Skin Glowing Scrub Esakal
लाइफस्टाइल

Skin Glowing Scrub: सूर्याप्रमाणे चमकेल तुमची त्वचा, सूर्यफुलांच्या बियांचा स्क्रब वापरून तर पहा

सुर्यफुलाच्या बियांपासून तयार करण्यात आलेल्या स्क्रबमुळे तुमच्या त्वचेचे पोअर्स स्वच्छ होण्यास मदत होईल. या शिवाय चेहरा उजळण्यास आणि त्वचेचा पोत सुधारण्यास सुर्यफुलाच्या बिया उपयुक्त आहेत

Kirti Wadkar

Skin Glowing Scrub: सुर्यफूलाच्या बियांपासून तयार करण्यात आलेलं सूर्यफूल तेल तर अनेकजण स्वयंपाकासाठी Cooking वापरतात. मात्र या बियांच्या तेलासोबतच या बियांमध्ये Seeds अनेक औषधी गुणधर्म आहेत. सुर्यफूलाच्या बिया आरोग्यासाठी फायदेशीर आहेत. Marathi Beauty Tips Sunflower Seeds Scrub for Brighter Skin

या बियांमध्ये कॅल्शियम, प्रोटीन, विटामिन ई आणि इतर अनेक पोषक तत्वं आढळता. त्यामुळे त्याचे शरीरासाठी अनेक फायदे आहेत. या सूर्यफुलांच्या बियांच्या Sunflower Seeds सेवनाचे जसे फायदे आहेत तसेच त्याचे त्वचेसाठी Skin देखील अनेक फायदे आहेत. Sunflower seeds scrub 

ओमेगा-३ Omega 3 मुबलक प्रमाणात असल्याने सुर्यफूलाच्या बिया तुमची त्वचा निरोगी ठेवण्यासही उपयुक्त आहेत.

सुर्यफुलाच्या बियांपासून तयार करण्यात आलेल्या स्क्रबमुळे तुमच्या त्वचेचे पोअर्स स्वच्छ होण्यास मदत होईल. या शिवाय चेहरा उजळण्यास आणि त्वचेचा पोत सुधारण्यास सुर्यफुलाच्या बिया उपयुक्त आहेत. Sunflower seeds benefits 

त्वचा निरोगी ठेवण्यासाठी स्क्रबिंग Scrubbing ही एक महत्वाची पायरी आहे. नियमित त्वचा स्क्रब केल्याने डेड सेल्स निघण्यास मदत होते आणि त्वचा चांहगी राहते.

यासाठी तुम्ही सुर्यफुलांच्या बियांपासून तयार करण्यात आलेलं स्क्रब वापरू शकता. हे स्क्रब कसं तयार करावं, कसं वापरावं आणि त्याचे फायदे याबद्दल आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. 

हे देखिल पहा-

असं तयार करा सुर्यफुलाच्या बियांचं स्क्रब

सुर्यफुलाच्या बियांचं स्क्रब तयार करण्यासाठी सुरुवातीला या बियांची भरड पावडर तयार करून ठेवा. त्यानंतर दोन चमचे या बियांच्या पावडरमध्ये थोडं थंड दूध मिसळून पेस्ट तयार करा. 

स्क्रब  करण्यासाठी ही पेस्ट चेहऱ्याला आणि गळ्याभोवती लावा आणि २० मिनिटं राहू द्या. त्यानंतर हाताची बोटं ओली करून हलक्या हाताने गोलाकार आकारामध्ये मसाज करा. त्यानंतर चेहरा स्वच्छ धुवा. Sunflower seeds scrub good for sking

सुर्यफूल बियांच्या स्क्रबचे फायदे

त्वचा चमकेल- सुर्यफुलांच्या बियांपासून तयार करण्यात आलेल्या स्क्रबचा वापर केल्याने तुमच्या चेहऱ्यावरील ग्लो वाढेल. या बियांमध्ये लिनोलिक ऍसिड मुबलक प्रमाणात उपलब्ध असतं. लिनोलिकमुळे मेलेनिन प्रोडक्शन नियंत्रणात राहण्यास मदत होते. Scrub for glowing skin

यामुळेच त्वचेवरील डाग कमी होण्यास मदत होते आणि त्वता चमकदार दिसू लागते. तसचं त्वचेचा रंग उजळण्यासही मदत होईल. 

सन टॅन कमी होण्यास मदत- उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये उन्हामुळे चेहरा काळवंडतो. ही टॅनिंग दूर करण्यासाठी सूर्यफुलांच्या बियांचं स्क्रब उपयुक्त ठरू शकतं. या स्क्रबच्या मदतीने चेहरा स्वच्छ आणि सुंदर होईल. सुर्याच्या प्रखर किरणांमुळे त्वचेच होणारं नुकसान यामुळे कमी होवू शकतं.तसचं या स्क्रबमुळे हायपरपिगंमेंटेशनची समस्या देखील दूर होते. Removing tanning   

हे देखिल वाचा-

त्वचा हायड्रेट ठेवण्याल मदत- या स्क्रबचा नियमित उपयोग केल्यास त्वचा हायड्रेट राहण्यास मदत होते. या बियांमध्ये विटामिन ई भरपूर प्रमाणात उपलब्ध असतं. यामुळे त्वचेचं ऑक्सिडेटिव्ह तणावाच्या नुसकानापासून संरक्षण होतं. एवढचं नव्हे तर त्वतेमध्ये हायड्रेशन  लॉक करण्यासाठी देखील या बियांचा उपयोग होतो. 

इंफेक्शन पासून संरक्षण- सुर्यफुलांच्या बियांमध्ये अँटीबॅक्टेरियल गुणधर्म असतात. यामुळे त्वचेचं इंफेक्शन पासून संरक्षण होतं. या बियांपासून तयार करण्यात आलेल्या स्क्रबचा निमित वापर केल्यास ऍक्ने आणि पिंपल्सची समस्या देखील कमी होते. 

सुर्यफुलाच्या बियांमध्ये असलेल्या फॅटी ऍसिडमुळे त्वचेला आवश्यक ते पोषण मिळत असल्याने या स्क्रबचा नियमित वापर केल्यास चेहरा उजळून तो ग्लो करण्यास मदत होईल. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Manipur Politics: मणिपूरमध्ये भाजप सरकार पडणार? मोठ्या पक्षानं पाठिंबा काढून घेतला, अडचणी वाढल्या!

Viral Video: तू T20 संघात राहण्यासाठी पात्र नाहीस... Babar Azam ला फॅन्सने तोंडावर अपमान करताच राग अनावर

Uddhav Thackeray : उद्धव ठाकरेंनी पंकजा मुंडेंचे मानले जाहीर आभार ! म्हणाले, तू महाराष्ट्राच्या डोळयावरची पट्टी काढली अन् ...

फायर नहीं वाइल्ड फायर..! बहुप्रतिक्षित Pushpa 2 चा Trailer रिलीज; पण लाँचसाठी पाटणाची निवड का केली?

Baba Siddique Murder Case : बाबा सिद्दीकी हत्याकांडातील आरोपी सलमानभाई वोहरा पोलिसांच्या जाळ्यात

SCROLL FOR NEXT