मौन आणि शांतता हे धार्मिक शब्द मानले जातात. आजच्या काळात वाढणारा आवाज,गोंगाट,कलकलाट ही झपाट्याने वाढणारी समस्या बनत चालली आहे. आपल्या वाहनांचा आवाज, सार्वजनिक कार्यक्रमातील संगीत इत्यादींमुळे आपली जीवनशैलीही अशी बनत चालली आहे की आपल्याला रोजच्या रोज शांततेचे क्षण कधी मिळतात हेही कळत नाही.
अनेक धर्मांमध्ये आध्यात्मिक शांततेसाठी मौन हा उपाय सुचवण्यात आला आहे. मौन व्रत करण्याचे अनेक फायदे आहेत. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीही २४ तासांचे मौन व्रत करणार आहेत.
मोदी कन्याकुमारी येथील विवेकानंद रॉक मेमोरियल येथे मौन व्रताला बसले आहेत. ते ४५ तासांचे मौन व्रत धारण करणार असून या काळात ते अन्न पाणी काहीच घेणार नाहीत. मौन व्रत करण्याचे काय फायदे आहेत, याबद्दल आपण जाणून घेऊयात.
रागावर नियंत्रण मिळवता येते
एखादी व्यक्ती रागवली तर तिला शांत राहण्याचा सल्ला दिला जातो. कारण, शांत राहील्याने, एखादा मुद्दा शांतपणे सांगितल्याने तो अधिक पटतो. त्यामुळेच मौन व्रत करणाऱ्या व्यक्तीला आपोआप रागावर नियंत्रण मिळवता येणं सहज शक्य होतं.
स्वत:ची नव्याने ओळख होते
मौन धारण केल्याने आपण स्वत:ला अधिक जाणून घेऊ लागतो. आपल्याला स्वत:ची जास्त ओळख होते, असे म्हणतात. व्यक्ती शांत असला की त्याच्या मनात अनेक प्रश्न उपस्थित होतात. मौनावस्थेतच तो व्यक्ती या प्रश्नांची उत्तरे शोधू लागतो.
जीवनातील उद्देश ओळखता येतो
आपण या जगात का आलो, आपण सध्या काय करतोय. आपला या जगात येण्याचा उद्देश काय आहे याबद्दल आपण शांतपणे विचार करू लागतो. तसेच, उद्देश साध्य करण्यासाठी आपल्याला किती मेहनत करावी लागेल याचे गणितच आपण मांडतो.
मन एकाग्र होते
सुरळीत सुरू असलेल्या आयुष्यात अनेक चढ-उतार आले तर मन अस्वस्थ होतं. मन चंचल आहे जे सतत बिथरलेले असते.एखादी वाईट घटना, वाईट परिस्थिती शांतपणे कशी हाताळायची हे मन एकाग्र झाल्यावर कळते. अस्थिर मनाला शांत एकाग्र करण्याचे काम मौन व्रत करते.
शारीरिक उर्जा वाढते
आपल्या रोजच्या जीवनात ऑफिस,जेवण, कुटुंब, मित्र हे महत्त्वाचे आहेत. जसे रोज व्यायाम महत्त्वाचा आहे तसे शरीराची उर्जा वाढवण्यासाठी मौन व्रत गरजेचे आहे. मौन धारण केल्याने शरीरात सकारात्मक बदल होतात आणि शारीरिक उर्जा वाढते.
बुद्धीचा विकास होतो
आपण लहान असताना शिक्षक सांगायचे की दिवसातील १० मिनिटे तरी शांत बसून आपण दिवसभर काय काय केले, हे आठवा. कारण, आपण एकदा केलेली गोष्ट पुन्हा-पुन्हा आठवली तर आपल्या बुद्धिचा विकास होतो. हे फक्त मौनामुळेच होऊ शकते.
मौन व्रत करण्याचे नियम काय आहेत?
साधारणपणे मौनव्रत हा एक दिवस ते कितीही दिवसांचे असू शकते.
तुम्ही तुमच्या गरजेनुसार या व्रतासाठी तुमचा वेळ निवडू शकता
मौन ध्यारणेसाठी शांत आणि स्थिर वातावरणात असावे.
तुम्ही मौन धारणा शांत बागेत, मंदिरात किंवा नदी किनारीही बसून करू शकता.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.