर Health परिणाम होत असतो. दुपारची जास्त झोप तुमच्य आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकते.

दुपारी साधारण ३०-४५ मिनिटं म्हणजेच अर्धा ते पाऊण तासांची झोप घेणं योग्य आहे. तुम्ही दररोज देखील दुपारी अर्धा पाऊण तास झोपू शकता. यामुळे तुम्हाला रिफ्रेश वाटेल आणि एनर्जी वाढले. मात्र जर तुम्ही दुपारी १-२ तास झोपत असाल तर त्याचा परिणाम तुमच्या हृदयावर आणि रक्तदाबावर होऊ शकतो. दुपारी जास्त तास झोपल्याने त्याचे आरोग्यावर आणि हृदयावर काय परिणाम होतात ते जाणून घेऊयात.

दिवसाची झोप आणि रक्तदाब यांचा जवळचा संबंध आहे. दिवसा जास्त वेळ झोपल्याने रक्तदाबही वाढू शकतो. यामुळे स्ट्रोकची शक्यता वाढते. दुपारी जास्त वेळ झोपल्याने त्याचा परिणाम हृदयाच्या कार्यावर होतो.

हे देखिल वाचा-

अर्ध्या तासापेक्षा जास्त वेळ दुपारी झोपल्यास मधुमेहाचा धोका बळावतो. दुपारी जेवल्यानंतर आपलं शरीर इन्श्युलिन निर्माण करू लागतं अशात दुपारी झोपून रहिल्यामुळे डाबबेटीस होण्याची शक्यता वाढते.

तसंच दुपारी जास्त काळ झोपल्याने पचक्रियेवर परिणाम होतो. जेवलेल्या जेवणाचं योग्य पचन होत नाही यामुळे गॅस, अपचन अशा समस्या निर्माण होऊ शकतात.

दुपारी जास्त वेळ झोपल्याने शरीरामध्ये चरबी वाढून वजन वाढण्याची शक्यता जास्त असते.

दिवसा किंवा दुपारी ३० मिनिटांसाठी झोपल्याने काम करण्याची क्षमता वाढते मात्र दुपारी ६० मिनिटांहून अधिक झोपल्याने हृदयावर परिणाम होवून मृत्यूचा धोका ओढावत असल्याचं एका संशोधनातून समोर आलं आहे.

दिवसा कोण जास्त झोपू शकतं

दुपारी किंवा दिवसभरात कधीही लहान मुलं तसचं वयोवृद्ध म्हणजेच ज्यांचं वय ७० वर्षांहून जास्त आहे, असे एक तासांहून जास्त वेळही झोपू शकतात. त्याचसोबत एखादी आजारी व्यक्ती दुपारी १ तासांहून जास्त वेळ झोपू शकते. अनेकदा औषधांचा परिणाम म्हणून आजारी व्यक्तीला दिवसा जास्त वेळ झोप येऊ शकते.

हे धोके टाळण्यासाठी झोपेचं योग्य वेळापत्रक ठरवणं गरजेचं आहे. यासाठी रात्री पुरेशी झोप घेणं आरोग्यासाठी कधीही फायदेशीर ठरतं. जेणे करून दुपारी केवळ अर्धा ते पाऊण तासाची झोप पुरेशी ठरू शकते आणि इतर धोके कमी होतात.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: निकालाचे कौल मानण्यास संजय राऊतांचा नकार

IND vs AUS: 'मी तुझ्यापेक्षा फास्ट बॉलिंग करतो...', मिचेल स्टार्कची हर्षित राणाविरुद्ध स्लेजिंग; पाहा Video

Maharashtra Assembly Election 2024 : शिवसेना अन् राष्ट्रवादी नक्की कुणाची? निवडणूक आयोग, विधानसभा अध्यक्षानंतर आता जनतेचा फैसला

Election Results 2024: खरी राष्ट्रवादी कुणाची आज महाराष्ट्र ठरवणार! आतापर्यंतच्या आकडेवारीनुसार शरद कोण आघाडीवर?

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: मनसेला बसणार धक्का? एकमेव आमदार राजू पाटील पिछाडीवर

SCROLL FOR NEXT