how to prevent diabetes Esakal
लाइफस्टाइल

Diabetes Prevention: ‘या’ छोट्या सवयींमुळे वाढू शकते तुमची ब्लड शुगर, त्वरित बदला या सवयी

गेल्या दशकभरात भारतात दिवसेंदिवस डायबेटिस म्हणजेच मधुमेही रुग्णांच्या संख्येत भर पडत आहेत. यात बदलत्या जीवनशैलीशी निगडीत चुकीच्या सवयी किंवा अनुवांशिकता हे कारण आहे

Kirti Wadkar

How to prevent diabetes: गेल्या दशकभरात भारतात दिवसेंदिवस डायबेटिस म्हणजेच मधुमेही रुग्णांच्या संख्येत भर पडत आहेत. यात बदलत्या जीवनशैलीशी निगडीत चुकीच्या सवयी किंवा अनुवांशिकता हे कारण आहे.

केवळ मोठ्यांनाच नव्हे तर अलिकडे कमी वयातच ब्लड शुगर Blood sugar वाढण्याच्या समस्या निर्माण झाल्या आहेत. केवळ अति गोड खाण्याने ब्लड शुगर वाढते किंवा मधुमेह होत हा समज पुर्णपणे चुकीचा आहे.

रोजच्या जीवनातील अनेक छोट्या छोट्या सवयी या डायबेटीससाठी Diabetes कारणीभूत ठरू शकतात यामुळे सगळ्यात आधी या सवयी बदलणं गरजेचं आहे. Many Bad Habits can increase blood sugar Diabetes News

मधुमेहामुळे आरोग्याच्या अतर समस्याही उद्भवतात. हृदयाशी निगडीत समस्या, किडनी तसचं फुफुसाशी निगडीत आजार होण्याचा धोका वाढतो. त्यामुळे योग्य काळजी घेणं गरजेचं आहे.

खास करून ज्यांना आधीच मधुमेह आणि किंवा ज्यांच्या आई- वडील किंवा आधीच्या पिढीत मधुमेह असेल genetic diabetes अशांनी विशेष काळजी घेणं गरजेचं आहे. यासाठी रोजच्या चुकीच्या सवयींमध्ये आधी बदल करणं गरजेच आहे. 

हे देखिल वाचा-

नाश्ता न करणे

सकाळची वेळ ही धावपळीची, कॉलेज, ऑफिसला निघण्याची तसचं घरातील महत्वाची कामं करण्याची वेळ असल्याने अनेकजण सकाळचा नाश्ता करत नाहित किंवा तो वेळेत करत नाही. मात्र नाश्ता न करणं हे धोक्याचं ठरू शकतं.

मधुमेही रुग्णांना डॉक्टर जास्त तास उपाशी न राहण्याचा सल्ला देतात. रात्रीपासून जवळपास १० तासांहून अधिक काळ काही न खाणं शरीरासाठी धोकादायक आहे.

यामुळे चयापचय क्रिया बिघडचे आणि शरीराचं वजन वाढू शकतं तसंच जास्त तास उपाशी राहिल्याने रक्तातील शुगर वाढू शकते. यामुळे सकाळी उठल्यानंतर किमान ४० मिनिटांच्या आत नाश्ता करणं गरजेचं आहे. Don’t skip breakfast

अनेक तास एकाच जागेवर बसणं

अनेक तास एकाच जागेवर बसणं हे मधुमेही रुग्णांसाठी तसचं मधुमेह होण्याच्या दृष्टीने धोकादायक आहे. अनेक तास एकात जागेवर बसल्याने चयापचय Metabolism क्रियेवर परिणाम होतो.

अनेक तास एकाच जागेवर बसल्याने टाईप- 2 बायबेटीज होण्याची शक्यता वाढते असं एका संशोधनात समोर आलं आहे. त्यामुळेच तुम्ही घरी असाल किंवा ऑफिसमध्ये एकाच जागी जास्तवेळ न बसता दर तासाने जागेवरून उठून हालचाल करावी. यामुळे तुमच्या स्नायुंनाही आराम मिळेल. 

रिफाइंड कार्ब्स असलेला आहार टाळावा

तज्ञांच्या मते आहारात रिफाइंड कार्ब्स एवजी कॉम्प्लेक्स कार्बचा वापर करावा. म्हणजेच पांढऱ्या तांदळाएवजी ब्राऊन राईस खाणं जास्त आरोग्यदायी ठरेल. तसचं मैदाचा किंवा व्हाईट ब्रेड खाण्याएवजी मल्टीग्रेन ब्रेडचा पर्याय निवडावा.

रिफाइंड कार्ब्स refined carbs रक्तातील सारखरेचं प्रमाण वाढण्यास मदत करत. हे पदार्थ खाल्लायने लगेच पचतात आणि पुन्हा सारखी भूक लागते. बिस्किट, पास्ता, केक, पेस्ट्री, मिठाई, पांढरा भात या पदार्थांमध्ये रिफाइंड कार्ब अधिक असतात. 

