Mangal Dosh Remedies esakal
लाइफस्टाइल

Mangal Dosh Remedies: कुंडलीत मंगळ वेटोळे घालून बसलाय? लग्नच जमेना; हा उपाय करा फटक्यात लग्न होईल की नाही बघाच!

लग्न ठरत नसेल तर मंगळाची शांती घालण्यास सांगितली जाते

Pooja Karande-Kadam

Mangal Dosh Remedies: लग्नाळू लोकांची संख्या वाढतच चालली आहे. काही लोकांना मुली पसंत पडत नाहीयेत. तर काहींना स्थळ पसंत पडतं पण कुठेतरी माशी शिंकते. काही गोष्टी आडव्या येतात आणि त्यामुळे ठरत असलेलं लग्न मोडतं. अशावेळी घरातले आणि पाहुणे मंडळीही घरात, मुलाच्या पत्रिकेत दोष आहे का हे पहावयास सांगतात.

हिंदू लोकांमध्ये जन्मकुंडलीला अनन्यसाधारण महत्त्व आहे. सबंधित व्यक्तीच्या आयुष्यात घडणाऱ्या घटना या कुंडलीवरूनच ठरवल्या जातात. जसे की, करिअर, बिझनेस, लव्ह, मॅरेज सह सर्व प्रकारची माहिती मिळते.

या कुंडलीत असलेला मंगळ दोष तुमच्या लग्नाच्या आडवा येतो. त्यामुळे लग्न ठरत नसेल तर मंगळाची शांती घालण्यास सांगितली जाते. (Mangal Dosh Remedies: Unmarried Manglik people should do these measures on Tuesday for early marriage)

ज्योतिष शास्त्र असं सांगत की, ज्याच्या कुंडलीत मंगळ असतो त्याने मंगळ असलेल्या व्यक्तीशीच लग्न करावे. असे केल्याने कुंडलीतील दोष टाळला जाऊ शकतो. मंगळाचा प्रभाव कमी व्हावा यासाठी मंगळदोष निवारण करणे बंधनकारक आहे. यासाठी अर्क आणि कुंभ विवाहाची तरतूद आहे.

मंगळ दोष दूर होण्यासाठी मंगलनाथ मंदिरात ‘भात पूजा’ केली जाते. तुम्हीही मांगलिक असाल तर आजची बातमी तुमच्या कामाची आहे.

आम्ही तुम्हाला काही उपाय सांगणार आहोत. त्यात दिलेल्या माहितीनूसार तुम्ही हे उपाय उद्या म्हणजेच मंगळवारी केले तर तुमच्या कुंडलीतील मंगळाचा प्रभाव कमी होणार आहे. (Astro Tips)

मंगळ दोषाचे उपाय

- लग्न ठरण्यात मंगळाचा अडथळा ठरत असेल तर मंगळवारी लाल मिरची, मसूर डाळ आणि लाल रंगाचे कापड दान करा. हा उपाय केल्याने मंगलदोषाचा प्रभाव हळूहळू संपुष्टात येतो.

- जर तुम्ही मंगळदोषाने त्रस्त असाल तर दर मंगळवारी स्नान करून मारूतीची पूजा करा. यावेळी हनुमान चालीसा आणि सुंदरकांडाचे पठण करावे. शक्य असेल तर मंगळवारी उपवास करा. हा उपाय केल्याने मंगळदोषाचा प्रभाव दूर होतो किंवा कमी होतो.

- मंगळवारी स्नान करून घराजवळ असलेल्या मारूतीच्या मंदिरात जावे. मारूतीरायाचे दर्शन घेऊन बुंदीचे लाडू, शेंदूर किंवा चोळा अर्पण करावा. या वेळी किमान सात वेळा हनुमान चालीसाचे वाचन करा. हा उपाय केल्याने तुम्हाला काही महिन्यांतच फायदे मिळतात.

- मंगळ दोष दूर करण्यासाठी आणि कुंडलीतील मंगळ बळकट करण्यासाठी मंगळवारी पूजेच्या वेळी 'ॐ अंगारकाय नमः' आणि 'ॐ भौमाय नम:' या मंत्राचा जप करावा. या मंत्राचा जप केल्याने मांगलिक दोषामुळे लग्नात येणारे अडथळे दूर होतात.(Mangal Dosh)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: पोस्टल मतमोजणीत युगेंद्र पवार आघाडीवर; अजित पवार पिछाडीवर

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: डोंबिवलीत रवींद्र चव्हाण आघाडीवर

Maharashtra Assembly Elecation Result: महाविकास आघाडीला बहुमत मिळाले तर...प्लॅन B तयार, दगाफटका टाळण्यासाठी उचलले मोठे पाऊल

IND vs AUS: जसप्रीत बुमराहने दिवसाच्या पहिल्याच चेंडूवर घेतली विकेट अन् केला १७ वर्षात कोणाला न जमलेला पराक्रम

Maharashtra Assembly Election Result: निकालाच्या टेन्शननं बीपी वाढलंय? अशी घ्या काळजी

SCROLL FOR NEXT