Face Fat Exercise Esakal
लाइफस्टाइल

Face Fat Exercise: गोलमटोल चेहऱ्यावरची चरबी कमी करायचीय?, मग या Facial Exercise करा

चेहरा गुबगुबीत होण्यामागे खरंतर अनेक कारणं असतात. यात वजन वाढण्यासोबतच, वाढतं वय, चुकीचा आहार, अल्कोहोलचं सेवनं, जास्त सोडियमयुक्त पदार्थांचं सेवन ही काही कारणं आहेत

Kirti Wadkar

Face Fat Exercise: अनेकदा वजन वाढलं की त्याचा सर्वात पहिला परिणाम दिसून येतो तो तुमच्या चेहऱ्यावर. वजन वाढल्याने Weight Gain चेहरा गुबगुबीत दिसू लागतो.

वजन जास्त असलं की शरीरासोबतच गालांवरील आणि एकंदर चेहऱ्यावरही फॅट्स Fats प्रमाण वाढतं. यामुळे चेहरा चब्बी दिसू लागतो. Marathi Tips Excercises to reduce excess fats on face

अनेकदा वजन कमी करण्यासाठी Weight Loss प्रयत्न केले जातात. यामुळे वजन तर कमी होतं. मात्र चेहरा गुबगुबीतच राहतो. यामागचं कारणं म्हणेज अनेकजण वजन कमी करण्यासाठी विविध व्यायाम Exercise करण्यावर भर देतात. मात्र चेहऱ्यासाठी खास व्यायाम करत नाहीत. यामुळे चेहऱ्यावरचे फॅट्स कमी न झाल्याने चेहरा गोल आणि गुबगुबीतच राहतो.

खास करून अनेक महिलांचं गरोदरपणामध्ये Pregnancy बरचं वजन वाढतं. चेहऱ्यावरही सूज आल्याप्रमाणे चेहरा फुगतो. वर्षाभरानंतर हळूहळू हे वजन कमी होतं किंवा अनेक महिला खास डाएट आणि व्यायामाने गरोदरपणात वाढलेलं वजन डिलिव्हरीनंतर कमी करतात.

मात्र चेहऱ्यामध्ये फारसा फरक पडत नाही. चेहऱ्यावरचे फॅट्स Fats कमी करण्यासाठी काही चेहऱ्याच्या एक्सरसाइज करणं गरजेचं आहे. यामुळे चेहऱ्यावरचे फॅट्स कमी होवून तुमचे फिचर्स उठून दिसतील.

चेहरा गुबगुबीत होण्यामागे खरंतर अनेक कारणं असतात. यात वजन वाढण्यासोबतच, वाढतं वय, चुकीचा आहार, अल्कोहोलचं सेवनं, जास्त सोडियमयुक्त पदार्थांचं सेवन ही काही कारणं आहेत. यासाठी आम्ही तुम्हाला काही फेशियल एक्सरसाइज सांगणार आहोत ज्याच्या मदतीने तुम्ही चेहऱ्यावरचे फॅट्स कमी करू शकता.

हे देखिल वाचा-

फिश पाऊट- गालावरील चरबी कमी करण्यासाठी तसचं डबलचीन म्हणजेच हनुवटीखाली आलेल्यी चरबी कमी करण्यासाठी पाउटिंग ही एक चांगली एक्सरसाज आहे. तुम्ही अगदी घरात बसल्या बसल्या दिवसातून ३-४ वेळा ही एक्सरसाइज करब शकता.

यासाठी तुम्हाला तुमचे दोन्ही गाल आतील बाजूला खेचायचे आहेत आणि ३० सेकंदांसाठी चे माश्याप्रमाणे तसचे खेचून ठेवायचे. त्यानंतर श्वास घेऊन पुन्हा ३-४ वेळा या व्यायाम रिपीट करा.

