पेट्रोल-डिझेलच्या किमती वाढत असल्या तरी आजही काहीजण चांगल्या परफॉर्मन्ससाठी डिझेल कार Diesel Car चालवणं पसंत करतात. यामुळेत आजही भारतीय बाजारांमध्ये डिझेल कारला मागणी कायम असल्याचं पाहायला मिळतं. Marathi Smart Tips know how to maintain your Diesel Car
जर तुमच्याकडे ही डिझेल कार असेल तर तुम्हाला काही गोष्टींची काळजी घेणं गरजेचं आहे. डिझेल कार Diesel Car वापरत असताना तसचं या कारची सर्व्हिसिंग Car Servicing करत असताना काही छोट्या-मोठ्या गोष्टींची काळजी न घेतल्यास कारमध्ये भविष्यात एखादा मोठा बिघाड निर्माण होवू शकतो किंवा कार प्रवासा दरम्यान Journey एखादी अडचण निर्माण होवू शकते आणि तुमच्या खिशाला देखील मोठा फटका बसू शकतो.
यासाठीच जर तुम्ही डिझेल कार वापरत असाल तर काही गोष्टी लक्षात घेणं गरजेचं आहे.
इंजिन स्टार्ट होताच कार सुरु नका
जर तुमच्याकडे डिझेल कार असेल तर एक गोष्टी लक्षात घ्यायला हवी ती म्हणजे कार सुरु करताना कारचं इंजिन स्टार्ट केल्यानंतर लगेचच कार चालवण्यास सुरुवात करू नये.
कारचं इंजिन स्टार्ट झाल्यानंतर ते गरम होण्यासाठी थोडा वेळ द्यावा. त्यानंतरच ड्रायव्हिंग करण्यास सुरुवात करावी. यामुळे इंजिनचं लाइफ वाढण्यासोबत कार चांगला परफॉर्मन्स देईल.
डिझेल कमी असताना कार चालवू नका
कारमधील डिझेलची पातळी कायम तपासत रहा. डिझेलची पातळी २० टक्क्यांखाली जाण्याआधीच डिझेल भरणं गरजे. आहे. कमी इंधनावर डिझेल कार चालवणं तुम्हाला महागात पडू शकतं.
टाकीमध्ये डिझेल कमी असल्यास फ्यूएल पंप डिझेलऐवजी कंबशन चेंबरमधील हवा खेचू शकतो. यामुळे फ्रिक्शन वाढून पॉवरटेनच्या इंटरनल कंपोनेंट्सचं नुकसान होतं.
हे देखिल वाचा-
योग्य वेळी सर्व्हिसिंग करणं गरजेचं
डिझेल कारला जास्त मेंटेंनंन्सची Maintainance आवश्यकता असते. अनेकदा वेळोअभावी किंवा दुर्लक्ष करून अनेकजण वेळेवर कारचं सर्व्हिसिंग करत नाहीत. यामुळे भविष्यात कारमध्ये मोठा बिघाड निर्माण होवू शकतो. वेळोवेळी कारची सर्व्हिसिंग केल्याने कारचं लाइफ वाढण्यास मदत होते.
तसंच कार सर्व्हिसिंग करत असताना तुम्ही काही गोष्टींकडे विशेष लक्ष देणं गरजेचं आहे. काही पार्ट हे ठराविक किलोमीटरनंतर बदलणं गरजेचं असतं. एअर फिल्टर, ऑईल फिल्टर, डिझेल फिल्टर आणि टायर, कुलंट असे काही पार्ट व इतर गोष्टी बदलणं गरजेचं असतं.
डिझेल कारसाठी इतर टिप्स
डिझेल कारमधून येणाऱ्या काळ्या धुराकडे लक्ष ठेवणं गरजेचं आहे.
कमी rpm वर हाय गियर ड्रायव्हिंग करणं टाळा. अन्यथा इंजिन आणि ट्रान्समिशनचं नुकसान होवू शकतं.
कारमधील डिझेल पार्टिक्युलेट फिल्टर वेळोवेळी स्वच्छ करा.
अशा प्रकारे जर तुम्ही डिझेल कारची योग्य ती काळजी घेतली तर कारची लाइफ वाढण्यास मदत होईल.
हे देखिल वाचा-
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.