Maharashtra Din 2024 esakal
लाइफस्टाइल

Maharashtra Din 2024 : जागतिक वारसा स्थळांमध्ये समाविष्ट असणारी महाराष्ट्रातील प्रसिद्ध ठिकाणे, यंदाच्या सुट्टीत नक्की द्या भेट

All about Maharashtra Din : महाराष्ट्र दिनानिमित्त जागतिक वारसा स्थळांमध्ये समाविष्ट असलेल्या ठिकाणांबद्दल जाणून घेणार आहोत.

Monika Lonkar –Kumbhar

Maharashtra Din 2024 : सध्या सर्वत्र महाराष्ट्र दिनाचा आणि कामगार दिनाचा उत्साह पहायला मिळतोय. दरवर्षी १ मे हा दिवस महाराष्ट्र दिन आणि कामगार दिन म्हणून मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. महाराष्ट्राला समृद्ध असा इतिहास आणि परंपरा लाभल्या आहेत. महाराष्ट्राची भूमी ही संतांची, महात्म्यांची, शूरवीरांची, गडकिल्ल्यांची, कवी-लेखकांची, लोककलेची आणि प्राचीन अशा इतिहासाची आहे. या सगळ्यांमुळे महाराष्ट्र हे राज्य सगळ्या राज्यांपेक्षा वेगळे ठरते.

महाराष्ट्राची परंपरा, लोककला, खाद्यसंस्कृती आणि पर्यटन जगभरात प्रसिद्ध आहे. विशेष म्हणजे महाराष्ट्रातील ५ ठिकाणे ही जागतिक वारसा स्थळांमध्ये समाविष्ट आहेत. महाराष्ट्र दिनानिमित्त आपण जागतिक वारसा स्थळांमध्ये समाविष्ट असलेल्या या ठिकाणांबद्दल जाणून घेणार आहोत.

अजिंठा लेणी

महाराष्ट्रातील ७ आश्चर्यांपैकी एक असलेले हे एक प्रसिद्ध ठिकाण आहे. महाराष्ट्रातील संभाजीनगर जिल्ह्यातील सोयगाव तालुक्यात ही अजिंठा लेणी आहे. वाघूर नदीच्या परिसरात या प्रसिद्ध लेण्या आहेत. डोळ्यांचे पारणे फेडणाऱ्या या लेण्या प्राचीन चित्रकलेचा अद्भूत नमुना आहे, त्यामुळे, तर या ठिकाणाचा जागतिक वारसा स्थळामध्ये समावेश आहे.

विशेष म्हणजे UNESCO या संस्थेने १९८३ मध्ये जागतिक वारसा स्थळ म्हणून या ठिकाणाला दर्जा दिला. या ठिकाणी बौद्ध धर्मातील हिनयान आणि महायान पंथियांचे लेणी साहित्य उपलब्ध आहे. ही वैशिष्ट्यपूर्ण लेणी पाहण्यासाठी दरवर्षी महाराष्ट्रातून देश-विदेशातून असंख्य पर्यटक येत असतात. (Ajanta Caves)

वेरूळ लेणी

युनेस्कोच्या भारतातील जागतिक वारसा स्थळांच्या यादीत वेरूळ लेणीचे नाव हे पहिल्या ५ स्थळांमध्ये येते. एकसंध खडकातून कोरण्यात आलेली ही लेणी खूपच खास आहे. ही लेणी पाहताना कोणत्या तरी गूढ दुनियेत हरवल्यासारखे वाटते.

भारत सरकारने १९५१ मध्ये वेरूळ लेणीला राष्ट्रीय स्मारक म्हणून घोषित केले. त्यानंतर, वेरूळ लेणीला १९८३ मध्ये युनेस्कोने जागतिक वारसा स्थळ म्हणून दर्जा दिला. ही वेरूळ लेणी संभाजीनगर शहरापासून अगदी ३० किलोमीटरच्या अंतरावर स्थित आहे. या ठिकाणी ३४ लेण्या आहेत. या ठिकाणी बौद्ध, हिंदू आणि जैन धर्मातील लेण्यांचा अनोखा संगम पहायला मिळतो. (Verul Caves)

एलिफंटा लेणी

मुंबईतल्या ‘गेट वे ऑफ इंडिया’ पासून १० किलोमीटर अंतरावर या एलिफंटा लेणी स्थित आहेत. एलिफंटा लेण्यांमधील प्राचीन गुहा पर्यटकांचे प्रमुख आकर्षण आहे. १९८७ मध्ये युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळांच्या यादीमध्ये एलिफंटा लेण्यांचा समावेश करण्यात आला.

मध्ययुगीन रॉक-कट कला आणि उत्कृष्ट वास्तुकलेचा हा एक भव्य नमुना आहे. एलिफंटामध्ये एकूण ७ गुहा आहेत, ज्या भगवान शिवाला समर्पित आहेत. तब्बल ६० हजार स्क्वेअर फूट क्षेत्रात पसरलेल्या या लेण्या पाहण्यासाठी देश-विदेशातून असंख्य पर्यटक भेट देतात. (Elephanta Caves)

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस

महाराष्ट्राची राजधानी असलेल्या मुंबई शहरामध्ये हे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस स्थित आहे. ऐतिहासिक आणि सर्वात मोठे रेल्वेस्थानक असलेल्या या ठिकाणाचा समावेश जागतिक वारसा स्थळांमध्ये करण्यात आला आहे. २००४ मध्ये युनेस्कोने या ठिकाणाला जागतिक वारसा स्थळ म्हणून दर्जा दिला. या ठिकाणाला व्हिक्टोरिया टर्मिनस (व्हिटी) किंवा सीएसएमटी अर्थात छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस म्हणून ओळखले जाते. (Chhatrapati Shivaji Maharaj Terminus)

व्हिक्टोरियन गॉथिक आणि आर्ट डेको एन्सेम्बल्स

मुंबईच्या व्हिक्टोरिया गॉथिक आणि आर्ट डेको एन्सेम्बल्स या इमारतींचा समावेश जागतिक वारसा स्थळांमध्ये करण्यात आला आहे. २०१८ मध्ये युनेस्कोने या ठिकाणाला जागतिक वारसा स्थळांचा दर्जा दिला. मुंबई आर्ट डेको हा ९४ खासगी इमारतींचा एक संग्रह आहे. १९ व्या आणि २० व्या शतकातील इमारतींचा हा संग्रह स्थापत्यकलेचा एक उत्कृष्ट नमुना आहे. (The Victorian and Art Deco Ensemble of Mumbai)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Stock Market Today: आज शेअर बाजार राहणार बंद; बीएसई आणि एनएसईवर कोणतेही ट्रेडिंग होणार नाही

Latest Maharashtra News Updates : गृह मतदान मोहिमत ज्येष्ठ नागरिक आणि दिव्यांगांनी बजावला मतदानाचा हक्क

Sweet Potato Patties: सकाळी नाश्त्यात बनवा चटपटीत रताळं पॅटिस, जाणून घ्या रेसिपी

Congress : समाजात फूट पाडण्यासाठीच भाजपने कलम 370 चा मुद्दा जिवंत ठेवलाय, खर्गेंचा हल्लाबोल

Satara Assembly Election : संदेश, रिल्स पाहताना सावधानता बाळगा...एपीके फाइलवर क्लिक नको, अन्यथा बँक खाते होईल रिकामे

SCROLL FOR NEXT