mankarnika group sakal
लाइफस्टाइल

सक्षमीकरणासाठी एकजुटीचा मंत्र

सकाळ वृत्तसेवा

- मनीषा राऊत, संस्थापिका, मणिकर्णिका ग्रुप

या ग्रुपची सुरुवात २०२० मध्ये कोरोनाची पहिली लाट येऊन गेल्यावर झाली. खरंतर कोविड काळात आम्ही सर्व महिलांनी मिळून बरीच कामे केली होती. हॉस्पिटल ऑक्सिजन सिलिंडर पुरविणे, प्लाझ्मा डोनर शोधून देणे ही कामे करत असतानाच आपण अशा प्रकारे फक्त महिलांसाठी ग्रुप सुरू करूयात ही कल्पना डोक्यात आली.

साधना शाळेच्या आम्ही माजी विद्यार्थिनी मिळून स्वतः भांडवल उभे करून हे मदत कार्य करत होतो. ही सर्व कामे ग्रुपमध्येच चालायची, फक्त त्यांना ऑफिशियल प्लॅटफॉर्म नव्हता. त्यावेळी आम्ही हा ग्रुप सुरू केला. कोविडमध्ये अनेक महिला घरी बसल्या होत्या. त्यांना पैसे कमवण्याची गरज होती. हे लक्षात घेऊन अशा महिलांसाठी आपण एक व्यवसायविषयक खरेदी-विक्रीचा व्हाॅट्सअॅप ग्रुप तयार करूया हे सुचले.

या ग्रुपवर अनेक महिला त्यांनी बनवलेले पदार्थ व वस्तू सहजरित्या विकू शकत होत्या आणि त्या कठीण काळात पैसे कमावू शकत होत्या. यासाठी महिलांचा प्रतिसाद खूप वाढत गेला. यावर दररोज मोठ्या संख्येने खूप फोटोज; तसेच खरेदी-विक्री संदर्भात मेसेजेस येऊ लागले. त्यानुसार आम्ही काही नियम बनवले.

प्रत्येक प्रकारासाठी वार ठरवून दिले. दहा फोटोजचे लिमिट ठेवले. जसे की, सोमवारी स्त्रियांनी बनवलेले अन्नपदार्थ वा टिकणारे खाद्यपदार्थ, मंगळवारी साड्या, ब्लाउज, बांगड्या, पर्सेस; तसेच बुधवारी आरोग्य क्षेत्रात काम करणाऱ्यांकडून औषधेविक्री, आरोग्यासंदर्भातील वस्तू आदी नियम लावून दिले.

मणिकर्णिका हा खरेदी-विक्रीबाबतचा मोफत ग्रुप आहे. सुरुवातीला व्हाॅट्सॲपवर सुरू असणारा हा ग्रुप पुढे फेसबुकवरही सुरू केला. तिथे खूप नियम नव्हते. कोविड काळात आम्हाला काम करण्यासाठी प्रेरणा मिळाली. आपण किती उपयोगी पडू शकतो हे कोविडमुळे आम्हाला समजलं. पुढे ग्रुपचा विस्तार प्रचंड वाढत गेला. आत्तापर्यंत एकंदरीत साडेसात ते आठ हजार महिला या माध्यमातून जोडल्या गेलेल्या आहेत.

यावेळी महिलांसाठी करण्याचे दोन-तीन मुद्दे होते. पहिला मुद्दा म्हणजे स्त्रियांना स्वावलंबी बनवायचे होते. त्यांना पैसे मिळवण्यासाठी मार्ग तयार करून द्यायचे होते. व्यवसाय उभे करण्यासाठी मदत; तसेच त्यासाठी डिजिटल अथवा मोबाईलचा वापर करून व्यवसाय कसा करावा याचे आणि इतर गोष्टींचे आम्ही प्रशिक्षण दिले. दुसरा मुद्दा म्हणजे महिलांकडून दुर्लक्ष होत असलेली गोष्ट म्हणजे त्यांचे आरोग्य.

आधी जर त्यांना हेल्थचेकअपसाठी विचारलं, तर त्या पैसे नाहीत वगैरे कारणे द्यायच्या. ग्रुपच्या माध्यमातून त्यांना पैसे कमवण्याचे मार्ग उपलब्ध करून दिले आणि त्यानंतर त्यांच्या आरोग्यासाठी आवश्यक असलेला चाचण्या करण्यासाठी त्यांना सजग केले. यासाठी ग्रुपमार्फत ब्रेस्ट कॅन्सर; बोन डेन्सिटी आदींसंदर्भात मोफत शिबिरे आयोजित केली जातात.

ग्रुपच्या कामाचा विस्तार

सणवार, संस्कृती कुठे तरी लोप होत आहे असे वाटत असल्याने महिलांसाठी नागपंचमी, मंगळागौर, वटपौर्णिमा यांसारखे सामाजिक कार्यक्रम आम्ही घेतो. नवरात्रीत कामगार महिलांना साडीवाटप करतो. हडपसर परिसरात मोफत आरोग्य तपासणी, लसीकरण शिबिरांचे आयोजन केले जाते. महिलांसाठी मेन्स्‍ट्रुअल कपचे वाटप आम्ही केले; तसेच या विषयांवर तज्ज्ञ डॉकटरांचे मार्गदर्शनही आयोजित करतो.

स्तनाच्या कर्करोगाबाबत मोफत तपासणी शिबिर, सॅनिटरी पॅडचे वाटप, गरजू महिलांना मोफत प्रशिक्षण व कर्जवाटप असे अनेक उपक्रम आम्ही ग्रुपच्या माध्यमातून राबवत आहोत. मला प्रत्येक महिलेला सांगावेसे वाटते, की प्रत्येकाचे व्यक्तिमत्त्व वेगळे असते.

प्रत्येक स्त्रीने तिच्यातले वेगळेपण ओळखले, तर ती काहीही करू शकते. तिने तिच्यातला स्पार्क ओळखून त्यानुसार काम करावे. एक स्त्रीच घरापासून समाजापर्यंत बदल घडवून आणू शकते.

(शब्दांकन : प्रियांका सत्यवान)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींचे टपालात दीड लाख खाती; जिल्हाभरातील महिलांची पसंती

IND vs NZ, Test: जड्डू मानलं तुला! किवींच्या दोन फलंदाजांचे उडवले त्रिफळे, भारताचे दमदार पुनरागमन

Model Code Of Conduct: विधानसभेचा धुरळा... आचारसंहितेत काय करता येते अन् काय नाही? जाणून घ्या एका क्लिकवर

Ratan Tata: कोणाला मिळणार 7,900 कोटी रुपये? रतन टाटांच्या मृत्यूपत्राची अंमलबजावणी कोण करणार?

Rishabh Pant कसोटी मालिकेला मुकण्याची चिन्ह; तिसऱ्या दिवशी मैदानावर नाही आला, BCCI ने दिले अपडेट्स

SCROLL FOR NEXT