लिफ्टमध्ये अडकून बसण्याचे प्रकार अनेकदा घडत असतात. अशावेळी लोक घाबरतात आणि त्यांना काय करावं हे सुचत नाही. काही ठिकाणी लिफ्टमध्ये अडकल्याने लोकांचा जीवही गेला आहे. त्यामुळे अशा वेळी काय करावं, काय करू नये हे जाणून घ्या.
सर्वात आधी तर ही गोष्ट लक्षात घ्या की इतर इलेक्ट्रिक डिव्हाईसप्रमाणे लिफ्टही खराब होऊ शकते. त्यामुळे लिफ्टची योग्य काळजी घेणं आवश्यक आहे. तसंच वेळोवेळी दुरुस्तीही करावी लागते.
घाबरू नका
तुम्ही जर लिफ्टमध्ये अडकलात तर घाबरून जाऊ नका. शांत राहा आणि परिस्थिती समजून घ्या. लिफ्टमध्ये एक इमर्जन्सी बटन असतं. लगेचच ते बटण दाबा. त्यामुळे यंत्रणेला अलर्ट जाईल आणि कोणीतरी तुमच्या मदतीला येऊ शकेल.
अनावश्यक बटणं दाबू नका
लिफ्टमध्ये अडकले असाल तर वारंवार बटणं दाबू नका. त्यामुळे मशीनच्या सॉफ्टवेअरमध्ये गडबड होऊ शकते आणि तुम्हाला मदत कऱण्यात अडथळा येऊ शकतो. त्यामुळे लिफ्ट वर खाली जाण्याऐवजी मध्येच अडकून पडेल.
लिफ्टमधला फोन वापरा
अनेक लिफ्ट्मध्ये फोन असतो. हा फोन थेट सिक्युरिटी गार्डला जातो, किंवा लिफ्टच्या मेन्टेनन्स स्टाफला जातो. त्यामुळे जर तुम्ही लिफ्टमध्ये अडकला असाल तर न घाबरता फोन करा आणि मदत मागा.
दार उघडण्याचा प्रयत्न करू नका
जोवर आपल्या मदतीला कोणीही येत नाही, तोवर परस्पर दार उघ़ण्याचा प्रयत्न करू नका. शांत राहा आणि दाराशी कोणतीही छेडछाड करू नका. यामुळे लिफ्टचं दार तर उघडणार नाहीच पण तुम्ही थकाल आणि तुमचा रक्तदाब वाढेल. त्यामुळे हृदयविकाराचा झटका येण्याचीही शक्यता आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.