द किस- डबल चिन म्हणजेच अनेकदा हनुवटीच्या खाली चरबी वाढल्याने चेहऱ्याची शोभा कमी होते. ही चरबी दूर करण्यासाठी एक सोपा व्यायाम तुम्ही करायचा आहे. यासाठी ताठ बसून तुमचा चेहरा मागील बाजूला झुकवा.

म्हणजेच वर मान करून छताच्या दिशेने पहा. आता छताकडे पाहून किस म्हणजेच ओठांचा चंबू करुन ५ सेकंदा थांबा. पुन्हा मान खाली घेऊन ४-५ वेळा ही एक्सरसाईज रिपीट करा.

जबड्याचा व्यायाम- जॉ लाईन चांगली करण्यासाठी म्हणजेच जबड्याच्या आजुबाजुची चरबी कमी करण्यासाठी हा व्यायाम फायदेशीर ठरेल. यासाठी माने वर करून छताकडे पहा. वर पाहत असताना जबाडा वरच्या दिशेने खेचण्याचा प्रयत्न करा. यामुळे हनुवटीखालील तसंच मानेवरील चरबी कमी होण्यास मदत होईल.

बलून एक्सरसाइज- गुबगुबीत चेहऱ्यावरील फॅटस् कमी कऱण्यासाठी हा एक सोपा व्यायाम आहे. यासाठी गालांमध्य हवा भरून गाल फुगवायचे आहेत. १०-१५ सेकंदासाठी फुग्याप्रमाणे गाल फुगवून ठेवा. ८-१० वेळा हा व्यायाम पुन्हा करा.

ओ आणि ई बोला O and E Exercise – ही सगळ्यात सोपी एक्सरसाइज आहे. यामध्ये तुम्हाला केवळ ओ आणि ई बोलायचं आहे. OOO म्हंटल्यानंतर EEE असं सलग मिनिट भरासाठी रिपीट करायचं आहे. फक्त ओ आणि ई उच्चारताना ते स्पष्ट थोड्या मोठ्या आवाजात म्हणायचं आहे.

डोळ्याखालील सूज करण्यासाठी- डोळ्याखालील सूज आणि सुरकुत्या कमी करण्यासाठी तुम्हाला डोळे विस्फारून पाहायचं आहे.

आश्चर्यचकित झाल्यानंतर आपण ज्या प्रमाणे भुवया काहीश्या वरच्या बाजुला ताणून डोळे विस्फारतो त्याप्रमाणे डोळे मोठे करावे. १० सेकंदांसाठी डोळे या स्थितीत ठेवावे. ३-४ वेळा व्यायाम रिपीट करावा.

चेहऱ्याच्या या काही सोप्या एक्सरसाइज करण्यासाठी तुम्हाला खास वेगळा वेळ देण्याची गरज नाही. बसल्या बसल्या किंवा एखादं काम करत असतानाही तुम्ही दिवसातून २-३ वेळा तरी हे व्यायाम करू शकता.

यामुळे तुमच्या चेहऱ्यावरील चरबी कमी होईल शिवाय. चेहऱ्याच्या स्नायूंची हालचाल झाल्याने रक्तप्रवाह चांगला होवून त्वचेवर ग्लो देखील येण्यास मदत होईल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jaykumar Gore won Man Assembly Election 2024 Result: जयाभाऊचा विजयाचा चाैकार! माण-खटावमध्ये प्रभाकर घार्गे यांचा माेठा पराभव

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: महायुतीचे नेते पत्रकार परिषद घेणार

Mahad Assembly Election 2024 result live : महाड विधानसभेत भरत गोगावलेंची सरशी ! ठाकरे गटाच्या स्नेहल जगतापांचा दणदणीत पराभव

Konkan Region Assembly Election Result 2024: राणे बंधूंनी तळकोकण राखले; भास्कर जाधव यांनी थोडक्यात गुहागर जिंकले

Sanjay Gaikwad won Buldana Vidhan Sabha: दोन शिवसेनेत कडवी झुंज! संजय गायकवाडांचा निसटता विजय, उद्धवसेनेच्या जयश्रींनीची तगडी फाईट

SCROLL FOR NEXT