Makar Sankranti special bhogichi bhaji bhakari recipe  esakal
लाइफस्टाइल

Makar Sankranti 2024 : मकर संक्रांत स्पेशल मसालेदार,चमचमीत भोगीची भाजी कशी बनवायची?

मकर सक्रांतीचा सण तीन दिवसांचा असतो

Pooja Karande-Kadam

Makar Sankranti 2024 :

नवं वर्ष सुरू झाल्यानंतर पहिलाच सण मकर संक्रांती आली आहे. देशभरात हा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. खरं तर अनेकांना याबद्दल माहिती नसेल पण संक्रांती केवळ एका दिवसाचा सण नाही. तो तीन दिवसांचा सण आहे. पहिल्या दिवशी भोगी, दुसरी संक्रांती आणि तिसऱ्या दिवशी किंक्रांती साजरी केली जाते.

मकर संक्रांतीच्या एक दिवस आधी भोगी हा सण साजरा केला जातो. भोगीच्या दिवशी इंद्र देवाची आठवण काढली जाते. इंद्र देवाने धर्तीवर उदंड पिक पिकावं म्हणून प्रार्थना केली होती, अशी मान्यता आहे.

या दिवशी सुगडाची पूजा करून सुवासिनी बाजरीची भाकरी आणि मिक्स भाजी बनवतात. पारपंरिक असलेली ही भाजी कशी बनवायची हे पाहुयात.

भोगीची भाजी खाण्याचे फायदे

हिवाळ्यात अनेक प्रकारच्या ताज्या भाज्या उपलब्ध असतात. पालेभाज्या, शेंगा यांची रेलचेल असते. त्यामुळे या सगळ्या भाज्या खाण्याचा सल्ला आपल्याला दिला जातो. पण प्रत्येकाला ते शक्य होत नाही. अशावेळी ही एकच भाजी आवडीने खाल्ली जाते. ज्यात सगळ्या पौष्टीक भाज्या घातलेल्या असतात.

भोगी दिवशी बनवल्या जाणाऱ्या या भाजीचे खास वैशिष्ट असे आहे की, या भाजीत तुम्हाला माहिती असलेल्या अनेक भाज्या घातल्या जातात. तोंडी लावले जाणारे गाजर, पावटा, हरभरा, वटाणा यांच्यासह पालेभाज्याही घातल्या जातात.

भाजीसाठी तिळापासून खास मसाला बनवला जातो. त्यामुळे शरीराला उष्णता मिळते. त्यामुळे आपल्याला साथीच्या आजारांपासून दूर राहता येते.

 भोगीच्या भाजीसाठीचे साहीत्य -

हिवाळ्यात मिळणाऱ्या तूम्हाला आवडत असतील त्या सर्व भाज्या, शेंगा, पालेभाज्या स्वच्छ धुवून निवडून घ्या. बटाटा, फ्लॉवरचे तूकडे शेवटी करू शकता.

फोडणीसाठी - २ टेस्पून तेल, २ चिमटी मोहोरी, २ चिमटी हिंग, १/४ टिस्पून हळद, १/२ टिस्पून लाल तिखट,१/४ टिस्पून जिरे

३-४ कढीपत्ता पाने

२ टेस्पून भाजलेल्या तिळाचा कूट

२ टिस्पून काळा मसाला -

२ टेस्पून चिंचेचा दाट कोळ

१ ते दिड टेस्पून किसलेला गूळ

१/४ कप ओलं खोबरं

चवीपुरते मिठ

कृती:

पातेल्यात तेल गरम करून मोहोरी, जिरे, हिंग, हळद, लाल तिखट, आणि कढीपत्ता घालून फोडणी करावी. प्रथम बटाटा, ओले चणे, पावटे, शेवग्याच्या शेंगा आणि शेंगदाणे घालून २ वाफा काढाव्यात.

नंतर वांगं आणि गाजर घालून मिक्स करावे. थोडे पाणी घालून पातेल्यावर झाकण ठेवावे. मध्यम आचेवर शिजू द्यावे.

भाज्या शिजत आल्या कि चिंच कोळ आणि काळा मसाला घालावा तसेच लागल्यास थोडे पाणी घालावे.

भाज्या शिजल्या कि गूळ, तिळाचा कूट, खोबरं घालावे. लागल्यास चव पाहून मिठ घालावे. एक उकळी काढून भाकरीबरोबर गरमागरम भाजी सर्व्ह करावी.

बाजरीची भाकरी साहीत्य -

बाजरी १ किलो, २ लवंग, तांदूळ, मीठ, तीळ

कृती - वरील सर्व साहीत्य घालून बाजरीचे पीठ दळून आणावे

त्यानंतर पिठाचा गोळा भिजवून नेहमीप्रमाणे भाकरी थापून घ्यावी. त्या भाकरीवर तीळ पसरवून घ्यावेत. तयार भाकरी तव्यात टाकून भाजून घ्यावी.

खरपूस भाकरी हवे असेल तर बारीक गॅसवर भाकरी भाजावी.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ajit Pawar: अजितदादांच्या राष्ट्रवादीचा फडणवीसांना CM पदासाठी पाठिंबा! शिंदेंसाठी दोन पर्याय कोणते? राजकारणातील मोठे संकेत

Bajarang Punia: कुस्तीपटू बजरंग पुनियावर चार वर्षांची बंदी! नेमकं काय घडलंय?

Sakal Podcast : बंद होणार जुनं पॅनकार्ड! ते दिग्दर्शक नागराज मंजुळेंना समन्स

Uddhav Thackeray: ठाकरेंच्या हातातून मुंबई महापालिकाही जाणार? वाचा काय आहेत पक्षा पुढील आव्हानं

Amit Thackeray: 'हे फक्त शब्द नाहीत तर इशारा आहे !' अमित ठाकरेंची पोस्ट 'या'मुळे चर्चेत

SCROLL FOR NEXT