Lipstick Craze: चेहऱ्याच्या मेकअपमधील सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे लिपस्टिक. पेहराव व चेहऱ्याच्या मेकअपला साजेशी लिपस्टिकची शेड ही आजकालच्या तरुणींसह वर्किंग वूमनमध्येही आवडीची झाली आहे.
सण असो व लग्न किंवा दररोज कॉलेज, ऑफिसला जाणाऱ्या मुली आणि महिला लिपस्टिक लावायला विसरत नाहीत. सुंदर आणि आकर्षक दिसण्यास लिपस्टिक वापर होतो. लिपस्टिक म्हणजे मेकअप किटमधील सर्वात महत्त्वाची वस्तू आहे.
लिपस्टिक ओठांना रंग आणि आकार देऊन अधिकाधिक आकर्षक बनवते. विविध रंग आणि प्रकारांमध्ये लिपस्टिक बाजारात उपलब्ध आहे. त्यामुळे मुली आपल्या त्वचेच्या टोन व आवडीनुसार लिपस्टिक निवडतात.
मीडिया आणि जाहिरातींमध्ये लिपस्टिकचा मोठ्या प्रमाणावर वापर केला जातो. प्रसिद्ध महिला आणि मॉडेल्स लिपस्टिक घालून दाखवल्या जातात. ज्यामुळे मुलींनाही ते वापरण्याची इच्छा निर्माण होते. लिपस्टिकमुळे लुक उठून दिसतो. अगदी थोडासा लिपस्टिक लावायला लागतो आणि मुलीनंमध्ये आत्मविश्वास भरतो. जेव्हा त्या चांगल्या दिसतात आणि चांगल्या वाटतात, तेव्हा त्यांना आयुष्यात अधिक चांगले करता येईल असे वाटते. त्यामुळे ध्येय गाठण्यासाठी आणि आव्हानांना सामोरे जाण्याची हिंमत मिळते.
१. क्रीम लिपस्टिक : हे सर्वात सामान्य प्रकारचे लिपस्टिक आहे. ते मऊ, क्रिमी असते आणि ओठांवर सहजपणे उठून दिसते.
२. मॅट लिपस्टिक : मॅट लिपस्टिकमध्ये क्रीम लिपस्टिकपेक्षा कमी चमक असते. जास्त काळ टिकून राहतात.
३. सॅटिन लिपस्टिक : सॅटिन लिपस्टिकमध्ये क्रीम आणि मॅट लिपस्टिकमधील समान फिनिशिंग आहे. ओठांना नैसर्गिक, चमकदार फिनिश देते. चांगले टिकून राहते.
४. लिक्विड लिपस्टिक : लिक्विड लिपस्टिक हे द्रव रूपात असते. ओठांवर अत्यंत तीव्र रंग प्रदान करते.
५. ग्लॉस लिपस्टिक : ग्लॉस लिपस्टिक ओठांना चमकदार बनवते.
अनेकदा बाहेर फिरताना किंवा बाहेरगावी जाताना रस्त्यावरील धुळीचा त्रास सहन करावा लागतो. या धुळीमुळे ओठही खराब होतात. मात्र लिपस्टिक लावल्यामुळे धूळीचा त्रास ओठांना होत नाही. ओठ उललेले असतील तर ते बरे करण्यासाठीही विविध प्रकारचे लिपस्टिक बाजारात उपलब्ध आहेत.
लिपस्टिक ही सर्व मुलींची आवडीची वस्तू आहे. वेगवेगळ्या प्रकारचे लिपस्टिक बाजारात आले असून सुगंध, रंग, टेक्श्चर, आपल्याला प्रेमात पाडण्यास भाग पाडते. कोणत्याही ब्रँडचे लिपस्टिक चांगले असेल तर ते दीर्घकाळ टिकते. चेहऱ्याचा मेकअप लिपस्टिकमुळे खुलून दिसण्यास मदत होते.
दैनंदिन जीवनात वर्किंग वूमनची धावपळ होतेच. या धावपळीच्या जीवनात स्वतःला परफेक्ट दिसण्यासाठी आपल्याला थोडाफार तरी मेकअप करावाच लागतो. लिपस्टिक लावल्याने आपल्या चेहरा उठून दिसतो. चेहऱ्याचा लुक सुंदर दिसतो. लिपस्टिकमुळे ओठांचे सौंदर्य जरी वाढत असले तरी सतत वापरल्याने आपले ओठ काळे पडतात. लिपस्टिकमध्ये केमिकलचे घटक असतात यामुळे पाणी पिताना व काही खाताना योग्य ती काळजी देखील घेतली पाहिजे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.