How to get rid of loneliness: अलिकडे धकाधकीचं जीवन आणि वाढता ताण Teansions यामुळे अनेकदा एकाकीपणा जाणवण्याची समस्या अनेकांसमोर निर्माण होते.
सभोवतालची वाढती स्पर्धा, ध्येय गाठण्यासाठी होणारी धडपड यामध्ये अनेकदा नात्यांकडे दूर्लक्ष केलं जातं. Mental Health Tips in Marathi Avoid Loneliness through self help
अशात आपल्या जवळीची व्यक्ती आपल्यापासून दुरावल्याची भावना निर्माण होते आणि मग माणसांमध्ये राहूनही एकाकीपणा जाणवू लागतो. अनेकदा हा एकाकीपणा Loneliness तुमच्या मानसिक आरोग्यावर Mental Health विपरित परिणाम करू शकतो.
प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यात वेगवेगळ्या कारणांनी हा एकाकीपणा येऊ शकतो. काही वेळी जवळच्या किंवा कुटुंबातील Family व्यक्तीच्या मृत्यूनंतर किंवा प्रेमसंबधात फूट पडल्यानंतर एखाद्या मोठ्या घटनेनंतर एकाकीपणा येऊ शकतो.
अनेकदा नैराश्यामुळे देखील हा एकाकीपणा येतो. या एकाकीपणा मागे कोणतही कारणं असलं तरी तो वेळीच दूर करणं गरजेचं आहे. अन्यथा या एकाकीपणाचा गंभीर रूपात मनावर परिणाम होवू शकतो.
खास करून अनेकदा महिलांना आणि तरुणांना या एकाकीपणाचा सामना करावा लागतो. एखाद्या समस्येवर जर तोडगा निघत नसेल. त्या समस्येबद्दल इतरांशी न बोलल्याने केवळ स्वत: पुरत्या अनेक समस्या मर्यादित ठेवल्याने हा एकाकीपणा वाढू शकतो. यासाठी एकाकीपणा दूर करण्यासाठी काही उपाय करणं गरजेचे आहेत.
हे देखिल वाचा-
स्वत:वर प्रेम करा- अनेकदा महिला किंवा तरूण एखाद्या समस्येसाठी किंवा संकटासाठी स्वत:ला जबाबदार मानून त्याची शिक्षा स्वत:ला देत असतात.
यामुळे त्यांना एकाकीपणा येतो. मात्र यातून बाहेर पडण्यासाठी तुम्हाला स्वत:कडे लक्ष देणं गरजेचं आहे. स्वत:ची काळजी घ्या. तुम्हाला ज्या गोष्टी आवडतात त्या गोष्टी करा आणि त्या गोष्टींसाठी वेळ द्या.
स्वत:कडे लक्ष देणं याचा अर्थ कुटुंबाकडे किंवा इतर कामांकडे दुर्लक्ष करणं असा होत नाही. त्यामुळे यासाठी कुणी तुम्हाला दोष देणार नाही हे लक्षात घ्या.
नवा छंद जोपासा- एकाकीपणावर मात करण्यासाठी तुम्ही एखादा नवा छंद जोपासू शकता. यासाठी तुम्ही तुमच्या आवडीच्या विषयाचा एखादा कोर्सही करू शकता. बेकिंग, पेंटिग, एखादं वाद्य शिकणं किंवा नवी भाषा शिकणं अशा गोष्टीमध्ये तुम्ही तुमचं मन गुंतवू शकता.
यासाठी एखादा ऑलाईन क्लास लावण्याएवजी ऑफलाइन क्लास किंवा ग्रुप किंवा क्लब जॉईन करा. योगा, लायब्ररी किंवा म्युझिक यात तुमच्या आवडीच्या विषयानुसार कोर्स निवडा.
यामुळे तुमच्या मिळती जुळती आवड असलेल्या लोकांशी तुमचा संपर्क वाढेल. या लोकांशी संवाद वाढून तुमची मैत्री वाढू लागेल आणि तुमचा एकाकीपणा दूर होईल,
हे देखिल वाचा-
स्वयंसेवक – एखादा क्लास किंवा क्लब प्रमाणेच तुम्ही एखाद्या स्वयंसेवी संस्थेसाठी स्वयंसेवक म्हणूनही काम करू शकता. इथं देखील विविध उपक्रामांमध्ये सहभागी झाल्याने तुमचा लोकांशी संपर्क वाढेल. गटासोबत काम केल्याने तुमचा एकाकीपणा दूर होईल.
विविध लोकांचे अनुभव जाणून घेता येतील. तसचं एखादं समाजोपयोगी काम घडत असल्याचा आनंद मिळाल्याने एकाकीपणा दूर होण्यास लवकर मदत होईल.
अनुभवांवर पैसा खर्च करा- अनेकदा पैसा कमवण्याच्या शर्यतीमुळेच अनेकांना एकाकीपणा येतो. मात्र हाच पैसा वेगवेगळे नवे अनुभव घेण्यासाठी खर्च केल्यास तुमचं एकाकीपण दूर होण्यास मदत होईल.
स्वत:च्या आवडीच्या ठिकाणी फिरायला जा किंवा एखाद्या ग्रुप पिकनिक किंवा ट्रेकिंगची मजा लूटा. जे आजवर तुम्ही केलं नसेल त्याचा अनुभव घेण्यासाठी पैसे खर्च करा. यामुळे देखील विविध अनुभवांमधून तुम्हाला तुमच्या समस्येचं निसरन होऊन एकाकीपणा दूर होईल.
नव्या लोकांशी संवाद साधा- अलिकडचं आयुष्य हे चार भिंतींच्या आत मर्यादीत झालं आहे. संवाद कमी झाल्याने एकाकीपणा वाढत चालला आहे. मात्र हा एकाकीपणा दूर करण्यासाठी तुम्ही पहिलं पाऊल उचलणं गरजेचं आहे. तुमच्या ओळखीच्या किंवा अनोळखी व्यक्तींशी संवाद साधण्याचा प्रयत्न करा,
म्हणजेच तुमचे नवे शेजारी असतील, कॉलेजमधील इतर विद्यार्थी किंवा नव्या ऑफिसमधील कर्मचारी. त्यांच्याशी न संकोचचा संवाद सुरु करा कदाचित त्यानंतर तुम्हाला या गोष्टीचा आनंद होईल.
स्वत:ला व्यग्र ठेवा- स्वत:ला व्यग्र ठेवणे याचा अर्थ तुमच्या रोजच्या तुम्हाला न पटताही कराव्या लागणाऱ्या कामांमध्ये नव्हे तर या कामांव्यतिरिक्त तुमच्या आवडीच्या इतर कामांमध्ये व्यग्र रहा.
मग घराची सजावट असेल, नवी रोपं लावणं असेल. एखादं पुस्तक वाचणं, सिनेमा पाहणं किंवा शोभेच्या वस्तू तयार करणं अशा कामांमध्ये व्यग्र राहिल्याने एकाकीपणा दूर होईल.
अशा प्रकारे तुम्हाला एकाकीपणातून बाहेर पडण्यासाठी इतरांपेक्षा स्वत:ची मदत घेणं जास्त गरजेंचं आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.