Makar Sankranti 2023 esakal
लाइफस्टाइल

Makar Sankranti 2023 : संक्रांतीच्या दिवशी ट्रॅडिशनल लुकसोबत करा हा मेकअप, खुलून दिसेल सौंदर्य

सकाळ डिजिटल टीम

Makar Sankranti 2023 : मकर संक्रांतीचा सण संपूर्ण देशभर साजरा केला जातो. मकर संक्रांतीला उत्तरायणाचा सण असेही म्हणतात. यावेळी बहुतांश महिला पारंपरिक लूक करून तयार होतात. आता सर्वच स्त्रिया तयार होतात म्हंटल्यावर गर्दी तर असणार.अशा वेळी या गर्दीत उठून दिसण्यासाठी गेटअपसोबतच मेकअपही खास असायला हवा. चला तर मग जाणून घेऊया मकर संक्रांतीच्या दिवशी तुम्ही कोणत्या प्रकारचा मेकअप करायला हवा.

ब्लश

हिवाळ्यात ट्रॅडिशनल आऊटफिट सोबत हेवी मेकअप करणं थोडं कठीण असतं. अशावेळी ट्रॅडिशनल सोबत नॅचरल लुक हवा असेल तर ब्लश अप्लाय करू शकता. ब्लश तुमच्या नॅचरल शेडसाठी पूरक ठरू शकतो. ब्लश लावल्यानंतर, रेगुलर फाउंडेशनचां टच द्या.

हायलाइटर वापरा

नॅचरल लुक अनेकांना आकर्षित करतो. जर आऊटफिट ब्राईट कलरचा असेल तर हलका मेकअप आणि त्याच्यासोबत हायलाइटर वापरा. यामध्ये न्यूड आयशॅडो आणि लिपस्टिकसोबतच बेसही खूप हलका असावा.

शिमरी आयशॅडो

फेस्टिव्ह लूकसाठी शिमरी आयशॅडो हा उत्तम पर्याय असू शकतो. पारंपरिक दिसण्यासाठी तुम्ही हे ट्राय करू शकता. आउटफिट लक्षात घेऊन गोल्ड किंवा सिल्व्हर शिमर आयशॅडो मॅच करता येईल.

मॅट लुक

बऱ्याच बॉलिवूड अभिनेत्री मॅट लुक मेकअप फॉलो करतात. हा लुक साडी किंवा इतर कोणत्याही पारंपरिक कपड्यांवर उठून दिसतो. मॅट लूक नेहमीच परफेक्ट लुक देण्याच काम करतो. मॅट लूकमध्ये त्वचा तजेलदार आणि नॅचरल दिसते. पण हा मेकअप लावण्यापूर्वी तुम्हाला तुमच्या त्वचेबद्दल माहिती हवी.

डार्क लिपस्टिक

डार्क लिपस्टिक तुमचा मेकअप आणखीनच सुंदर बनवते. तुम्हाला डार्क लिपस्टिकमध्ये अनेक पर्याय सापडतील. लाईट कलरचे आऊटफिट असतील तर तुम्ही नक्कीच डार्क लिपस्टिकचां पर्याय निवडला पाहिजे. तसं तर आजकाल मॅट लिपस्टिक शेड्सची देखील चलती आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Eknath Shinde: मुख्यमंत्र्यांचे सुपुत्र, खासदार श्रीकांत शिंदेंनी महाकाल मंदिराचे नियम मोडले; मंदिराच्या गर्भगृहात केला प्रवेश

Chh.Sambhajinagar Assembly Election 2024 : विस्तारित भागांना प्रतीक्षा सुविधांची!

एसी जिममध्ये घाम गाळणाऱ्यांना गश्मीर महाजनीने दिला खास सल्ला; म्हणाला- एका चुकीच्या इन्स्ट्रक्टरमुळे मी...

Latest Maharashtra News Updates : महाविकास आघाडीच्या शिष्टमंडळाने मुख्य निवडणूक अधिकारी एस चोक्कलिंगम यांची भेट घेतली

High Court : कब्रस्थान, दफनभूमीची जागा वापरता येईल? रेल्वे उड्डाणपूल प्रकरणी उच्च न्यायालयाची विचारणा

SCROLL FOR NEXT