सुरक्षा फुफ्फुसांची Esakal
लाइफस्टाइल

Lungs Health: 'या' भाज्यांमुळे फुफ्फुस होईल निरोगी, श्वसनाचे आजार होतील दूर

बदललेली जीवनशैली, पर्यायावरणातील बदल आणि वाढतं प्रदूषण तसंच अयोग्य आहारामुळे गेल्या १० वर्षांमध्ये फुफ्फुसासंबंधीत समस्यांमध्ये वाढ होत आहे. तसंच कोरोना महामारीनंतर फुफ्फुसांच्या विकारांमध्ये वाढ झाल्याचं काही अभ्यासांमध्ये आढळून आलं आहे

Kirti Wadkar

शरीर निरोगी राहण्यासाठी शरीरातील प्रत्येक अवयवाचं कार्य सुरळीतपणे चालणं आणि प्रत्येक अवयव निरोगी Healthy असणं गरजेचं आहे. तुमचं हृदय, मेंदू, किडनी, यकृत आणि फुफ्फुस हे अवयव निरोगी आणि हेल्दी असल्यास तुम्ही देखील नक्कीच हेल्दी रहाल. Marathi Health Tips vegetables to keep your lungs healthy

या अवयवांपैकीच एक महत्वाचा अवयव म्हणजे फुफ्फुस Lungs. तुमच्या शरीराला आवश्यक असलेल्या ऑक्सिजनचा Oxygen पुरवठा योग्य प्रकारे व्हावा यासाठी फुफ्फुस निरोगी असणं गरजेचं आहे. फुफ्फुस हे केवळ हवेतील ऑक्सिजनच ओढून घेत नाही तर हवेतील इतर हानिकारक वायू किंवा तत्व शोषून घेत असतं.

या हानिकारक गोष्टींमुळे दमा Asthma, ब्रोंकाइटिस, सिस्टिक,पायब्रोसिस आणि न्युमोनिया सारखे श्वसनाचे विकार होण्याचा धोका वाढतो.

बदललेली जीवनशैली, पर्यायावरणातील बदल आणि वाढतं प्रदूषण तसंच अयोग्य आहारामुळे गेल्या १० वर्षांमध्ये फुफ्फुसासंबंधीत समस्यांमध्ये वाढ होत आहे. तसंच कोरोना महामारीनंतर फुफ्फुसांच्या विकारांमध्ये वाढ झाल्याचं काही अभ्यासांमध्ये आढळून आलं आहे. त्यामुळे फुफ्फुस निरोगी ठेवण्यासाठी प्रयत्न करणं गरजेचं आहे.

फुफ्फुस निरोगी ठेवण्यासाठी व्यायाम करणं आणि पोषक तत्त्वं असलेला आहार घेणं अत्यंत गरजेचं आहे. यासाठी तुम्ही आहारामध्ये काही अशा भाज्यांचा समावेश करू शकता ज्यामुळे फुफ्फुस निरोगी राहण्यास मदत होईल.

हे देखिल वाचा-

ब्रोकोली- एकेकाळी केवळ विदेशी भाजी म्हणून ब्रोकोलीकडे Brockoli पाहिलं जातं होतं. मात्र गेल्या काही वर्षात भारतातही ब्रोकोलीची लागवड मोठ्या प्रमाणात वाढल्याने ब्रोकोली बाजारात अगदी सहज उपलब्ध होते. आरोग्यासाठी ब्रोकोलीचे अनेक फायदे आहे.

ब्रोकोलीमध्ये व्हिटॅमिन सी सोबतच मोठ्या प्रमाणात कॅरोटीनॉयड, फॉलेट आणि फायटोकेमिकल्स आढळतात. ज्यामुळे फुफ्फुस निरोगी राहण्यास मदत होते. शिवाय हानिकारक तत्वांशी लढण्यासाठी फुफ्फुस बळकट होण्यासही मदत होते.

ब्रोकोलीमध्ये आढळणाऱ्या एल-सल्फोराफेन नावाच्या तत्वात असेल्या अँटीइंफ्लेमेटरी गुणांमुळे श्वसनाचे आजार दूर होण्यास मदत होते. यासाठीच तुम्ही फुफ्फुस हेल्दी ठेवण्यासाठी आहारात ब्रोकोलीचा समावेश करू शकता.

भोपळा- खरं तर भोपळा या भाजींचं नाव ऐकताच अनेकजण नाक मुरडतात. मात्र याच भोपळ्यामुळे तुमचं फुफ्फुस निरोगी होवू शकतं. भोपळ्यामध्ये कॅरोटेनॉइड्स मुबलक प्रमाणात आढळून येतात. यामध्ये अँटीऑक्सिडंट्स आणि अँटीइंफ्लेमेटरी गुण आढळतात. भोपळ्याची भाजी आणि बियांच्या सेवनामुळे फुफ्फुस निरोगी आणि हेल्दी राहण्यास मदत होते.

टोमॅटो- टोमॅटो हे लायकोपीनचं एक उत्कृष्ट वनस्पीती स्त्रोत आहे. टोमॅटोच्या सेवनामुळे फुफ्फुसाचं आरोग्य चांगलं राहण्यास आणि श्वसनमार्गातील सूज कमी होण्यास मदत होते. त्यामुळे टोमॅटोचा स्वयंपाकासाठी तसंच सलाडमध्ये समावेश करावा.

पालेभाज्या- पालेभाज्या खास करून केळं, पालक अशा भाज्यांमध्ये मोठ्या प्रमाणात कॅल्शियम, आयर्न, पोटॅशियम आणि व्हिटॅमिन उपलब्ध असतात. या पोषक तत्वांमध्ये मोठ्या प्रमाणात अँटीइंफ्लेमेटरी आणि अँटीऑक्सिडंट्स गुण असतात. यामुळे फुफ्फुसांमधील सूज कमी होण्यास मदत होते.

हे देखिल वाचा-

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharshtra Politics: ...तर १००० कार्यकर्ते स्वतःला जाळून घेतील, मुख्यमंत्रीपदावरून BJPच्या बड्या नेत्याचं खळबळजनक ट्विट

WTC Points Table: टीम इंडियाने ऑस्ट्रेलियाकडून हिसकावला 'नंबर वन'चा मुकूट; पर्थमधील विजयानंतर कसे आहे फायनलचे समीकरण?

Maharashtra Cabinet: नव्या सरकारमध्ये मंत्रीपदासाठी लॉबिंगला सुरुवात; कोणते आमदार गेलेत नेत्यांच्या भेटीला? जाणून घ्या

Madhuri Misal : पर्वती विधानसभा मतदारसंघाच्या नवनिर्वाचित आमदार माधुरी मिसाळ यांचे मेट्रोमार्ग, रुग्‍णालयाच्‍या कामांना प्राधान्‍य

Share Market Closing: शेअर बाजार मोठ्या वाढीसह बंद; सेन्सेक्स 1000 अंकांच्यावर, निफ्टीने पार केला 24,200चा टप्पा

SCROLL FOR NEXT