बऱ्याच दिवसांच्या प्रतिक्षेनंतर Long Weekend आला आहे. १५ ते १९ ऑगस्ट अशा लागून सुट्ट्या असल्याने पर्यटन क्षेत्रातील नफ्यात वाढ होणार आहे. कारण, सुट्टी मिळाली की लोक पर्यटनाला बाहेर पडतात. तसेच, शहरातील लोक गावचा रस्ता धरतात.
पण, जे लोक घरात राहणे पसंत करतात त्यांनी काय करायचं? हा प्रश्न पडलेला असतो. कारण, घरात राहून टीव्ही पाहणं किंवा मोबाईलवर वेळ घालवणं हे लोकांच्या जास्त पसंतीच काम आहे. पण, या चार दिवसांच्या सुट्ट्यांच तुम्ही चांगलं काहीतरी करू शकता. ज्यामुळे, तुमचे कुटुंबिय आणि तुम्हीही समाधानी व्हाल.
तुम्ही कुटुंबातील सर्व सदस्य एकत्र असाल. तर जेवणाचे बेत नक्कीच आखले जातात. घरातील प्रत्येकाचा एखादा आवडीचा पदार्थ असतोच. तुम्ही पाच दिवस घरी आहात तर प्रत्येकाच्या आवडीचा मेन्यू बनवा. आणि हे सर्वांनी मिळून बनवा. ज्यामुळे एकाच व्यक्तीवर जेवण बनवण्याचा ताण पडणार नाही.
घरातील सदस्यांसोबत तुम्ही लहानपणापासून एकत्र राहीलेले असता. त्यामुळे त्यांना काय आवडतं काय नाही, हे तुम्हाला माहिती असतं. त्यामुळे घरातील सदस्यांच्या आवडीचे गेम्स नक्की खेळा. अशा गेम्समध्ये अनेक गोष्टी करण्यासारख्या असतात. ज्या तुम्हाला एकत्र आणतात. दुरावलेल्या नात्यांमध्ये पुन्हा गोडवा भरतात.
तुम्ही लहानपणी अनेक चित्रपट भावंडांसोबत पाहिले असतील. पण, भाऊ, त्यांची मुलं, त्यांची नातवंडे यांच्यासोबत चित्रपट पाहण्याचा क्षण आत दुर्मिळ बनला आहे. त्यामुळेच, विकेंडला फॅमिलीसोबत वेळ घालवण्यासाठी एकत्र चित्रपट पाहणे चांगले राहील.
तुम्ही अनेकवेळा फॅमिलीसोबत फोटो-व्हिडिओ काढले असतील. कुणाच्या लग्नाचे फोटो, व्हिडिओ असतील. फोटो, त्यातील तुमच्या आठवणी एकमेकांना सांगा. ज्यामुळे, तुमचा वेळ चांगला जाईल.
कोकणात गणपतीच्या सुट्टीला जाणाऱ्या लोकांचे मनोरंजन अधिक होते. कारण, ते तिकडे त्यांचे जुने खेळतात. तसेच, तुम्हीही फॅमिलीसोबत वेळ घालवताना ट्रूथ ऍन्ड डेअर, लपंडाव, पत्त्यांचे डाव, आईचं पत्र हरवलं असे खेळ खेळा. ज्यामुळे तुम्हाला लहान झाल्यासारखे वाटेल.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.