एखाद्या व्यक्तीचा वाढदिवस असो किंवा लग्न, गृहप्रवेश अशा वेळी आपण त्यांना काहीना काही भेटवस्तू Gifts देत असतो. अर्थात ही भेट वस्तू देताना आपण ती समोरच्या व्यक्तीला आवडेल किंवा असा प्रश्न अनेकांना पडतो अशावेळी काही रक्कम भेट म्हणून दिली जाते. Marathi Tips Suitable Gifs according to Vastu Shastra
पण तुम्हाला माहित आहे का वास्तू शास्त्रामध्ये Vastu Shastra अशा काही वस्तूंचा उल्लेख करण्यात आलाय ज्या भेटवस्तू Gifts म्हणून दिल्याने तुमच्या प्रियजनांचं भाग्य उजळण्यास मदत होईल.
वास्तू शास्त्रामध्ये अशा काही वस्तूंचा समावेश करण्यात आलाय. ज्या भेट म्हणून दिल्याने समोरील व्यक्तीला त्या नक्कीच आवडतीलही, शिवाय तिच्यासाठी त्या लकी ठरू शकतील. म्हणूनच तुमच्या मित्र मैत्रिणींना किंवा कुटुंबातील व्यक्तींना तुम्ही त्यांच्या खास दिवशी या वस्तू त्यांना गिफ्ट Gift करू शकता.
भेटवस्तू कशी असावी-
अनेकजण खास करून गृहप्रवेश किंवा लग्नामध्ये भेटवस्तू म्हणून वेगवेगळ्या देवदेवतांचे फोटो आपल्या प्रियजनांना देत असतात. यामध्ये तुम्ही श्रीगणेशाचा फोटो भेटवस्तू म्हणून देऊ शकता.
गणपतीचा फोटो भेटवस्तू म्हणून देणं शुभ मानलं जातं. यामुळे ज्या व्यक्तीला तुम्ही हा फोटो देत आहात, त्याच्या जीवनातील अनेक संकट दूर होण्यास मदत होते. तसंच त्याच्या घरामध्ये सुख-शांती नांदते.
यासाठीच तुम्ही एखादी सुंदर गणेशाच्या मूर्तीची फोटो फ्रेम गिफ्ट म्हणून देऊ शकता.
हे देखिल वाचा-
हत्तीची मूर्ती- तर काहीवेळी गिफ्ट म्हणून आपण एखादी शोभेची वस्तू किंवा मूर्ती देणं पसंत करतो. एखादी वस्तू भेट म्हणून दिल्यास ती व्यक्ती घरामध्ये ही वस्तू कायम ठेवेल, या उद्देशाने आपण शोभेच्या वस्तू देत असतो. अशा वेळी तुम्ही हत्तीची मूर्ती गिफ्ट म्हणून देऊ शकता. हत्तीला श्रीगणेशाचं रुप मानलं जातं. त्यामुळे हत्तीची मूर्ती भेट म्हणून देणं शुभ ठरतं.
अलिकडे बाजारात अनेक शोभेच्या नक्षीकाम केलेल्या रंगीत हत्तीच्या मूर्ती पाहायला मिळतात. मात्र ही मूर्ती देताना ती चांदी, पितळ किंवा लाकडी असावी. शिवाय जर हत्तीची जोडी भेट म्हणून दिली तर व्यक्तीचं भाग्य उजळण्यास मदतत होते.
चांदीच्या वस्तू द्या भेट- जर तुम्ही एखाद्याला धातूची वस्तू भेट म्हणून देत असाल, तर चांदीची वस्तू भेट म्हणून देणं शुभ मानलं जातं. वास्तू शास्त्रामध्ये चांदी या धातूला शुभ मानलं गेलंय. चांदीमध्ये लक्ष्मी मातेचं वास्तव्य असतं असं मानलं जातं.
यासाठीच तुम्ही लग्नकार्यात किंवा गृहप्रवेश, बारसं, पूजा अशावेळी चांदीची एखादी देव-देवतेची मूर्ती किंवा नाणं भेट म्हणून देऊ शकता. यामुळे त्या व्यक्तीवर लक्ष्मीचा आशीर्वाद राहिल.
हे फोटो करा गिफ्ट- एखादी फोटोफ्रेम भेट म्हणून आपण अनेकदा देत असतो. अलिकडे अनेक फोटोंचं कोलाज देणं किंवा त्याच व्यक्तीचा फोटो भेट म्हणून तिला देण्याचा ट्रेंड आहे. मात्र, जर तुम्हाला एखादा खास फोटो भेट म्हणून द्यायचा असेलच तर तुम्ही सात धावणाऱ्या घोड्यांची फोटोफ्रेम भेट म्हणून देऊ शकता. यामुळे समोरच्या व्यक्तीचं भाग्य उजळण्यास मदत होईल.
तसचं तुम्ही मातीचे काही शोपीस भेट म्हणून देऊ शकता. यामुळे घरात धनलाभ होतो.
घरासाठी भेट वस्तू- जर तुम्ही एखाद्या व्यक्तीला त्याच्या नव्या घरासाठी भेटवस्तू देत असाल तर तुम्ही श्रीगणेशाती मूर्ती किंवा हत्तीच्या मूर्तीसोबतच कासवाची मूर्ती किंवा लाफिंग बुद्धाची मूर्ती भेट म्हणून देऊ शकता. तसचं तुम्ही पाण्याच्या कारंजाचं एखादं शोपीस तसचं मनी प्लांट किंला तुळशीचं रोपही भेट म्हणून देऊ शकता.
अशा प्रकारे हे काही भेटवस्तूचे असे पर्याय आहेत ज्यामुळे वास्तूशास्त्रानुसार भाग्य उजळण्यास मदत होईल शिवाय ते समोरच्या व्यक्तीला आवडतीलही.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.