Face Glow Tips Esakal
लाइफस्टाइल

Face Glow Tips: दररोज चेहऱ्याला लावा Natural Bleach झटक्यात येईल ग्लो

Face Glow Tips: अनेक प्राॅडक्टमुळे भविष्यात त्वचा निस्तेज दिसू लागते. यामुळेच जर तुम्हाला घरच्या घरीच नैसर्गिकरित्या ब्लीच करता आलं तर? होय. तुम्ही देखील घरच्या घरी नैसर्गिक ब्लिज तयार करू शकता.

Kirti Wadkar

Face Glow Tips: चेहरा कायम ताजातवाना दिसावा. चेहऱ्यावर कायम ग्लो रहावा असं तर प्रत्येकालाच वाटतं. खास करून महिलावर्ग यासाठी अनेक प्रयत्न करताना दिसतात. मग पार्लरमध्ये Beauty Parlour जाऊन चेहऱ्याला विविध फेशियल Facial करणं असेल किंवा चेहऱ्याला ब्लीच करणं. Marathi Beauty Tips Glow your face with Natural Bleach

यामुळे चेहऱा Face चमकू लागला तरी ही चमक काही दिवसांची असते. शिवाय यासाठी वापरण्यात येणाऱ्या प्राॅडक्टमध्ये मोठ्या प्रमाणात केमिकल्स वापरण्यात आलेले असतात. यामुळे अनेकदा रॅश किंवा जळजळ आणि खास अशा समस्यांचा सामना करावा लागतो. 

अनेक प्राॅडक्टमुळे भविष्यात त्वचा निस्तेज दिसू लागते. यामुळेच जर तुम्हाला घरच्या घरीच नैसर्गिकरित्या ब्लीच करता आलं तर? होय.

तुम्ही देखील घरच्या घरी नैसर्गिक ब्लीच Bleach तयार करू शकता. यामुळे तुमच्या चेहऱ्यावर ग्लो येईल शिवाय त्वचेच होणारं नुकसानही टाळता येईल. घरीच ब्लीच तयार करण्याचे काही नैसर्गिक पर्याय आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. Natural facial bleach at home

१. हळद. टोमॅटो, चंदन ब्लीच- हे ब्लीच तयार करण्यासाठी तुम्हाला फक्त हळद, टोमॅटो आणि चंदन हे तीन साहित्य लागणार आहे. हळदीतील अँटीऑक्टीडंट गुण त्वचेसाठी फायदेशीर असतात. तसचं टोमॅटो आणि चंदनातील तत्व देखील त्वचेला उपयुक्त असतात. टोमॅटोमुळे टॅनिंग कमी होवून त्वचा हायड्रेट राहते. तर चंदन त्वचा उजळण्यापासून ते त्वचेला गारवा देणं, इंफेक्शनचा धोका कमी करणं यासाठी उपयुक्त आहे. 

हे देखिल वाचा-

असं तयार करा होममेड ब्लीच

- होममेड ब्लीच तयार करण्यासाठी सगळ्यात पहिले टोमॅटो स्वच्छ धुवन त्याचा रस काढा.

- टोमॅटोच्या रसामध्ये एक चमचा चंदन पावडर आणि अर्धा चमचा हळद टाकून चांगलं मिश्रण तयार करा. 

- ही पेस्ट चेहऱ्यावर लावा. पेस्टचा पातळ थर चेहऱ्यावर लावावा. 

- हे फेसपॅक २५ मिनिटं चेहऱ्याला लावून ठेवावं. 

- त्यानंतर चेहऱ्याला हलक्या हाताने मसाज करून पॅक काढा त्यानंतर पाण्याने चेहरा स्वच्छ धुवा. 

- नियमितपणे या होममेड ब्लीचचा वापर केल्यास तुमच्या चेहऱ्यावर ग्लो येईल आणि चेहरा फ्रेश दिसेल. 

२. काकडी, लिंबाचं ब्लीच- हे ब्लीच तयार करण्यासाठी तुम्हाला लिंबाचा रस, काकडीचा रस, टोमॅटोचा रस, बटाट्याचा रस आणि तांदळाच्या पिठाची आवश्यकता आहे. एका वाटीमध्ये तीन चमचे तांदळाचं पीठ घ्या. त्यात लिंबू, काकडी, टोमॅटो आणि बटाट्याचा रस मिसळा. अशा प्रकारे तुमचं नैसर्गिक ब्लीच तयार होईल. 

