earbuds side effects Esakal
लाइफस्टाइल

कानामध्ये इयरबड्स तसेच ठेवून झोपताय? Earbuds मुळे होवू शकतं आरोग्याचं नुकसान

Earbuds side effects: जर एखादी व्यक्ती दररोज कानांमध्ये इयरबड्स घालून मोठ्या आवाजात गाणी ऐकत झोपत असेल किंवा सिनेमा पाहत झोपी जात असेल. तर सततच्या मोठ्या आवाजामुळे कानांवर परिणाम होवू शकतो

Kirti Wadkar

Earbuds side effects: लहान मुलं असो तरुण किंवा वयस्क अलिकडे रात्री झोपण्यापूर्वी प्रत्येकजणच मोबाईलचा Mobile वापर करू लागले आहेत. खास करून कानांमध्ये इयरबड्स घालून अनेकजण सिनेमा किंवा रिल्स किंवा विविध व्हिडीओ पाहतात. Marathi Health Tips Know about problems for health due to constant use of earbuds

तर काहीजण रात्री गाणी एकत झोपणं पसंत करतात. मात्र यामुळे अनेकदा कानांमधील इयरबड्स Earbuds तसेच राहतात. एखादं दुसऱ्या वेळेस कानांमध्ये इयरबड्स घालून झोपी गेल्याने कोणतही नुकसान होत नाही.

मात्र तुम्ही दररोज किंवा खूप जास्तवेळा सिनेमा Movie पाहत किंवा गाणी ऐकत झोपी जात आहात आणि तुमच्या कानांमध्ये इयरबड्स किंवा इयरपॉड्स तसेच राहत असतील तर यामुळे तुमच्या स्लीप पॅटर्नवर Sleep Pattern म्हणजेच झोपोवर तर परिणाम होईलच; शिवाय तुम्हाला कानांशी संबंधित काही समस्यांचा सामना करावा लागू शकतो.

ऐकण्याच्या क्षमतेवर परिणाम

जर एखादी व्यक्ती दररोज कानांमध्ये इयरबड्स घालून मोठ्या आवाजात गाणी ऐकत झोपत असेल किंवा सिनेमा पाहत झोपी जात असेल. तर सततच्या मोठ्या आवाजामुळे कानांवर परिणाम होवू शकतो.

खास करून जर एखादी व्यक्ती दररोज अशा प्रकारे इयरबड्चा वापर करत असेल तर कानांमध्ये वेदना निर्माण होवू शकतात. तसंच कालांतराने ऐकण्याच्या क्षमतेवर परिणाम होवू शकतो. काही दिवसांनी कमी ऐकायला येणं तसंच दीर्घकाळाने पूर्णपणे ऐकू न येणं अशा गंभीर समस्या उद्भवू शकता.

कानांमध्ये सतत बीप असा आवाज येणं

अनेकजण खास करून तरुणांना तासनतास गॅझेट्स वापण्याची सवय असते. घरातून बाहेर पडताच कानांमध्ये हेडफोनस् किंवा इयरबड्स घातले जातात. त्यानंतर सतत गाणी ऐकणं किंवा मोबाईल, टॅबवर सिनेमा किंवा विविध व्हिडीओ पाहिले जातात.

दररोज अशा प्रकारे सतत इयरबड्सचा वापर केल्यास कानांमधील रक्त प्रवाहावर त्याचा परिणाम होतो. यामुळे तणाव निर्माण होतो. तसचं सलग इयरबड्चा वापर केल्यास कांनामध्ये सतत एक प्रकारचा बीप आवाज ऐकू येतो. या स्थितीला टिनिटस म्हंटलं जातं. या समस्येवर कोणतेही उपचार उपलब्ध नाही. त्यामुळे वेळीच इयरबड्चा वापर कमी करणं गरजेचं आहे.

हे देखिल वाचा-

कानांमधील वॅक्सवर परिणाम

कानांमध्ये वॅक्स जमा होणं ही एक नैसर्गिक प्रक्रिया आहे. यामुळे कानांचं संरक्षण होत असतं. मात्र इयरबड्च्या सततच्या वापरामुळे हे वॅक्स कानांमध्ये आतील बाजूला सरकू लागतं. जे कानांसाठी धोकादायक ठरू शकतं.

तसंच सतत इयरबड्सचा वापर केल्यास कानांमध्ये आवश्यक वॅक्स तयार होण्यासही अडचण निर्माण होवू शकते. कान कोरडे होवू शकात. यामुळे कानांमध्ये खाज येऊ शकते.

कानांमध्ये बॅक्टेरिया वाढीचा धोका

कानांमध्ये सतत इयरबड्स घालणं तसंच ते वेळोवेळी स्वच्छ न करणं यामुळे कानांमध्ये बॅक्टेरिया वाढण्याचा धोका जास्त असतो. यामुळे कानांमध्ये वेदना निर्माण होणं, कान लाल होणं आणि इन्फेक्शनचा धोका वाढतो.

या काही गंभीर समस्यांसोबतच झोपताना कांनामध्ये इयरबड्स सुरु राहिल्यास तुमच्या झोपेवर त्याचा परिणाम होवू शकतो. यामुळे शांत झोप न झाल्याने डोकेदुखी किंवा चिडचिड वाढू शकते.

तसंच यामुळे लक्ष केंद्रीत करण्यासही अडचणी निर्माण होवू शकतात. त्यामुळे जर तुम्ही देखील सतत आणि खास करून झोपताना कानांमध्ये इयरबड्स घालून झोपत असाल तर आजच ही सवय बदला.

हे देखिल वाचा-

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Aheri Assembly Election Results 2024 : बापाने केला लेकीचा पराभव! अहेरी मतदारसंघात धर्मरावबाबा आत्राम यांनी मारली बाजी

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: हा ऐतिहासिक विजय, जनतेचे आभार- शिंदे

khadakwasla Assembly Election 2024 Result Live: खडकवासलात भाजपचा विजयाचा चौकार, भीमराव तापकीर यांनी पुन्हा मारली बाजी

Rajan Naik Nalasopara Assembly Election 2024 Result : नालासोपाऱ्याचा गड भाजपचाच; राजन नाईक यांचा दणदणीत विजय

Dapoli Assembly Election 2024 Results : दापोलीत आमदार योगेश कदमांनी राखला गड; ठाकरे गटाच्या संजय कदमांचा केला पराभव

SCROLL FOR NEXT