Manu Bhakra On Bhagavad Gita  esakal
लाइफस्टाइल

Parenting Tips : ऑलिंम्पिकमध्ये पदक जिंकण्यासाठी मनू भाकरला भगवद्गीतेने केली मदत; तुम्हीही मुलांना हे धडे द्या, यशस्वी होतील

सकाळ डिजिटल टीम

Manu Bhakra On Bhagavad Gita :  

पॅरिस ऑलिंम्पिकमध्ये १० मीटर एअर पिस्तुल प्रकारात मनू भाकर हिने ब्राँझपदक मिळवले आहे.तिने घेतलेल्या मेहनतीचेच हे फळ आहे. मनुचे रौप्यपदक थोडक्यात हुकले असले तरी तिने भारतीयांची मनं जिंकली आहेत.

या स्पर्धेनंतर मनुला जेव्हा ती स्पर्धेच्या शेवटच्या क्षणी काय विचार करत होती. याबद्दल विचारलं तेव्हा तिने भगवद्गीतेतील एक अध्यायाचे चिंतन करत होते असे ती म्हणाली.

मुलांनी जिंकावं, प्रत्येक स्पर्धेत नाव गाजवावं असं प्रत्येक पालकांना वाटत असतं. यासाठी पालक मुलांना अकॅडमी, कोचिंग क्लासेसमध्ये घालतात. पण, तुम्हाला माहितीय का? मुलांना शाळेतच नाहीतर जीवनात यशस्वी होण्यासाठी भगवद्गीतेतील पाठ, रामायणातील धडे हे सुद्धा तितकेच महत्त्वाचे आहेत.

अर्जुनाचा पुत्र अभिमन्यू याने देखील आईच्या गर्भातच चक्रव्युह भेदन्याचा धडा मिळवला होता. मुलं जन्माला आल्यानंतर प्रत्येक गोष्ट पालक मुलांना शिकवत असतात. चालणं-बोलणं-वागण, शाळेतील अभ्यास या सर्वच गोष्टी त्यांच्यासाठी महत्त्वाच्या आहेत. पण मुलांना प्रोत्साहीत करण्यासाठी रामायण-भगवद्गीतेतील अध्यायही तितकेच गरजेचे आहेत.

मनू भाकर हिने ऑलम्पिकमध्ये पदक जिंकले. पण त्या स्पर्धेच्या काही क्षण आधी तिला जे काही आठवत होतं. ज्यामुळे ती हे ध्येय गाठू शकली. देशासाठी ब्राँझ पदक पटकावू शकली.

गीतेमध्ये कृष्णाने अर्जुनाला सांगितलेय, तू तुझे कर्म करत राहा... पुढचा विचार करू नको. मीसुद्धा तेच केले. अंतिम क्षणी माझ्या मनातही तोच विचार होता. आपल्या ध्येयावर मी लक्ष केंद्रीत केले होते, असे मनूने सांगितले होते. हा भगवद्गीतेतील अध्याय आणि त्यातून मुलांना कसं शिकवावं याबद्दल जाणून घेऊयात.

काय आहे भगवद्गीता

महाभारतात युद्ध सुरू होण्याच्या अगदी आधी, कुरुक्षेत्र रणांगणाच्या मध्यभागी भगवान श्रीकृष्णाने पांडवपुत्र अर्जुनला उपदेश केला. श्रीकृष्णाने अर्जुनाला दिलेला उपदेश श्रीमद भागवत गीता या नावाने प्रसिद्ध आहे. भगवद्गीता हा महाभारतातील भीष्मपर्वाचा एक भाग आहे. या ग्रंथात १८ अध्याय आणि ७०० श्लोक आहेत. गीतेतील अनेक श्लोक जीवनाचे तत्वज्ञान आणि जगण्याची कला शिकवतात.

कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन।

मा कर्मफलहेतुर्भूर्मा ते सङ्गोऽस्त्वकर्मणि॥

प्रत्येकालाच अशी सवय असते की, एखादे काम केले तर त्याचा निकाल काय लागेल, याची आपण आतुरतेने वाट पाहत असतो.  अशा परिस्थितीत हा श्लोक त्यांना खूप उपयोगी पडू शकतो. या श्लोकाचा अर्थ असा आहे की तुमचा अधिकार फक्त तुमच्या कामावर आहे. तुमच्या कामानंतर मिळणाऱ्या फळावर नाही. म्हणूनच, चांगले परिणाम होतील, म्हणून एखादे काम करू नका. तर पवित्र हेतूने काम करत रहा.

ध्यायतो विषयान्पुंसः सङ्गस्तेषूपजायते।

सङ्गात्संजायते कामः कामात्क्रोधोऽभिजायते॥

काही लोक मोठ-मोठ्या वस्तूंचा सतत विचार करतात. त्यामुळे त्यांच्यामध्ये इच्छा निर्माण होतात आणि त्यांच्या इच्छांमध्ये अडथळा निर्माण होऊन क्रोध निर्माण होतो. त्यामुळे कोणत्याही गोष्टीच्या आसक्तीपासून दूर राहून कामात मग्न राहण्याचा प्रयत्न करा.

एखादी गोष्ट पाहताच मुलं हट्ट करू लागतात. आणि जेव्हा ती मिळत नाही तेव्हा ते पटकन रागावतात. अशी परिस्थिती टाळण्यासाठी हा श्लोक त्यांना नक्की समजावून सांगा.

क्रोधाद्भवति संमोह: संमोहात्स्मृतिविभ्रम:।

स्मृतिभ्रंशाद्बुद्धिनाशो बुद्धिनाशात्प्रणश्यति॥

रागाने माणसाची बुद्धी भ्रष्ट होते. बुद्धी भ्रष्ट झालेला व्यक्ती स्वत:चाही नाश करतो. काही लहान मुलं सतत राग-राग करत असतात. जे रागात लोळतात, हात- पाय झटकतात, रूसून बसतात. पण मुलांच्या या रागाला आपण कंट्रोल करायला गेलो तर ते अधिकच चिडतात. त्यामुळे, मुलांना त्यांच्या रागाचे दुष्परिणाम सांगा. त्यांच्या या स्वभावामुळे मुलांचे किती नुकसान होऊ शकते हे सांगा.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Narendra Modi: विदर्भ बदलतो संपूर्ण महाराष्ट्राचे राजकारण, ढासळलेला बालेकिल्ला नरेंद्र मोदी मजबूत करणार? वर्धा दौरा का आहे स्पेशल?

Crime: तक्रार केलीस तर... धमकी देत १३ वर्षीय मुलावर अत्याचार, ५० वर्षीय नराधमाचं कृत्य, मुलुंडमध्ये खळबळ

Latest Marathi News Updates : शरद पवार यांनी मुंबईतील त्यांच्या निवासस्थानी पक्षाच्या नेत्यांची बैठक घेतली

Shama Sikander : बालवीर फेम शमा सिकंदरने केला होता आयुष्य संपवण्याचा प्रयत्न ; खुलासा करत म्हणाली "हॉस्पिटलमध्ये मला दाखल..."

Share Market At Record High: शेअर बाजाराने केला नवा विक्रम, सेन्सेक्स पहिल्यांदाच 84 हजारांवर पोहोचला

SCROLL FOR NEXT