हे ब्लीच तयार केल्यानंतर जास्त वेळ उघडं ठेवू नये ते त्वरित चेहऱ्याला लावावं. चेहऱ्याला हे नैसर्गिक ब्लीच लावल्यावर ते संपूर्ण वाळू द्यावं. त्यानंतर स्वच्छ पाण्याने चेहऱा धुवावा. 

नैसर्गिक ब्लिचचे फायदे

यातील लिंबू आणि बटाट्याचा रस नैसर्गिक ब्लिचिंगचं काम करतं. याशिवाय ते त्वचेला पोषण देतात आणि रंग उजळण्यास मदत करतात. तसचं यातील काकडीचा रस त्वचा हायड्रेट ठेवण्यास मदत करतात. आठवड्यातून किमान एकदा या ब्लीचचा उपयोग करावा. यामुळे फरक जाणवेल. homemade bleach 

हे देखिल वाचा-

३. संत्र्याच्या पावडरचं ब्लीच- संत्र्याच्या सालामध्ये मोठ्या प्रमाणात सायट्रिक ऍसिड आढळतं जे नैसर्गिक ब्लीचच्या रुपात काम करतं. हे ब्लीच तयार करण्यासाठी संत्र्याच्या साली उन्हामध्ये चांगल्या वाळवून घ्याव्या. त्यानंतर त्याची पावडर तयार करावी. 

जेव्हा तुम्हाला चेहरा ब्लीच करायचा असेल तेव्हा एक चमचा संत्र्याच्या सालांची तयार पावडर घ्यावी. यात थोड दूध, मध मिसळावं, शक्य असेल तर एक चमचा संत्र्याचा रस टाकावा. ही पेस्ट चेहऱ्याला १५ मिनिटं लावून ठेवावी. त्यानंतर चेहरा स्वच्छ धुवावा. यामुळे चेहऱ्यावर लगेचच चमक येईल. आठवड्यातून एकदा हा प्रयोग करावा. homeremedy for glowing skin

५. पपई ब्लीच- पपईचं ब्लीच चेहऱ्यासाठी खूपच फायदेशीर आहे. पिकलेल्या पपईचे काही तुकडे मॅश करून त्याची पेस्ट तयार करावी. यात एक चमचा लिंबाचा रस मिसळावा. ही पेस्ट चेहऱ्यला लावावी आणि हलक्या हाताने मसाज करावा. १०-१५ मिनिटं पेस्ट चेहऱ्याला राहू द्यावी त्यानंतर चेहरा धुवावा. homemade bleach for glowing skin

पपईच्या ब्लीचमुळे चेहऱ्यावरील टॅनिंग कमी होवून चेहरा ग्लो होण्यास मदत होते. तसंच यामुळे चेहऱ्यावरील काळे डाग देखील फिके होतात आणि चेहरा उजळतो. 

अशा प्रकारे तुम्ही कोणतंही केमिकल्स नसलेल्या या नैसर्गिक गोष्टींचा वापर करून घरच्या घरी चेहरा ब्लीच करू शकता. ज्यामुळे तुमच्या चेहऱ्यावर कोणतेही दुष्परिणाम होणार नाहीत. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Live Updates: राज्यातील सर्व मतदारसंघांच्या निकालाचे अपडेट्स एका क्लिकवर

Pune Online Fraud : ‘डिजिटल अरेस्ट’ करून आयटी अभियंत्याला सहा कोटींचा गंडा; सेवानिवृत्तीला काही महिने शिल्लक असताना बॅंक खाते रिकामे

Constitution of India : आणीबाणीतील सर्वच निर्णय रद्द करण्यासारखे नाहीत; सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण

Pollution : बालकांचे भविष्य संकटात! दिल्लीसह उत्तर भारतात राष्ट्रीय प्रदूषण आणीबाणीची स्थिती; राहुल गांधींकडून चिंता व्यक्त

JP Nadda : अराजकाला काँग्रेसकडून चिथावणी; मणिपूर हिंसाचारप्रकरणी भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा आरोप

SCROLL FOR NEXT