Long Hair Care Tips  Sakal
लाइफस्टाइल

Hair Growth Tips केसांच्या वाढीसाठी ‘या’ मास्कचा करा वापर, केस होतील घनदाट व मऊ

Long Hair Care Tips In Marathi सुंदर, लांबसडक, मऊ केसांसाठी बहुतांश जणी ब्युटीपार्लरमध्ये जाऊन केमिकलयुक्त ट्रीटमेंट तसंच महागड्या हेअर केअर प्रोडक्ट्सचा वापर करतात. पण याऐवजी आपण घराच्याघरी सहजरित्या उपलब्ध असणाऱ्या पदार्थांचा वापर करूनही केसांची योग्यपद्धतीने निगा राखू शकता.

सकाळ डिजिटल टीम

केसांकरिता दह्याचे फायदे (Benefits Of Curd For Hair in Marathi)

हेअर केअर रूटीनमध्ये आपण दह्याचा समावेश केल्यास केसांना विभिन्न लाभ मिळतील, यात काही शंकाच नाही. सुंदर व मऊ केस मिळवण्यासाठी कित्येक जण नैसर्गिक उपाय म्हणून दह्याच्या मास्कचा वापर करतात. दह्यातील औषधी गुणधर्मांमुळे केस तसंच स्कॅल्पची त्वचा निरोगी राहते. दुभंगलेले केस, केसांचा कोरडेपणा इत्यादी समस्याही दूर होण्यास मदत मिळते.

केस वाढण्याकरिता दह्यामुळे कशी मदत मिळते? (Hair Care Tips)

दह्यामध्ये कॅल्शिअम आणि कॅसीन यासारखे महत्त्वपूर्ण पोषकघटकांचा समावेश असतो. हे पोषणतत्त्व केसांच्या वाढीच्या प्रक्रियेमध्ये महत्त्वपूर्ण भूमिका निभावतात. याव्यतिरिक्त दह्यामध्ये असणारे झिंक व फॉलेट देखील केसांसाठी फायदेशीर असू शकते. शिवाय व्हिटॅमिन बी- ६ हे कोंड्याची समस्या दूर करण्याकरिता प्रभावी स्वरुपात कार्य करू शकते.

केस वाढण्याकरिता दह्यामुळे कशी मदत मिळते?

दह्यामध्ये कॅल्शिअम आणि कॅसीन यासारखे महत्त्वपूर्ण पोषकघटकांचा समावेश असतो. हे पोषणतत्त्व  केसांच्या वाढीच्या प्रक्रियेमध्ये महत्त्वपूर्ण भूमिका निभावतात. याव्यतिरिक्त दह्यामध्ये असणारे झिंक व फॉलेट देखील केसांसाठी फायदेशीर असू शकते. शिवाय व्हिटॅमिन बी- ६ हे कोंड्याची समस्या दूर करण्याकरिता प्रभावी स्वरुपात कार्य करू शकते.  

केळे आणि दह्याचे हेअरमास्क (How To Use Dahi And Banana For Hair Growth in Marathi)

सामग्री :

  • एक वाटी दही

  • एक केळे

  • ऑलिव्ह ऑईलचे दोन ते तीन थेंब

कसे तयार करावे हेअरमास्क?

  • केळे योग्यरित्या मॅश करून पेस्ट तयार करा

  • आता यामध्ये दही व ऑलिव्ह ऑईल मिक्स करा

  • मिश्रण तयार झाल्यानंतर संपूर्ण केसांना व स्कॅल्पवर लावा

  • कंगव्याच्या मदतीने केसांमधील गुंता सोडवावा, म्हणजे मास्क लावणे सहजसोपे होईल.

  • १० मिनिटांकरिता हेअर मास्क लावून ठेवावा

  • यानंतर माईल्ड शॅम्पूने केस स्वच्छ धुऊन घ्यावेत.

  • आठवड्यातून दोनदा हा उपाय आपण करू शकता.

केसांना मिळणारे लाभ

दही व केळ्यातील औषधी गुणधर्म केसांचे सौंदर्य वाढवण्यास मदत करतात. दह्यामध्ये ‘व्हिटॅमिन ए’चे प्रमाण मोठ्या प्रमाणात असते. ‘व्हिटॅमिन ए’मुळे शरीरातील एपिथेलियल टिशूची (Epithelial tissues) वाढ होण्यास मदत मिळते आणि यामुळे आरोग्यही निरोगी होते. शिवाय यामुळे केसांची वाढही उत्तमरित्या होते. केळ्यामधील ‘व्हिटॅमिन ई’ या पोषकघटकामुळे सिलिका आणि पोटॅशिअम कोलेजनची निर्मिती होण्यास मदत मिळू शकते. ज्यामुळे केस मुळासकट मजबूत होऊ शकतात. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Priyanka Gandhi: प्रियंका गांधींच्या नागपूरमधील रॅलीत मोठा राडा, काॅंग्रेस आणि भाजप कार्यकर्ते आमने सामने आले अन्....

"Fake Narrative फार काळ टिकत नाही"; पंतप्रधान मोदींनी केलं विक्रांत मेस्सीच्या द साबरमती रिपोर्टचं कौतुक

Vikramgad Assembly constituency 2024 : स्थलांतरीत मजुरांमुळे मतदानाची टक्केवारी घटण्याची शक्यता, उमेदवारांपुढे आव्हान.

Sharad Pawar: बारामतीत शरद पवारांच्या सभेपूर्वी नाट्यमय घडामोडी, प्रतिभा पवारांना टेक्सटाईल पार्कमध्ये जाण्यापासून अडवले, पहा व्हिडिओ

IND vs AUS: रोहित, शुभमनची पर्थ कसोटीतून माघार; जसप्रीत बुमराह कर्णधार! जाणून घ्या Playing XI कशी असणार

SCROLL FOR NEXT