Godhadi Production sakal
लाइफस्टाइल

आर्थिक ‘उब’ देणारी ‘गोधडी’

लॉकडाऊन सुरू असताना महिलांना घरबसल्या काहीतरी काम हवं होतं, जेणेकरून त्या घरी हातभार लावू शकतील किंवा त्यांनी केलेल्या कामाचं समाधान त्यांना मिळेल.

सकाळ वृत्तसेवा

- स्मिता खामकर, ‘गोधडी’, संस्कार शिदोरी मंच संस्थापक अध्यक्ष

लॉकडाऊन सुरू असताना महिलांना घरबसल्या काहीतरी काम हवं होतं, जेणेकरून त्या घरी हातभार लावू शकतील किंवा त्यांनी केलेल्या कामाचं समाधान त्यांना मिळेल. या उद्देशानं गोधडी तयार करण्याचं प्रशिक्षण स्त्रियांना द्यायला मी सुरुवात केली. त्यासाठी लागणारं सर्व साहित्य कापड, धागे, अस्तर आमच्या इथून पुरवलं जात होतं.

कशा प्रकारे विविध कौशल्य वापरून पारंपरिक गोधडी शिवता येईल, हे त्यांच्याकडून करून घेतलं. गोधडी नावाचा उपक्रम सुरू केला आणि यातूनच हा व्यवसाय नावारूपाला आला. यातूनच संस्कार शिदोरी मंच सुरू झाला. आठ मार्च २०२१ मध्ये सुरुवातीला यामध्ये २० महिला होत्या.

माझे सर्व शिक्षण होम सायन्समधून झालं असल्यानं मला कलाकृतींबाबत आधीपासूनच आवड होती त्यामधूनच मी स्त्रियांना गोधडीचं प्रशिक्षण द्यायला सुरुवात केली. या अंतर्गत ‘गोधडी’ नावाचा ब्रँड सुरू झाला. या ब्रँडमध्ये शंभर रुपयांपासून ते साडेतीन हजारपर्यंतच्या अनेक वस्तू आहेत. बटवे, दुपटे, लहान मुलांच्या छोट्या गोधड्या, दुपट्टे आदींचा समावेश त्यात आहे.

आत्तापर्यंत यामध्ये दोनशे महिला जोडल्या गेलेल्या आहेत. गोधडी शिवण्यासाठी वेळ लागतो, त्यासाठी लागणारं साहित्य त्यांना दिलं जातं. चार ते पाच दिवसांमध्ये त्यांचं विशेष कौशल्य वापरून त्यामधून पारंपरिक गोधडी तयार करून त्या सेंटरमध्ये आणून देतात. गोधड्यांचा आणि गोधडीचे विविध प्रॉडक्ट्स यांचा खप होण्यासाठी सोशल मीडिया तसेच विविध माध्यमांतून यासाठी मागणी होत आहे.

यासाठी लागणारं साहित्य आम्ही होलसेल दरात घेतो, तसेच सेंटरवर बसून वेगवेगळ्या डिझाइन्स तयार करतो. महिलादेखील कौशल्य वापरून नवनवीन प्रकारच्या गोधड्या शिवतात. शिवलेल्या गोधड्यांना मार्केट मिळून देण्यासाठी इनरव्हीलच्या प्रोजेक्टच्या अंतर्गत देशातल्या पहिल्या तीन प्रोजेक्टमध्ये गोधडीच्या प्रोजेक्टचं नाव आलं, त्यामुळे भरपूर प्रमाणात ऑर्डर्स येण्यासाठी मदत झाली.

वेगवेगळ्या प्रदर्शनांतदेखील त्यांचा खप होतो. फेसबुक अथवा व्हॉट्सॲपवरील ग्रुपमध्ये वेगवेगळ्या डिझाइन्सचे फोटो अपलोड केल्यामुळेही खूप प्रमाणात ऑर्डर्स येत आहेत. आमचा उपक्रम सामाजिक; तसंच पारंपरिक वारसा जपणारा आहे आणि हे सुरू करण्यामागचा मूळ हेतू स्त्रियांना रोजगार मिळण्यात मदत मिळावी हाच होता, त्यामुळे समाजातील अनेक लोक याचा प्रचार आणि प्रसार करत आहेत.

माझी अशी इच्छा आहे, की पुणे किंवा मुंबईसारख्या शहरांमधील मॉल्समध्ये गोधडीचा एक रॅक असावा. यासाठी आम्ही महिलांना अजून प्रशिक्षण देणार आहोत.

मी विविध ठिकाणी गोधडी प्रशिक्षण देण्यासाठी जात होते, त्यावेळी ‘शायनिंग इंडिया’ हे एक लघुउद्योग आणि हस्तकलेचं मोठं प्रदर्शन फलटण इथं भरलं होतं. त्यामध्ये आम्हाला पाच दिवसांसाठी आमंत्रित करण्यात आलं होतं. त्यावेळी आमचं काम आणि क्वालिटी बघून बऱ्याच मोठ्या प्रमाणात खरेदी झाली. नंतर विविध ठिकाणी आम्हाला स्टॉल्स लावण्याची संधी मिळत गेली आणि त्यामुळे आमचा प्रसार होण्यास खूप मदत झाली.

आमचं काम बघूनच आणखी काम आम्हाला मिळत गेल. ज्यावेळी गोधडीच्या प्रशिक्षणाबद्दल मी सुरुवातीला महिलांमध्ये बोलले, त्यावेळी महिला म्हणाल्या, की ‘गोधडीमध्ये काय नवीन शिकायचं?’ त्यावेळी मी त्यांना एक भावनिक साद घातली होती, की अंबाबाईच्या चरणी आपण एक महागोधडी अर्पण करणार आहोत. ती २१ बाय २१ फुटाची बनवायची आहे.

त्यानंतर सर्व महिला आमच्या सेंटरवर विणकाम करायला आल्या. त्यातून तशी ‘महागोधडी’ तयार केली आणि वाजत गाजत मिरवणूक काढून अंबाबाईच्या चरणी ती अर्पण केली. खऱ्या अर्थाने तेव्हापासूनच ‘गोधडी’ला महिलांचा प्रतिसाद मोठ्या प्रमाणात मिळत गेला.

(शब्दांकन : प्रियांका सत्यवान)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Municipal Elections: मुंबईत शिवसेनेला उभारी मिळणार? महापालिकेवर महायुतीचा झेंडा फडकणार...

Unsold Player List IPL 2025 Auction: अर्जुन, अजिंक्य, शार्दूल ते वॉर्नर यांच्यासह ११० खेळाडू राहिले अनसोल्ड, वाचा संपूर्ण लिस्ट

PM Narendra Modi: उद्याच्या संविधान दिन कार्यक्रमात पंतप्रधानांचे भाषण होणार नाही; विरोधकांनी केली भाषणाची मागणी

IPL 2025 Auction Live: अर्जुन तेंडुलकरवर मुंबईनेही दाखवला नाही विश्वास; लिलावात राहिला 'अनसोल्ड'

ICSE, ISC Exam Schedule: दहावी, बारावी परीक्षेचं वेळापत्रक जाहीर; 'असं' डाऊनलोड करा

SCROLL FOR NEXT