तुम्ही भेगा पडलेल्या टाचांना लपवण्याचा प्रयत्न करता का? भेगा पडलेल्या टाचांवर उपचार करण्यासाठी बाजारात उपलब्ध स्किन केअर उत्पादने हा एकमेव पर्याय नाही. टाचांची भेगा दूर करण्यासाठी आम्ही तुम्हाला काही घरगुती उपाय सांगणार आहोत. प्रथम आपण टाचांना भेगा पडण्याची कारणे जाणून घेऊया.
भेगा पडलेल्या टाचांच्या आजूबाजूला कोरड्या त्वचेमुळे क्रॅक्ड हील्स होतात. टाचांची त्वचा शरीराच्या इतर भागाच्या त्वचेपेक्षा जाड आणि कोरडी असते. त्यामुळे ते सहज ड्राय होते. याचे काही सामान्य कारणे आहेत.
त्वचेचा कोरडेपणा : टाचांच्या त्वचेला ओलावा देणाऱ्या तेलांचे उत्पादन कमी होते. यामुळे त्वचा कोरडी आणि खडबडीत होते.
जास्त वेळ उभे राहणे किंवा चालणे : जास्त वेळ उभे राहिल्याने किंवा चालल्याने टाचांवर दबाव येतो.
योग्य शूज न घालणे: कडक, घट्ट किंवा खराब फिटिंग शूज टाचांवर दबाव आणू शकतात आणि कोरडेपणा आणू शकतात.
व्हिटॅमिन आणि मिनरल्सची कमतरता: व्हिटॅमिन ए, ई आणि सी आणि झिंकची कमतरता त्वचेला आर्द्रता प्रदान करण्यास मदत करत नाही. त्यामुळे त्वचा कोरडी आणि भेगा पडण्याची शक्यता वाढते.
आजार : काही त्वचेच्या आजारांमुळे टाच कोरडी आणि भेगा पडण्याची शक्यता असते.
भेगा पडलेल्या टाचांसाठी घरगुती उपाय
- टाच कोमट पाण्यात भिजवा आणि नंतर प्युमिस स्टोनने घासून घ्या. हे मृत त्वचा काढून टाकण्यास मदत करेल.
- टाचांवर कोरफडीचे जेल किंवा शिया बटर लावा. हे नैसर्गिक मॉइश्चरायझर्स आहेत, जे कोरड्या त्वचेला बरे करण्यास मदत करतात.
- टाचांवर पेट्रोलियम जेली लावा आणि मग मोजे घाला. यामुळे टाचांना ओलावा मिळेल आणि ते रात्रभर सुरक्षित राहतील.
- टाचांवर खोबरेल तेल किंवा मोहरीचे तेल लावून रात्रभर राहू द्या. हे नैसर्गिक तेले कोरडी त्वचा बरे करण्यास आणि ओलावा प्रदान करण्यात मदत करतात.
- नारळाचे दूध दिवसातून दोनदा टाचांवर लावा. नारळाचे दूध हे नैसर्गिक मॉइश्चरायझर आहे, जे कोरड्या त्वचेला बरे करण्यास मदत करते.
- टाच कोमट पाण्यात भिजवा आणि नंतर प्युमिस स्टोनने घासून घ्या.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.