Google Search sakal
लाइफस्टाइल

Google Search: लग्नानंतर महिला गुगलवर सर्वात जास्त काय सर्च करतात?

सकाळ डिजिटल टीम

आज आपल्याला कोणताही प्रश्न पडला तरी आपण गुगल सर्च करत असतो. कारण हा गुगलकडे आपल्या सर्व प्रश्नांची उत्तरे असतात. खरं तर गुगल हा प्रत्येकाच्या आयुष्याचा भाग बनलाय. महिला तर गुगलचा सर्वाधिक जास्त फायदा घेतात. अशात लग्नानंतर महिला गुगलवर काय सर्च करतात असा जर प्रश्न पडला तर याचे उत्तर तुम्हाला अतिशय मजेशीर मिळणार.

आज आम्ही तुम्हाला याविषयी सविस्तर सांगणार आहोत.

हे ही वाचा - राष्ट्र तरेल कसे? धर्मकारणातून की धर्मनिरपेक्षतेतून?

लग्नानंतर महिला गुगलवर सर्वात जास्त काय सर्च करतात?

नवऱ्याबाबत सर्च करतात

गूगलच्या आकडेवारीनुसार लग्नानंतर महिला सर्वात जास्त नवऱ्याबाबत सर्च करतात. नवऱ्याशी निगडीत गोष्टी त्या सर्च करतात. महिला आपल्या नवऱ्याच्या आवडी निवडी संबधीत प्रश्न गुगलवर सर्च करते.

नवऱ्याला मुठीत कसं ठेवावं?

तुम्हाला हसू येईल पण हे खरंय आहे की काही महिला लग्नानंतर नवऱ्याला मुठीत कसं ठेवावं, यासंबंधीत प्रश्न विचारतात. महिलांना अशा प्रश्नांमध्ये खूप रुची असते.

प्रेम व्यक्त करण्याच्या ट्रिक्स

याशिवाय महिला प्रेम व्यक्त करण्याच्या ट्रिक्स गुगल वर सर्च करतात. नवऱ्याला खूश करण्यासाठी डेट प्लॅनिंग, गीफ्ट्स अशा ट्रिक्स सर्च करतात.

करिअरशी निगडीत प्रश्न

लग्नानंतर महिलांचे आयुष्य पुर्णत: बदलते. अशात वैवाहीक आयुष्यासोबत करिअर कसं सांभाळायचं? हा प्रश्न प्रत्येक विवाहीत महिलेला पडतो. त्यामुळे याच्याशी संबंधीत प्रश्नही महिला सर्च करतात.

नवीन कुटूंबात स्वत:ला सामावून घेण्यासाठी काय करावं?

लग्नानंतर नवीन कुटूंबात स्वत:ला सामावून घेणे प्रत्येक महिलेसाठी सुरवातीला कठीण असते. नवीन कुटूंबात स्वत:ला कसं अडजस्ट करावं, यासाठी महिला वाट्टेल ते प्रयत्न करतात. सासरच्या माणसांशी जुळवून घेण्यासाठी महिला खूप प्रयत्न करतात. त्यासाठी त्या गुगलची मदत घेतात.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Haryana Assembly Election 2024: हरियानात भाजपनं तिसऱ्यांदा रोवला झेंडा! 'या' व्यक्तीमुळं साधली दमदार हॅटट्रिक

Share Market Closing: शेअर बाजाराचे कमबॅक; सेन्सेक्स 81,634 अंकांवर बंद, मिडकॅप निर्देशांकात मोठी वाढ

Nobel Prize 2024 : फिज़िक्समध्ये जॉन जे. हॉपफील्ड आणि जेफ्री ई. हिंटन यांना नोबेल जाहीर; दोघांनी बनवलं अनोखं न्युरल नेटवर्क

Latest Maharashtra News Live Updates : रामराजे निंबाळकर अखेर १४ ऑक्टोबरला राष्ट्रवादीत प्रवेश करणार

Chalisgaon MSRTC Depot : सर्वाधिक उत्पन्न देणाऱ्या चाळीसगाव आगारात नव्या बसगाड्यांची वानवा; 25 वर्षांपासून जुन्याच गाड्यांमधून प्रवाश

SCROLL FOR NEXT