madhura velankar satam over her education and hobbies
madhura velankar satam over her education and hobbies  Sakal
लाइफस्टाइल

शिकवीन चांगलाच धडा...

सकाळ वृत्तसेवा

- मधुरा वेलणकर-साटम

मला लहानपणापासून कधी अभ्यासाची, शिकण्याची फारशी आवड नव्हती. मी अभिनय क्षेत्रात आले, तेव्हा त्या दृष्टीने ज्या गोष्टी शिकायच्या त्या शिकत गेले; पण माझा मुलगा झाल्यानंतर मी थोडं काम कमी केलं होतं. कारण मला त्याला वेळ द्यायचा होता.

त्या काळात मी नाट्यशिबिर घ्यायला सुरुवात केली. तेव्हा मला शिकवायला आवडू लागलं आणि मुलांनाही मी शिकवलेलं आवडू लागलं. आता वयाच्या या टप्प्यावर मला शिकावंसं वाटत आहे. मी हल्ली शिकतेही आहे आणि शिकवतेही आहे. मला आता त्यात मजा येते.

माझी आजी प्राध्यापिका, आई शिक्षिका होती. मला कधीच शिकवण्याच्या क्षेत्रात येण्याची इच्छा नव्हती; पण आता चाळिशीमध्ये मला नव्यानं शिकावंसं आणि शिकवावंसं वाटत आहे. माझी आजी लेखिका आणि कवयित्रीही होती.

मी एक पुस्तकही लिहिलेलं आहे आणि आणखी एक पुस्तक लिहीत आहे. त्यामुळे हे लिखाण करणं आजीकडून मला मिळालेलं आहे आणि शिकवणं आई आणि आजी दोघींकडून मिळालेली देणगी आहे. पहिल्यांदा मी शिकवायला घेतलं, तेव्हा आईकडे पाहून शिकवत होते.

त्यानंतर पूर्ण तयारी केली. पहिल्या वेळी शिकवताना थोडी धांदल उडाली होती. मी काही तक्ते तयार करून सोबत घेऊन गेले होते, मुद्दे लिहून ठेवले होते. आपल्या शिक्षकाची तयारी नाही, असं लहान मुलांना वाटू नये, याची काळजी घेत होते; पण एकूणातच पहिला अनुभव चांगला आला आणि त्यानंतर मी आणखी आत्मविश्वासानं शिकवू लागले.

मुलांना शिकवताना माझ्या लक्षात आलं, की आपण त्यांच्याकडूनही काही नवीन शिकत जातो. आपण जसं ठरवतो तसं होतंच असं नाही. आपण तिथे नवीन काहीतरी आयत्या वेळीही करतो. या सगळ्यात अनुभवाचाही खूप फायदा होतो. आता सहा वर्षं मी शिबिरं घेत आहे. आता माझ्या अनुभवातून मी समृद्ध झाले आहे. त्यामुळे आता मी ऐनवेळी आलेल्या प्रश्नांना बेधडकपणे सामोरी जाऊ शकते.

एक किस्सा या निमित्तानं सांगते. शिकवताना माझ्या असं लक्षात आलं, की आपण काहीवेळा लोकांना गृहित धरतो. समोरच्याला हे करताच येणार नाही, असं आपण स्वतःशीच ठरवून टाकतो. मी पुण्यात एक शिबिर घेतलं होतं. त्यात माझे एक विद्यार्थी ६३ वर्षांचे होते. त्यावेळी मी माझ्या सगळ्याच विद्यार्थ्यांचे एकपात्री प्रयोग बसवले होते.

त्यांनाही मी सांगितलं होतं, की तुमचं सादरीकरण तुम्ही बसून केलं तरी चालेल. कारण मला असं वाटलं होतं की, ते ६३ वर्षांचे आहेत. त्यांना मी किती गोष्टी करायला लावू. त्यामुळे मी त्यांना सूट दिली होती. मी त्यांना गृहित धरलं होतं; पण त्यांनी मला चकित केलं. मी सांगितलेल्या सगळ्या गोष्टी त्यांनी सादर केल्या आणि त्यांनी अजिबात बसून वगैरे सादरीकरण केलं नाही.

मला तेव्हा जाणवलं, की लहान मुलं किंवा मोठी माणसं आपण कोणालाही गृहित धरता कामा नये. दुसरी गोष्ट, की कोणत्याही वयामध्ये आपण ‘आपलं वय झालं आहे, म्हणून एखादी गोष्ट मी करू शकत नाही,’ असा विचार करू नये. इच्छा असेल तर मार्ग निघतोच आणि त्यासाठी आपल्यामध्ये ताकदही निर्माण होते.

मी अभिनेत्री आहे आणि मी पूर्णवेळ शिकवण्याच्या क्षेत्रात येण्याच्या विचारात नाही. मी नुकतंच मराठीमध्ये पदव्युत्तर शिक्षण घेतलं आहे आणि आता पुढे मला अशाब्दिक संप्रेषण म्हणजे नॉन व्हर्बल कम्युनिकेशनमध्ये पीएचडी करण्याचा मानस आहे. हाच विषय मला शिकवण्याचीही इच्छा आहे. पूर्ण वेळ जरी नाही, तरी मला माझ्या अभिनयातल्या करिअरसोबत शिकवायचंही आहे आणि मी ते पुढेही करत राहीन.

(शब्दांकन : वैष्णवी कारंजकर)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ladki Bahin Scheme: 'लाडकी बहीण'साठी आता घरबसल्या करता येणार अर्ज! नवं अ‍ॅप सुरु; जाणून घ्या कसा भरायचा अर्ज?

Hathras Stampede: हाथरस दुर्घटनेत कटाचा संशय! मुख्यमंत्र्यांनी केली मोठी घोषणा, निवृत्त न्यायमूर्तींच्या अध्यक्षतेखाली होणार चौकशी

Kangana Ranaut Slapped : कुलविंदर अजून निलंबितच ; नोकरी परत मिळाल्याच्या बातम्यानंतर सीआयएसएफने दिलं स्पष्टीकरण

Neeraj Chopra : नीरज चोप्रानं सांगितलं पॅरिस डायमंड लीगमधून माघारीचं कारण

Inside Out 2: 'इन्साईड आऊट २'चा जबरदस्त रेकॉर्ड! ठरला कमी वेळात सर्वाधिक कमाई करणारा पहिला अ‍ॅनिमेशनपट

SCROLL FOR NEXT