Mahashivratri vastu dosh upay 2024 esakal
लाइफस्टाइल

Mahashivratri 2024 : घरात अठरा विश्व दारिद्र्य पसरलंय, तर यंदाच्या महाशिवरात्रीला हे वास्तू उपाय करा, फरक जाणवेल

महाशिवरात्रीच्या दिवशी पूजा केल्याने घरातील वास्तुदोष दूर होतात

Pooja Karande-Kadam

Mahashivratri 2024 :

काहीवेळा ज्योतिषशास्त्रात सांगितलेले उपाय केल्याने आपल्या घरात असलेलं दारिद्र्य दूर होते. असे अनेक अनुभवही लोकांना आले आहेत. तुम्हीही संकटाच्या फेऱ्यात अडकला असाल तर काही उपाय केल्याने तुमच्या आयुष्यात सुखाचे दिवस येऊ शकतात. पण काय उपाय करावे, आर्थिक घडी कशी बसवावी याचा विचार करत असाल तर यंदाची महाशिवरात्री तुमच्या मदतीला धावून येईल. कसे ते पाहू.

फाल्गुन कृष्ण पक्षाच्या चतुर्दशीला महाशिवरात्री साजरी केली जाते. या दिवशी भगवान शंकरासोबत माता पार्वतीची पूजा केली जाते. या दिवशी भगवान शंकराचा रुद्राभिषेक केल्याने सर्व मनोकामना पूर्ण होतात, असा विश्वास आहे. महाशिवरात्रीच्या दिवशी भगवान शंकराला प्रसन्न करण्यासाठी दूध, चंदन, भस्म, भांग, धतुरा इत्यादी अनेक वस्तू शिवलिंगाला अर्पण केल्या जातात.

यावर्षी महाशिवरात्री ८ मार्च रोजी साजरी होणार आहे. महाशिवरात्रीच्या दिवशी पूजा केल्याने घरातील वास्तुदोष दूर होतात. अशा परिस्थितीत महाशिवरात्रीच्या दिवशी वास्तू दोष दूर करण्यासाठी कोणते उपाय केले जाऊ शकतात ते जाणून घेऊया. (Mahashivratri 2024)

महाशिवरात्रीच्या दिवशी भगवान शिवाला अभिषेक केल्यानंतर अभिषेकाचे पाणी घरी आणावे. यानंतर 'ओम नमः शांभवायच मायोभवाय च नमः शंकराय च'. या मंत्राचा उच्चार करत हे पवित्र पाणी संपूर्ण घरात शिंपडावे. असे केल्याने घरातील नकारात्मक ऊर्जा नष्ट होते आणि कुटुंबात समृद्धी येते.

घरामध्ये परस्पर कलह, रोग किंवा इतर समस्या असतील तर त्या दूर करण्यासाठी घराच्या ईशान्य दिशेला रुद्राभिषेक करणे शुभ असते. 

घरात कोणत्याही प्रकारचा वास्तुदोष असेल तर त्यापासून मुक्ती मिळवण्यासाठी घराच्या पूर्व किंवा उत्तर-पश्चिम दिशेला बेलाचे झाड लावून त्याला पाणी घालावे. तसेच महाशिवरात्रीला संध्याकाळी त्याखाली तुपाचा दिवा लावावा. असे केल्याने घरातील वास्तुदोष दूर होतात.(Vastu Upay)

घरातील अडचणी दूर करण्यासाठी महाशिवरात्रीच्या दिवशी घराच्या ईशान्य दिशेला भगवान शिवाचे कुटुंबासोबतचे म्हणजेच बाळ गणेश,भगवान कार्तिकेय, माता पार्वती यांच्यासोबतचा फोटो लावा. भगवान शिव, माता पार्वती, कार्तिकेय आणि गणेशजींची चित्रे लावल्याने घरात शांततेचे वातावरण राहते. तसेच घरातील सदस्यांचे विचार शुद्ध होतात. 

बेलाच्या पानाचे उपाय

तुम्ही हे तर ऐकलेच असेल की, बेलाचे पान महादेवांना प्रिय आहे. त्यामुळे तुम्ही महादेवांच्या पिंडीवर अनेकवेळा बेलाचे पान अर्पण केलं असेल. तर महाशिवरात्री दिवशीही तुम्ही ते अर्पण करा. आणि शिवलिंगावर बेलाचे पान ठेऊन प्रार्थना करा आणि ते पान पुन्ही घेऊन तुमच्या खिशात, पाकिटात ठेवा, यामुळे तुमच्या आर्थिक अडचणी दूर होतील असे समजले जाते.(Vastu Tips In Marathi)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Trumpet Voting: पिपाणीने पुन्हा केला तुतारीचा गेम! वळसे पाटील थोडक्यात वाचले; पवारांच्या ९ बड्या नेत्यांना कसा बसला फटका?

Mobile Charging Tips : कितीही वेळ मोबाईल वापरा चार्जिंग संपणारच नाही, सोपी ट्रिक बघाच

Devendra Fadanvis: ‘महाराष्ट्र नायक’ फडणवीसांनाच मुख्यमंत्री करा, भाजपची जोरदार Lobbying

Utpanna Ekadashi 2024: 26 कि 27 नोव्हेंबर कधी साजरी केली जाणार उत्पन्न एकादशी? जाणून घ्या काय करावे अन् काय नाही

Latest Maharashtra News Updates : उद्धव ठाकरे आमदारांकडून घेणार प्रतिज्ञापत्र; पुन्हा पक्ष फुटीची भीती

SCROLL FOR NEXT