Lip Care Mask : आपल्या चेहऱ्याचे सौंदर्य टिकवून ठेवण्याचे काम ओठ करतात. पण कधी कधी ओठांचा रंग काळा होऊ लागतो. काळ्या ओठांमुळे चेहऱ्याचे सौंदर्य कमी होऊ लागतो.बाजारात उपलब्ध हजारो लिप बाम वापरले असतील. पण यानंतरही जर तुमच्या ओठांचा रंग बदलला नाही आणि ते काळे होत आहेत.तर घरगुती उपाय अवलंबवून काळ्या ओठांना गुलाबी करू शकता.
कमी दर्जाची लिपस्टिक वापरूनही अनेक वेळा आपल्या ओठांचा रंग काळा होऊ लागतो. त्याचबरोबर शरीरातील लोहाचे प्रमाण वाढल्यानंतरही ओठांचा रंग बदलू लागतो. म्हणूनच तुम्ही तुमच्या खाण्यापिण्याची विशेष काळजी घेतली पाहिजे. त्वचेवर पडणाऱ्या सूर्याच्या हानिकारक किरणांमुळे शरीरात अधिक मेलेनिन तयार होऊ लागते.
ज्यामुळे हायपरपिग्मेंटेशनची समस्या उद्भवू शकते. धूम्रपानामुळेही ओठ काळे पडतात. अशा परिस्थितीत, जर तुम्हाला तुमचे ओठ नेहमी गुलाबी राहायचे असतील. त्यामुळे धुम्रपानापासून दूर राहावे. याशिवाय हार्मोन्सच्या चढउतारामुळे ओठांचा रंगही बदलू लागतो.
आज आपण ओठांसाठी बेसनच्या पिठाचा वापर करणार आहोत. बेसन म्हणजे हरभऱ्याच्या डाळीचे पिठ होय. हे पिठ चेहऱ्याचा रंगही उजळते त्यामुळे ओठांसाठीही ते महत्त्वाची भुमिका बजावेल.
बेसनमध्ये असे अनेक गुणधर्म आढळतात जे तुमच्या त्वचेच्या अनेक समस्या दूर करण्यात मदत करतात. म्हणूनच प्राचीन काळापासून त्वचेच्या काळजीमध्ये बेसनाचा समावेश केला गेला आहे. बेसन तुमच्या त्वचेवरील मृत त्वचा काढून टाकण्यासाठी उपयुक्त आहे. म्हणूनच आज आम्ही तुमच्यासाठी बेसनाचा लिप लाइटनिंग मास्क घेऊन आलो आहोत.
बेसन तुमच्या ओठांवरचे टॅनिंग सहज काढून टाकते. साधारणपणे अनेक लोकांचे वरचे ओठ खूप गडद दिसतात. आज आम्ही तुमच्यासाठी बेसनाचा लिप लाइटनिंग मास्क घेऊन आलो आहोत. बेसन तुमच्या ओठांवरचे टॅनिंग सहज काढून टाकते. हा मास्क तुमच्या वरच्या ओठांचा काळेपणा दूर करण्यासाठी उपयुक्त ठरतो.
बेसनाचा लिप लाइटनिंग मास्क बनवण्यासाठी लागणारे साहित्य-
बेसन दोन चमचे
आवश्यकतेनुसार दूध
एक चिमूटभर हळद
बेसनाचा लिप लाइटनिंग मास्क कसा बनवायचा?
बेसनाचा लिप लाइटनिंग मास्क बनवण्यासाठी सर्वप्रथम एक वाडगा घ्या.
नंतर त्यात बेसन, दूध आणि हळद घालून मिक्स करा.
यानंतर, ते चांगले मिसळा आणि घट्ट पेस्ट बनवा.
आता तुमचा बेसनाचा लिप लाइटनिंग मास्क तयार आहे.
त्यानंतर तयार केलेला लिप बाम तुमच्या ओठांवर व्यवस्थित लावा.
यानंतर तुम्ही ते पूर्णपणे कोरडे होण्यासाठी सोडा.
त्यानंतर तुम्ही सामान्य पाण्याने ओठ धुवून स्वच्छ करा
लिप्स मास्क ही वापरून पहा
हिवाळ्यात ओठांना मुलायम ठेवण्यासाठी स्क्रब केल्यानंतर लिप मास्क लावा. त्यासाठी अर्धा चमचा गुलाबाच्या पाकळ्या आणि 3 ते 4 थेंब दूध घ्या.
पद्धत
गुलाबाच्या पाकळ्यांची पेस्ट तयार करा आणि त्यात काही थेंब दूध घाला. नंतर ही पेस्ट ओठांवर लावा आणि 10 मिनिटे राहू द्या. त्यानंतर पाण्याने ओठ धुवा.
लिप स्क्रब...
त्यासाठी अर्धा चमचा मध आणि अर्धा टीस्पून कॉफी लागेल
पद्धत
मध आणि कॉफी नीट मिसळून घ्या. त्यानंतर 2 मिनिटे ओठ स्क्रब करुन साध्या पाण्याने ओठ स्वच्छ करा.
ओठांची काळजी कशी घ्याल ?
आठवड्यातून एकदा ओठ एक्सफोलिएट करा. यासाठी मध आणि साखर वापरू शकता.
ओठांसाठी लिप मास्क वापरा. बाजारात लिप मास्क मिळतील.
ओठ कोरडे होऊ नयेत यासाठी तुम्ही लिप बाम किंवा मलाई इत्यादी वापरू शकता.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.