उपगोग ब्राऊन शुगरचा Esakal
लाइफस्टाइल

Brown Sugar Skin Benefits- ब्राऊन शुगरचा असा करा वापर, त्वचा दिसू लागेल तरुण

चेहरा स्क्रब करण्यासाठी बाजारामध्ये विविध स्क्रबर उपलब्ध असले तरी यातील केमिकल्समुळे अनेकदा स्किन डॅमेज होण्याची अधिक शक्यता असते. यासाठीच तुम्ही ब्राऊन शुगर हा एक नैसर्गिक पर्याय नक्की ट्राय करू शकता

Kirti Wadkar

अनेकजण आरोग्याची काळजी घेत असताना साखरेला पर्याय म्हणून ब्राऊन शुगरचा Brown Sugar वापर करू लागले आहेत. ब्राउन शुगरचे जसे आरोग्यासाठी फायदे आहेत तसेच त्वचेसाठी देखील ब्राऊन शुगरचे अनेक फायदे आहेत. Marathi Beauty Tips Brown Sugar Benefits for Skin

ब्राऊन शुगरमध्ये Brown Sugar कॅल्शियम, मॅग्नेशियम, पोटॅशिय आणि व्हिटॅमिन बी सह अनेक पोषक तत्व आहेत जी त्वचेसाठी फायदेशीर ठरतात. चेहऱ्याची काळजी घेत असताना चेहरा स्क्रब करणं अत्यंत गरजेचं आहे.Face Scrubbing मुळे त्वचेवरील घाण स्वच्छ होण्यास तर मदत होते.

शिवाय डेड स्किन Dead Skin दूर होवून चेहऱ्याची टॅनिंग कमी होते आणि सुरकुत्या कमी होवून चेहरा ग्लो करू लागतो. यासाठी आठवड्यातून किमान २ वेळा चेहरा स्क्रब करणं गरजेचं आहे,

चेहरा स्क्रब करण्यासाठी बाजारामध्ये विविध स्क्रबर उपलब्ध असले तरी यातील केमिकल्समुळे अनेकदा स्किन डॅमेज होण्याची अधिक शक्यता असते. यासाठीच तुम्ही ब्राऊन शुगर हा एक नैसर्गिक पर्याय नक्की ट्राय करू शकता. तुमच्या स्किन केअर रुटीनमध्ये ब्राऊन शुगर स्क्रबिंगचा समावेश केल्यास चेहऱा तरुण दिसण्यास मदत होईल.

ब्राऊन शुगरचे त्वचेसाठी फायदे

ब्राऊन शुगरचे त्वचेसाठी अनेक फायदे आहेत. शिवाय यात कोणतही केमिकल नसल्याने चेहऱ्यावर वाईट परिणाम होण्याची शक्यता नसते.

- ब्राऊन शुगरमुळे त्वचेचं फ्री रॅडिकल्सपासून संरक्षण होतं. तसंच यात असलेल्या अँटीऑक्सिडंट्समुळे त्वचेच्या पेशींचं ऑक्सिडेटीव्ह तणावापासून संरक्षण होत असल्याने त्वचा तरुण दिसण्यास मदत होते.

- ब्राऊन शुगर ही पांढऱ्या साखरेपेक्षा मऊ असल्याने तुमच्या त्वचेचं नुकसान न करता त्वचा एक्सफोलिएट करण्यास मदत करते.

पुढे वाचा.....

- ब्राऊन शुगरमुळे त्वचा हायड्रेट राहण्यास मदत होते.

- ब्राऊन शुगरमुळे चेहऱ्यावरील ब्लॅकहेड्स आणि व्हाईटहेड्सची समस्या दूर होते.

- ब्राऊन शुगरमध्ये ग्लायकोलिक अॅसिड मेलॅनिन नियंत्रित करते. यामुळे टॅनिंगची समस्याही दूर होते.

- ब्राऊन शुगरमुळे चेहरा डीप क्लिन होत असल्याने पिंपल्सची समस्या दूर होते. शिवाय डाग फिके होऊ लागतात.

ब्राऊन शुगरचा त्वचेसाठी वापर कसा करावा

ब्राऊन शुगरमध्ये काही इतर नैसर्गिक पदार्थ मिसळून तुम्ही चेहरा स्क्रब करण्यासाठी तिचा वापर करू शकता. हे स्क्रब पूर्णपणे नैसर्गिक असल्याने त्याचा त्वचेवर दुष्परिणाम होणार नाही.

हे देखिल वाचा-

ब्राऊन शुगर हनी स्क्रब

हे स्क्रब तयार करण्यासाठी तुम्हाला १ मोठा चमचा ब्राऊन शुगर, १ चमचा मध आणि १ चमचा नारळाचं तेल या सामुग्रची आवश्यकता आहे. सर्व साहित्य एका वाडग्यात टाकून चांगली पेस्ट तयार केल्यास तुमचं स्क्रब तयार होईल.

त्यानंतर हे स्क्रब संपूर्ण चेहऱ्याला आणि मानेला लावा. १० मिनिटांनी चेहरा हलक्या हाताने स्क्रब करा. २ मिनिटांसाठी चेहरा स्क्रब केल्यानंतर स्वच्छ पाण्याने धुवा. आठवड्यात २ वेळा या स्क्रबचा वापर केल्यास फरक जाणवेल.

ब्राऊन शुगर आणि लिंबू

हे स्क्रब तयार करण्यासाठी एका वाटीमध्ये २ चमचे ब्राऊन शुगर, १ चमचा लिंबाचा रस आणि १ चमचा आॅलिव्ह ऑइल एकत्र मिसळून घ्या. त्यानंतर तयार पेस्टने चेहरा ५ मिनिटांसाठी हळूवार हाताने स्क्रब करा.

स्क्रब केल्यानंतर पेस्ट १० मिनिटांसाठी चेहऱ्यावर राहू द्या. त्यानंतर गार पाण्याने चेहरा स्वच्छ धुवा. तेलकट किंना पिंपल्स असलेल्या त्वचेसाठी हा स्क्रब फायदेशीर ठरू शकतो.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: छत्रपती संभाजीनगरमध्ये मतमोजणीसाठी भाजपचे प्रतिनिधी मतमोजणी केंद्रावर दाखल

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: मुंबईत नक्की कोण मारणार बाजी? वाचा एका क्लिकवर

Chopda Assembly Election 2024 Result Live: चोपडा विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडी विरुद्ध महायुतीत काटे की टक्कर..!

Islampur Assembly Election 2024 Results : जयंत पाटील विरुध्द निशिकांत पाटील

Erandol Parola Assembly Election 2024 result live : एरंडोल पारोळ्यात कोण मारणार बाजी?

SCROLL FOR NEXT