शुगर असलेल्या ड्रिंक्सचं सेवन टाळावं

घरगुती पारंपरिक सरबतांची जागा आता कोल्ड ड्रिंक्स किंवा बाजारात उपलब्ध असलेल्या टेट्रा पॅक आणि बाटल्यांमधील वेगवेगळ्या ज्युसने घेतली आहे. या ड्रिक्समुळे मधुमेह वाढण्याचा धोका अधिक असतो. कोल्ड ड्रिक किंवा कार्बोनेटेड ड्रिंक्समध्ये कार्ब्स सोबतच साखरेचं प्रमाण अधिक असतो त्यामुळे रक्तातील शुगर जलद गतीने वाढते.

त्याचसोबत टेट्रा पॅक आणि बाटल्यांमध्ये मिळणाऱ्या ज्युसमध्येही नैसर्गिक फळाचा रस कमी प्रमाणात असून वेगवेगळ्या प्रकारात शुगर वापरण्यात आलेली असते. यामुळे हे ज्यूस पिणं टाळावं. या एवजी एखाद्या मिल्कशेकचा पर्याय कधीही चांगला. तसंच कमी फॅट असलेल्या दूधाचं सेवनही करू शकता. 

हे देखिल वाचा-

आर्टिफिशियल स्विटनर धोकादायक

अलिकडे अनेक लोग आर्टिफिशियल स्विटनरचा artificial sweeteners उपयोग करू लागले आहेत. आर्टिफिशियल स्विटनरमुळे रक्तातील साखरही वाढणार नाही आणि गोड खाण्याची मजा लुटता येईल असा अनेकांचा समज आहे.

मात्र हा समज पूर्णपणे चुकीचा आहे. हे स्विटनर इंसुलिन रेजिस्टेन्स आणि ब्लड शुगरची पातळी नियंत्रणात ठेवण्याच्या शरिराच्या क्षमतेवर निगेटीव्ह प्रभाव टाकतात. त्यामुळेच या स्विटनरचा जास्त काळ आहारात समावेश केल्यास रक्तातील साखरेचं प्रमाण वाढण्याचा धोका अधिक असतो. यापेक्षा काही प्रमाणात गूळ किंवा शुद्ध मधाचा वापर करू शकता. avoid artificial sweeteners

पुरेशी झोप गरजेची

कमी झोप झाल्याने तणाव वाढू शकतो. वाढत्या तणावामुळे कार्टिसोल हार्मोन तयार होतात ज्यामुळे शरिरात इंसुलिन रेजिस्टेन्स आणि ब्लड शुगरचं प्रमाण वाढतं. अलिकडे बदललेल्या जीवनशैलीमध्ये पुरेशी झोप न घेणं हे मधुमेह वाढण्यासाठी एक महत्वाचं कारण ठरतंय. त्यामुळे पुरेशे म्हणजेच रात्रीची किमान ७-८ तासांची झोप घेणं गरजेचं आहे.

धुम्रपानामुळे वाढते रक्तातील साखऱ

अमेरिकेतील सेंटर फॉर डिजीज कंट्रोल अण्ड प्रिवेंशनच्या माहितीनुसार धूम्रपान केल्याने ब्लड शुगरचं नियंत्रण राखणं कठीण होतं. टाइप-2 मधुमेह होण्यासाठी धूम्रपान हे एक महत्वाचं कारण आहे. smoking causes type 2 diabetes. 

याशिवाय अधिक तणाव हे देखील मधुमेहासाठी महत्वाचं कारण आहे. तणावरिहत आरोग्यासाठी योगसाधना हा उत्तम पर्याय ठरू शकतो. त्याचसोबत करोना काळानंतर अमेरिके केलेल्या एका सर्वेक्षणातून एकाकीपणा हा देखील टाईप-२ डायबेटीस वाढण्यासाठी कारणीभूत असल्याचं समोर आलं होतं.

जे लोक जास्त काळ एकटे राहतात, इतर लोकांशी जास्त भेटीगाठी करत नाहित अशा लोकांमध्ये टाईप-२ डायबेटीस होण्याची शक्यता वाढते असं या सर्वेक्षणातून समोर आलं होतं. त्यामुळे रोजच्या खाण्यापिण्याच्या सवयी, आहाराच्या वेळा यांकडे लक्ष पुरवल्यास आणि योग्य जीवनशैलीचा अवलंब केल्यास मधुमेह नियंत्रणात ठेवण्यास किंवा मधुमेहापासून बचाव होण्यास मदत होईल. 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Govt of India: भारत सरकारने विकिपीडियाला बजावली नोटीस, केला 'हा' गंभीर आरोप

IPL Auction 2025: CSK vs MI यांच्यात पाच खेळाडूंसाठी रंगणार वॉर! दोन्ही संघ मागे नाही हटणार

Share Market Closing: शेअर बाजारातील घसरणीला ब्रेक! सेन्सेक्स 700 अंकांनी वाढला; निफ्टी 24,200च्या जवळ

CJI DY Chandrachud : सरकारविरोधात निकाल म्हणजेच न्यायव्यवस्थेचे स्वतंत्र असे नाही; सरन्यायाधीशांचे खडे बोल

Latest Marathi News Updates live : इतरांकडे असलेल्या चांगल्या गोष्टी पंतप्रधानांना दिसत नाहीत- खर्गे

SCROLL FOR NEXT