लाइफस्टाइल

अभ्यंगस्नानासाठी घरीच तयार करा 'आयुर्वेदिक उटणे', जाणून घ्या फायदे?

शरयू काकडे

दिवाळीचा सण आला की पहाटे उठून अभ्यंगस्नान केले जाते. नरक चतुर्दशीच्या दिवसापासून अभ्यंगस्नान करण्याची प्रथा आहे. अंगाला तेल, उटणी आणि अत्तर लावून उष्णोदकाने स्नान करणे याला अभ्यंगस्नान म्हणतात.याला मांगलिकस्नान असेही म्हणतात. अंभ्यगस्नानामध्ये उटण्याला खूप महत्त्व आहे. चला तर मग जाणून घेऊ या उटणे म्हणजे काय? त्याचे फायदे काय? कसे बनवायचे उटणे?

उटणे म्हणजे काय?

उटणे हा एक नैसर्गिक फेसमास्क आहे. उटण्यामध्ये अनेक औषधी गुण असतात. फक्त दिवाळीतच नव्हे तर हे नियमित उटणे लावल्यास तुमची त्वचा अधिक मुलायम आणि ताजीतवाणी राहते. उटण्यामध्ये सहसा बेसनाचे पीठ, चंदन पावडर, दुध किंवा गुलाबजल वापरतात. उटण्यामध्ये बेसनाचे पीठ वापरल्यास शरीरावरील मृत त्वचा ( Dead Skin)काढून टाकण्यासाठी फायदेशीर ठरते. चंदन पावडरमध्ये कित्येक आयुर्वेदक गुण आहे. तिचा उटण्यामध्ये वापर केल्यास त्वचेवरील जास्तीचे तेल निघून जाते. उटण्यामध्ये दुधाचा वापर केल्यास त्वचेवरील काळे डाग दूर होतात आणि चमकही वाढते

आयुर्वेदिक पध्दतीने उटणे कसे तयार करावे?

साहित्य

मसूर डाळ पीठ -१००gm

सुगंधी काचोरा- १००gm

गुलाब चूर्ण - ५०gm

गुळवेल चूर्ण - ५०gm

जेष्ठमध चूर्ण - ५०gm

चंदन चूर्ण - ५०gm

हळद चूर्ण - ५०gm

कमळ चूर्ण - ५०gm

कृती :

सर्व चुर्ण वस्त्रगाळ करुन घ्या. उटणे वापरण्यासाठी तयार आहे. उटण्यामध्ये दुध किंवा तेल टाकून मिश्रण तयार करावे. उटणे अंगाला लावण्याआधी तेलाने मालिश करावी.

उटण्याचे फायदे

डागविरहीत त्वचेसाठी (Gives Clear Skin)

कित्येक जणांना त्वचेवर मुरम येतात आणि त्याचे डाग पडतात. काही जणांचा चेहरा प्रदुषणामुळे काळा पडतो. तर काहींच्या चेहऱ्यावर सुरकुत्या दिसू लागतात. या समस्यांपासून सुटका मिळविण्यासाठी तुम्ही उटण्याचा वापकर करू शकता. तुम्ही नियमित उटण्याचा वापर तुम्हाला नक्कीच फायदा होईल. तुम्ही नेहमी बाहेर फिरत असाल तर तुमच्यासाठी उठणे हा उत्तम उपाय आहे. तसेच टॅन झालेली त्वचा उजळविण्यासाठी उटण्याचा फायदा होतो

शरीरावर नको असलेले केस काढण्यासाठी (Remove Body Hair)

आपल्या शरीरावर नको असलेले केस काढण्याचे असेल तरीही तुम्ही उटणे वापरू शकता. पुर्वी नवजात बालकाच्या अंगावरील लव काढून टाकण्यासाठी उटण्याचा वापर करत असे. वास्तविक उटणे हा शरीरावरील केस काढून टाकण्यासाठी नैसर्गिक आणि सुरक्षित पर्याय आहे.

अॅक्ने रोखण्यास मदत (Prevents Acne)

उटण्यामुळे तुमच्या चेहऱ्याव तेज येते. उटण्यामधील नैसर्गिक औषधी गुणांमुळे तुमची त्वचा मुलायम आहे ताजीतवानी होते.

त्वचेवर कांती सुधारण्यासाठी (Skin Glow)

उटणे हा एक नैसर्गिक फेसमास्क आहे. ज्यामध्ये अनेक औषधीय गुण आढळतात. हे नियमित स्वरूपात लावल्यास, तुमची त्वचा अधिक ताजीतवानी आणि मऊ मुलायम राहते. .

(डॉ. स्नेहल जाधव या आयुर्वेदीक वैद्य आहेत.)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Dolly Chaiwala: डॉली चायवाला भाजपचा स्टार प्रचारक! नागपूरमध्ये केला महायुतीसाठी प्रचार

SA vs IND: 23 Six, 17 Fours! जोहान्सबर्गच्या मैदानात सॅमसन-तिलकचं वादळ; भारताचं द. आफ्रिकेला तब्बल 284 धावांचं लक्ष्य

SA vs IND: संजू सॅमसनने तिसऱ्या शतकासह रचला इतिहास! तिलक वर्मानेही ठोकली सलग दुसरी Century

Assembly Elections: २४ ते ३० मतदारसंघ महत्त्वाचे! दोन्ही आघाड्यांना बंडाचा फटका बसणार,'शांती' यज्ञासाठी पळापळ सुरू

Dhruv Rathee: ध्रुव राठीचं चॅलेंज आदित्य ठाकरेंनी स्वीकारलं! ‘मिशन स्वराज’साठी शेअर केली मुद्द्यांची यादी

SCROLL FOR NEXT