पावसाळ्यातले ड्रायव्हिंग Esakal
लाइफस्टाइल

Car Driving करत असताना मुसळधार पाऊस सुरू झाल्यास या गोष्टींची घ्या काळजी

ड्रायव्हिंग करत असताना पाऊस पडू लागल्यास गाडी सहज चालवण्यासाठी तुम्ही काही टिप्सचा वापर करू शकता. तसचं कमी व्हिजिबिलिटी असताना सहज गाडी चालवता यावी यासाठी तुम्ही कारमधील काही सेटिंग्सची मदत घेऊ शकता

Kirti Wadkar

पावसाळ्याच्या दिवसांमध्ये Monsoon प्रवास करणं हे अनेकदा जोखमीचं ठरू शकतं. पावसाळ्यात कारने लॉन्ग ड्राइव्हला जाण्याची मजा खास असली तरी अनेकदा मात्र ड्रायव्हिंग करत असताना मुसळधार पाऊस कोसळू लागल्यास अनेक अडचणी निर्माण होतात. Marathi Tips for Safe Driving in Monsoon Season

पावसाळ्याच्या काळामध्ये अपघात Accident होण्याची शक्यता जास्त असते. यासाठी अनेक कारणं जबाबदार असली तरी पावसाळ्यात ड्रायव्हिंग Car Driving करताना प्रत्येक चालकाने खबरदारी घेणं गरजेचं आहे.

गाडी चालवताना मुसळधार पाऊस पडू लागल्यास अनेकदा व्हिजिबिलिटी कमी होते म्हणजेच समोरचा रस्ता किंवा गाड्या स्पष्ट दिसत नाहीत. रस्त्यावर आणि काचेवर पडणाऱ्या पाण्यामुळे समोरचं पाहणं कठिण होतं. हे कार चालकासाठी आणि इतरांसाठी देखील धोक्याचं ठरू शकतं.

ड्रायव्हिंग करत असताना पाऊस पडू लागल्यास गाडी सहज चालवण्यासाठी तुम्ही काही टिप्सचा वापर करू शकता. तसचं कमी व्हिजिबिलिटी असताना सहज गाडी चालवता यावी यासाठी तुम्ही कारमधील काही सेटिंग्सची मदत घेऊ शकता.

हॅजार्ड लाइट्स

पावसाळ्यात गाडी चालवत असताना समोरील रस्ता स्पष्ट दिसावा यासाठी कारच्या हॅजार्ड लाइट्स ऑन ठेवा. यामुळे इतर गाड्यांना देखील तुमची गाडी समोरून येत असल्याचा योग्य अंदाज येईल.

हे देखिल वाचा-

पार्किंग लाइट्स

पावसाळ्यामध्ये खास करून एखाद्या घाटामध्ये ढग अत्यंत खाली उतरलेले असतात. अशात धुकं आणि त्यात पाऊस यामुळे अस्पष्ट दिसू लागतं. म्हणूनच स्वत:च्या सुरक्षेसाठी आणि इतर गाड्यांना अंदाज यावा यासाठी कारची पार्किंग लाइट सुरू करून कमी स्पीडने कार चालवावी.

तसंच अशा वातावरणामध्ये व्हिजिबिलिटी वाढण्यासाठी लो बीमवर हेड लाइट्स ऑन करा. यामुळे तुम्हाला समोरचा रस्ता स्पष्ट दिसण्यास मदत होईल.

ACची सेटिंग बदला

ड्रायव्हिंग करत असताना पाऊस सुरू झाल्यास एसी ब्लो विंडशील्डवर ठेवा. यासाठी विंडशील्ड ३ ते ४ स्पीडवर ठेवा. यामुळे काचांवर आतील बाजुने वाफेचा थर साचणार नाही आणि तुम्हाला गाडी चालवणं सोपं होईल.

डीफॉगर

पावसात कार चालवत असताना डिफॉगरचा वापर नक्की करा. यामुळे कारच्या मागील काचेवर धुकं साचणार नाही आणि तुम्हाला मागून येणाऱ्या वाहनाचं अंतर सहज लक्षात येईल.

व्हायपर स्पीड

मुसळधार पाऊस सुरू झाल्यास वायपरची स्पीड वाढवा जेणेकरून विंडशील्डवर पडणार पाणी लवकर हटेल आणि तुम्हाला समोरचा रस्ता दिसेल. पावसाच्या तीव्रतेनुसार व्हायपरचा स्पीड अॅडजस्ट करणं गरजेचं आहे.

हे देखिल वाचा-

हॉर्न

साधारणपणे कोणतही नागमोडी वळणं घेताना आणि खास करून घाटामध्ये हॉर्न देणं गरजेचं असतं. रस्त्यावर वाहन चालवताना वारंवार हॉर्न देणं चुकीचं असलं तरी पाऊस कोसळत असताना याला अपवाद ठरू शकतो.

अनेकदा वादळी वारा आणि पावसामध्ये तसचं ढगांचा गडगडाट असल्यास हॉर्नचा आवाज समोरून येणाऱ्या वाहनापर्यंच लगेचेच पोहचू शकत नाही. अशा वेळी केवळ एकदा हॉर्न देऊन थांबू नका. किमान ३-४ वेळा हॉर्न द्या.

स्वत:सोबतच इतरांना जीव धोक्यात येऊ नये यासाठी पावसाळ्यात गाडी चालवताना काळजी घेणं गरजेचं आहे. जर पावसामुळे आजुबाजुचं दिसणं अधिकच कठिण झाल्यास रस्त्यात मध्ये न थांबता एखाद्या सुरक्षित ठिकाणी तुम्ही काही वेळ थांबू शकता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Live Updates: राज्यातील सर्व मतदारसंघांच्या निकालाचे अपडेट्स एका क्लिकवर

Pune Online Fraud : ‘डिजिटल अरेस्ट’ करून आयटी अभियंत्याला सहा कोटींचा गंडा; सेवानिवृत्तीला काही महिने शिल्लक असताना बॅंक खाते रिकामे

Constitution of India : आणीबाणीतील सर्वच निर्णय रद्द करण्यासारखे नाहीत; सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण

Pollution : बालकांचे भविष्य संकटात! दिल्लीसह उत्तर भारतात राष्ट्रीय प्रदूषण आणीबाणीची स्थिती; राहुल गांधींकडून चिंता व्यक्त

JP Nadda : अराजकाला काँग्रेसकडून चिथावणी; मणिपूर हिंसाचारप्रकरणी भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा आरोप

SCROLL FOR NEXT