World Mental Health Day 2024 Sakal
लाइफस्टाइल

World Mental Health Day 2024: 'हे' 5 पदार्थ मानसिक आरोग्याला देते जीवनदान, आहारात नियमितपणे करा समावेश

पुजा बोनकिले

World Mental Health Day 2024: दरवर्षी 'जागतिक मानसिक आरोग्य दिन' 10 ऑक्टोबर रोजी जगभरात साजरा केला जातो. जागतिक मानसिक आरोग्य दिन 1992 मध्ये जागतिक मानसिक आरोग्य महासंघाच्या पुढाकाराने साजरा करण्यात आला. बहुतेक लोकांना मानसिक आरोग्याबद्दल माहिती नसते. जगातील लोकांमध्ये मानसिक आरोग्याविषयी जागरूकता वाढवणे या उद्देशाने हा दिवस साजरा केला जातो.

डॉक्टरांच्या मते, तुमच्या आहारात समाविष्ट असलेल्या अन्नाचा तुमच्या मूडशी थेट संबंध असतो. मानसिक आरोग्य चांगले ठेवण्यासाठी आहार योग्य असणे गरजेचा आहे. यासाठी आहारात कोणत्या पदार्थांचा समावेश करावा हे जाणून घेऊया.

कडधान्य

रोजच्या आहारात कडधान्यांचा समावेश करावा. यामुळे शरीराला आवश्यक पोषक घटक मिळतात. कडधान्यांमध्ये प्रथिने, फायबर मुबलक प्रमाणात असते. यामुळे आपले मानसिक आरोग्य निरोगी राहते. तुम्ही भाजी किंवा सॅलडमध्ये टाकून सेवन करू शकता.

केळी

केळीमध्ये व्हिटॅमिनबी ६ मुबलक प्रमाणात असते.ज्यामुळे सेरोटोनिन आणि डोपामाइन वाढते.यात शुगर आणि फायबर मुबलक प्रमाणात असते. यामुळे खराब मुड चांगला होतो.

पालेभाज्या

पालेभाज्यामध्ये मुबलक प्रमाणात फायबर, प्रथिने यासारखे अनेक पोषक घटक असतात. जे शरीरासाठी फायदेशीर असतात. पालेभाज्या खाल्यास डिप्रेशनची समस्या कमी होते. तसेच यात ओमेगा ३ फॅटी अॅसिड, मॅग्नेशिअम सारखे पोषक घटक असतात. तसेच असलेल्या पोषक घटकामुळे मानसिक आरोग्य चांगले राहते.

सुकामेवा

सुकामेव्यामध्ये काजू, अकरोड,बदाम यासारख्या पदार्थांचा समावेश होतो. तसेच यात ओमेगा ३ अॅसिड असते. ज्यामुळे मूड आणि मानसिक आरोग्य चांगले राहते. काही सुकामेव्यांमध्ये मॅग्नेशिअम आणि ऑक्सिजनचे प्रमाण अधिक असते.

टमाटर

टमाटरमध्ये अनेक पोषक घटक असतात. यामुळे अल्जायमर तसेच मानसिक आजाराशी संबंधित असलेले आजार दूर राहतात. तुम्ही टमाटरचा भाजी किंवा सॅलडमध्ये टाकून सेवन करू शकता.

डिस्क्लेमर : सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. सकाळ माध्यम समूह अशा कोणत्याही गोष्टींची पुष्टी करत नाही. अधिक तपशीलांसाठी तुम्ही तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेऊ शकता.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Manoj Jarange Video: तुम्ही पिता का हो? जरांगेंना थेट प्रश्न, उत्तरही धमाकेदार; जरांगे पाटलांची एक्सक्लुझिव्ह मुलाखत

Pune Crime : कल्याणीनगर अपघात प्रकरण; अल्पवयीन मुलाला जामीन देणारे जेजेबीचे दोन सदस्य बडतर्फ

Cocaine Seized: धक्कादायक! 200 किलो कोकेन जप्त, सुमारे 2 हजार कोटींचा माल हस्तगत, मोठ्या ड्रग रॅकेटचा पर्दाफाश

Ranji Trophy 2024: भारताचा कर्णधार मुंबईच्या रणजी संघातून खेळणार; महाराष्ट्रविरुद्ध मैदानात उतरणार

Dombivli News: कल्याण परिमंडलातील 2 हजार 437 ग्राहकांना अभय योजनेचा लाभ; 94 लाख रुपये माफ !

SCROLL FOR NEXT