Skin Care Tips sakal
लाइफस्टाइल

Skin Care Tips: सुंदर आणि चमकदार त्वचा मिळवण्यासाठी डाएट मध्ये करा हे 4 बदल

स्किनकेअर रूटीनसोबतच सुंदर दिसण्यासाठी डाएटही महत्त्वाची भूमिका बजावतो.

Aishwarya Musale

आपण सुंदर दिसावं अशी प्रत्येकाची इच्छा असते. लोक सुंदर दिसण्यासाठी वेगवेगळे प्रकार ट्राय करत असतात. काही लोक त्याचबरोबर त्वचेची काळजी घेणारे महागडे उपचार देखील घेतात. पण तुम्हाला माहित आहे का की, सुंदर दिसण्यासाठी स्किनकेअर रूटीनसोबतच डाएटही महत्त्वाची भूमिका बजावतो.

आहारातील काही गोष्टींचे पालन करून तुम्ही स्वत:ला सुंदर आणि हेल्दी बनवू शकता. आज आम्ही तुम्हाला सांगतो की चमकदार त्वचा मिळवण्यासाठी आपण कोणत्या गोष्टी फॉलो केल्या पाहिजेत?

चमकदार त्वचा मिळवण्यासाठी फॉलो करा या टिप्स

लिंबूपाण्याने दिवसाची सुरुवात करा

सकाळी उठल्यानंतर अनेक लोकांना थेट चहा किंवा कॉफी पिणे आवडते, परंतु आपल्यासाठी असे करणे चुकीचे ठरू शकते. सकाळी रिकाम्या पोटी लिंबूपाण्याचे सेवन करावे. जर तुम्ही सकाळी रिकाम्या पोटी चहा किंवा कॉफी पिली तर अॅसिडिटीची समस्या उद्भवू शकते, म्हणून लिंबूपाण्याने दिवसाची सुरुवात केल्यास शरीर डिटॉक्स होण्यास मदत होते.

हलका नाश्ता करा

तुम्ही जर अशा लोकांपैकी असाल जे सकाळी नाश्ता करत नाहीत तर असे करू नका कारण नाश्ता न केल्याने तुमचे आरोग्य आणि त्वचा दोन्ही खराब होऊ शकते. त्यामुळे नाश्ता करणे विसरू नका. रोज थोडा तरी नाश्ता करायलाच हवा.

ABC चा रोज ज्यूस प्या

गलोविंग स्किन हवी असेल तर रोज ABC चा ज्यूस प्यावा. एबीसी म्हणजे सफरचंद, बीटरूट आणि गाजराचा ज्यूस. ते प्यायल्याने चेहरा सुंद दिसतो.

रोज फळे खा

दररोज फळांचे सेवन करावे. फळांमध्ये अँटीऑक्सिडंट्स आणि व्हिटॅमिन्स असतात जे त्वचा निरोगी ठेवण्यास मदत करते, म्हणून फळांचे दररोज सेवन केले पाहिजे.

पाणी भरपूर प्या

तुम्हला जर निरोगी त्वचा हवी असेल तर भरपूर पाणी प्या. पाणी प्यायल्याने त्वचेवर सुंदर चमक येते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana: आनंदाची बातमी, या तारखे पासून लाडक्या बहिणींना मिळणार 2100 रुपये, मोठी अपडेट आली समोर!

Mumbai Fire: रात्रीच्या वेळी मुंबईजवळ भीषण आग; ६ बस जाळून खाक, वाचा नक्की काय घडलं

IPL Mega Auction 2025: Mumbai Indians ने पायावर धोंडा मारून घेतला; 32.5 cr खिशात असूनही चांगला खेळाडू जाऊ दिला

आजचे पंचांग आणि दिनविशेष - 25 नोव्हेंबर 2024

आजचे राशिभविष्य - 25 नोव्हेंबर 2024

SCROLL FOR NEXT