maharashtra ladies association sakal
लाइफस्टाइल

नेटवर्किंगद्वारे उद्योजिकांना प्रोत्साहन

‘महाराष्ट्र लेडीज असोसिएशन’ या ग्रुपला ७ ऑगस्ट २०१८ मध्ये फेसबुकवर सुरुवात झाली.

सकाळ वृत्तसेवा

- अभिलाषा बेलुरे, ग्रुप ॲडमिन, महाराष्ट्र लेडीज असोसिएशन

‘महाराष्ट्र लेडीज असोसिएशन’ या ग्रुपला ७ ऑगस्ट २०१८ मध्ये फेसबुकवर सुरुवात झाली. मी २०१६, १७, १८ मध्ये बऱ्याच ग्रुपमध्ये सहभागी होते. त्या ग्रुपमध्ये काय आणि कशाप्रकारे काम चालते हे मी पाहायचे. मात्र, हे ग्रुप्स काही ठिकाणांपुरते किंवा काही शहरांपुरते मर्यादित आहेत. संपूर्ण महाराष्ट्राला जोडणारा असा कोणताही ग्रुप नव्हता.

माझी आई उस्मानाबादला राहायची. मला तिला मदत पाठवायची होती, पण त्यावेळी उस्मानाबाद आणि पुण्याला जोडणारा एकही ग्रुप नव्हता. त्यावेळी मला सुचले, की आपण संपूर्ण महाराष्ट्रातील महिला जोडल्या जातील असा एक ग्रुप सुरू करूयात. त्यामुळे बाकी ग्रामीण भागातील महिलांनाही माझ्याकडून अथवा इतर कोणाकडूनही मदत पोहोचू शकेल.

मेट्रो सिटीमधील लोकांना सोशल मीडिया अथवा बाकी गोष्टींचे ज्ञान असते, पण ग्रामीण भागातील अथवा इतर शहरांमधील लोकांना त्यावेळी याबद्दल पुरेशी माहिती नव्हती. असा ग्रुप बनवल्यास त्या भागातील लोकांना त्यांचे प्रॉडक्ट सेल करणे, त्यांना मदत पोहोचवणे किंवा त्यांच्या व्यवसायांना प्रोमोट करणे सोपे होईल या अनुषंगाने २०१८मध्ये संपूर्ण महाराष्ट्र एका छताखाली येईल असा ‘महाराष्ट्रीयन लेडीज असोसिएशन’ हा ग्रुप सुरू केला.

नातेवाईक, मैत्रिणी अशांनी मिळून सुरू झालेल्या ग्रुपमध्ये आजपर्यंत एक लाख तीस हजार महिला फेसबुकच्या माध्यमातून जोडल्या गेल्या आहेत. ग्रुपच्या अगदी सुरुवातीला आम्ही होम बेकर्ससाठी केक कॉम्पिटिशन घेतली होती. ती पुण्यातील पहिली होम बेकिंग कॉम्पिटिशन होती. त्यातून ग्रुपचा प्रतिसाद वाढायला मदत झाली.

त्यानंतर महिलांसाठी ॲक्वा झुंबा, प्लास्टिक बॅनसाठी रॅम्पवॉक, डान्स कॉम्पिटिशन असे अनेक उपक्रम घेतले. त्यानंतर बिझनेस नेटवर्किंग सुरू केले. या ग्रुपमध्ये नेटवर्किंगचे काम चालते. या नेटवर्किंगमध्ये अनेक बिझनेस मीटअप होतात. मागील सहा वर्षांमध्ये ४० बिझनेस मीटअप्स् झाल्या आहेत. पहिली बिझनेस मीटअप झाल्यानंतर कोरोना सुरू झाल्याने सर्व कामे ऑनलाइन पद्धतीने होऊ लागली. घरी बसलेल्या महिलांसाठी ऑनलाइन फूल डे एंटरटेनमेंट असा उपक्रम घेतला.

त्यामध्ये विविध क्लासेस, योगा, डान्स असे विविध उपक्रमांचा समावेश होता. कोविडमध्ये या ग्रुपचा अनेक लोकांना खूप फायदा झाला, ज्यांचे व्यवसाय त्यादरम्यान ठप्प झाले होते त्यांच्या व्यवसायाला चालना या ग्रुपमुळे मिळाली. त्यांच्या व्यवसायाला प्रोमोट करणे, सेलिंग करणे आदींनी गोष्टी ग्रुपवर चालत होत्या. अनेकजणी आजही कठीण काळात व्यवसाय स्थिर करण्यात मदत केल्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करतात.

नेटवर्किंग म्हणजे महिलांनी महिलांसाठी बनवलेले व्यासपीठ, त्यात आम्ही एकमेकींना एकमेकांच्या व्यवसायांना तोंडी पद्धतीने अथवा थेट भेट घेऊन लोकांपर्यंत होण्यास मदत करत असतो. तुमचा हेतू तुम्ही प्रामाणिक असेल, डोळ्यांसमोर ध्येय असल्यास छोट्या-मोठ्या विषय विकारांमध्ये तुम्ही अडकणार नाही. आपल्या हातून समाजासाठी व इतर महिलांसाठी काही कार्य घडत असेल, त्यांना आपली मदत होत असल्यास या जीवनाचं सार्थक होईल असे माझे मत आहे.

(शब्दांकन - प्रियांका सत्यवान)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ahilyanagar Crime : मोठा शस्‍त्रसाठा जप्त...जम्‍मू-काश्‍मिरच्या आरोपींकडून ९ रायफली, ५८ काडतुसे जप्त

Nitin Raut Video: 'जय भीम' म्हटल्याने विलासरावांनी मंत्रिपद नाकारलं; काँग्रेस नेते नितीन राऊतांचा गौप्यस्फोट

Uddhav Thackeray : प्रियंका गांधी बाळासाहेबांवर भरभरुन बोलल्या; त्यांनी भाजपचे दात घशात घातले, उद्धव ठाकरेंचा मोदींना टोला

IND vs AUS: 'विराट किंवा रोहितचा फॉर्म नव्हे, तर गौतम गंभीर ही टीम इंडियाची सर्वात मोठी समस्या'; वाचा कोण म्हणतंय असं

Latest Maharashtra News Updates live : फूट पाडणारे राजकारण कोण खेळत आहे हे प्रत्येकजण पाहू शकतो : आमदार सुवेंदू अधिकारी

SCROLL FOR NEXT