सध्या सर्वच लोकांचं जग वेगवान बनलं आहे. या स्पर्धेत सर्वांचाच टिकाव लागेल असं नाही. काही लोक मागे पडतात अन् काही पुढे निघून जातात. त्यामुळे, जे लोक मागे पडतात ते कोणताही विचार न करता आत्महत्येचा विचार करू लागतात. पण, असा विचार करणारे, नैराश्येचे जीवन जगत असतात.
आपण जीवनातील लोक, त्यांच्या आनंदापेक्षा प्रॉब्लेम्सना अधिक महत्त्व देत आहोत. काही तरूण मुलं मनासारखी एखादी गोष्ट घडली नाही म्हणून निराश होतात अन् आजकाल हे प्रकार वाढले आहेत. म्हणूनच प्रत्येक व्यक्तीने स्वत:च्या मेंदूची तपासणी करून घेणं गरजेचं आहे. (Mental Health )
एंजायटी हा या गोष्टींना प्रभावित करणारा आजार आहे. हा असा आजार आहे ज्यात सर्व काही ठिक आहे, मी ठिक आहे मला काहीच झालं नाही असे रूग्णाला वाटू शकते. पण, सत्य परिस्थिती अशी असते की, ती व्यक्ती एंजायटीला बळी पडलेली असतात.
एंजायटी असलेल्या व्यक्तीला हाताच्या तळव्यावर सतत घाम येत असतो. त्याची हृदयाची धडधड वाढत असते. शरीर थरथरत असतं आणि सतत ताण-तणाव जाणवू शकतो. वेळेवर या गोष्टींना नियंत्रणात आणलं गेलं नाही. तर, ही लक्षणं तुम्हाला डिप्रेशनमध्ये घेऊन जाऊ शकतात.
लक्ष केंद्रित करण्यासाठी अडथळे
जर तुम्हाला एखादे काम करण्यासाठी लक्ष केंद्रित करताना अडचणी येत असतील. जर निर्णय घेण्यात किंवा कामे पूर्ण करण्यात अडचण येत असेल तर ते मानसिक आरोग्याचे लक्षण असू शकते.
तणाव, विसरभोळेपणा, चिंता आणि नैराश्यासारखी लक्षणे दिसली तर तो मानसिक आजार असू शकतो. सुरुवातीलाच डॉक्टरांचा योग्य सल्ला घेऊन ही समस्या सुधारली जाऊ शकते.
या गोष्टी जाणवत असतील तर वेळीच तज्ज्ञांचा सल्ला घ्या
नैराश्य
नैराश्य जोपर्यंत नियंत्रणात आहे तोपर्यंत ठीक आहे. जर ते अनियंत्रित झाले तर परिस्थिती गंभीर होऊ शकते. अशा परिस्थितीत जर तुम्हाला वाटत असेल की नैराश्य तुमच्या भावनांवर वर्चस्व गाजवत आहे, तर तुम्ही ताबडतोब डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
ताणतणाव आणि चिंता
जर तुम्हाला दैनंदिन कामे हाताळण्यात अडचण किंवा चिंता आणि तणाव वाटत असेल तर ते आरोग्यासाठी चांगले नाही. कारण, अशी चिन्हे मानसिक आरोग्याकडे निर्देश करतात. हे टाळण्यासाठी, स्वतःवर नियंत्रण ठेवा आणि तज्ञांना भेटा.
एकटेपणा जाणवणे
काहीवेळा जेव्हा लोक जास्त तणावाखाली असतात तेव्हा ते कुटुंब, नातेवाईक आणि मित्रांपासून दूर राहू लागतात. लोक याला क्षुल्लक समजतात आणि त्याकडे दुर्लक्ष करतात. त्यामुळे त्यांचे मानसिक स्वास्थ्य बिघडू लागते. कारण, एकटेपणा हे चिंतेचे कारण असू शकते. म्हणूनच, जर तुम्ही सतत या परिस्थितीचा सामना करत असाल तर नक्कीच एखाद्या तज्ञांना भेटा.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.