Mango Side Effects :
प्रत्येक सिझनमध्ये येणारी फळ आपण खाल्ली पाहिजेत असं सांगितलं जातं. कारण, त्या प्रत्येक फळाचा आपल्य़ा आरोग्यावर चांगला परिणाम होत असतो. फळांमधून आपल्याला अनेक जीवनसत्त्वे आणि खनिजे मिळतात. हे पोषक घटक शरीराच्या चांगल्या कार्यासाठी आणि उत्तम आरोग्यासाठी आवश्यक आहेत.
पण, काही फळ आपल्या आरोग्यासाठी हानिकारक ठरतात. सगळ्यांचाच फेवरेट असलेला आंबा देखील याच वर्गात मोडतो. आंबा खाण्याचे जितके फायदे आहेत त्याहुन अधिक तर त्याचे तोटे आहेत. त्यामुळेच आज आपण आंबा चुकीच्या पद्धतीने खाल्ला तर त्याचे गंभीर परिणाम काय होतात. हे पाहुयात.
न्यूट्रिशनिस्ट किरण कुकरेजा यांच्य़ा मते, आंब्यामध्ये फायटिक अॅसिड असते. हा घटक फायदेशीर तसेच हानीकारकही ठरू शकतो. आंब्याव्यतिरिक्त अनेक बिया आणि धान्यांमध्येही तो आढळतो. ते जास्त प्रमाणात घेतल्यास शरीरात 3 गोष्टींची कमतरता निर्माण होईल.
आंबा खाण्याची योग्य पद्धत
आहारतज्ञांच्या मते आंबा खाण्याच्या किमान 1 तास आधी पाण्यात भिजवून ठेवावा. विज्ञानाचा असा विश्वास आहे की जेव्हा आपण आंबे पाण्यात भिजवतो तेव्हा अतिरिक्त फायटिक अॅसिड तुटते आणि संभाव्य नुकसानापासून संरक्षण करते.
'या' आजारांचे होणार संरक्षण
एनसीबीआयच्या संशोधनात असे दिसून आले की, हा घटक शरीरात गेल्यानंतर लोह, जस्त आणि कॅल्शियम इत्यादींचे शोषण कमी करतो. यामुळे शरीराला हे घटक मिळत नाहीत आणि रक्ताची कमतरता, कमकुवत हाडे आणि झिंक होऊ शकते.
भिजवलेल्या आंब्यामुळे उष्णता वाढणार नाही
काही लोकांच्या शरीराचे तापमान जास्त असते. थोडा आंबा खाल्ल्यानंतरही मुरुम, अॅलर्जी, त्वचेचे इन्फेक्शन होऊ लागते. पोषणतज्ज्ञांच्या मते भिजवलेले आंबे खाल्ल्याने शरीरात उष्णता वाढत नाही.
फायटिक अॅसिड देखील फायदेशीर ठरू शकते
काही संशोधन फायटिक अॅसिडचे फायदे देखील स्पष्ट करतात. संतुलित प्रमाणात हे अँटीऑक्सिडेंटसारखे काम करते असा त्यांचा दावा आहे. ज्यामुळे इन्सुलिन रेझिस्टन्स आणि मधुमेह टाळता येतो.
आंबा खाण्याचे इतर तोटे
आंब्याला लवकर पिकवण्यासाठी त्यात अनेकदा कॅल्शियम कार्बाइटचा मारा केला जातो. या केमिकलमुळे शरीराला मोठा धोका असतो. आंबा खाण्याआधी तो धुवून स्वच्छ केला जातो पण केवळ पाण्याने धुण्यामुळे त्यावरील केमिकल पूर्णत: नष्ट होत नाही.
एका मध्यम आकाराच्या आंब्यात १३५ कॅलरीज असतात. अधिक प्रमाणात आंबा खाल्याने वजन वाढते. आंब्याच्या देठाजवळ असणारा द्रव पदार्थ खाण्याआधी साफ करा. तो तसाच खाल्याने घशाला त्रास होऊ शकतो. घसा दुखू लागतो किंवा सूजही येऊ शकते.
आंबा गरम फळ आहे. त्यामुळे त्याच्या अधिक सेवनाने चेहऱ्यावर किंवा शरीरावरही मुरुम, पुरळ येऊ शकतात.
ज्या लोकांना संधिवात किंवा सायनस आहे अशा लोकांनी आंब्याचं सेवन कमी प्रमाणात करावं. कच्ची कैरी किंवा आंब्याच्या अतिसेवनाने संधिवात आणि सायनसचा आजार वाढू शकतो.
आंब्यात मोठ्या प्रमाणात साखर असते. नैसर्गिक साखर शरीरासाठी, आरोग्यासाठी चांगली असते. पण आंब्याचं अधिक सेवन केल्याने ब्लड शुगरमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होऊ शकते. मधुमेह असणाऱ्या रुग्णांनी आंब्याचं सेवन नियंत्रणात करावं.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.