Met Gala 2024  esakal
लाइफस्टाइल

Met Gala 2024 : अरबपती सुधा रेड्डीच्या ड्रेसपेक्षा नेकलेसचीच जास्त हवा, 180 कॅरेटच्या डायमंड नेकलेसने सर्वांचंच वेधलं लक्ष

सकाळ डिजिटल टीम

Met Gala 2024 :

सध्या बॉलिवूड आणि बिझनेस जगतात Met Gala 2024 ची जास्त चर्चा सुरू आहे. कोणी कसा लुक केलाय, कोणी कोणती फॅशन केलीय याचेच गॉसिपिंग सुरू आहे. सोशल मिडियाही यामध्ये मागे पडलेला नाही. अशातच काल एका बिझनेस वुमनने घातलेल्या नेकलेसने सर्वांचेच लक्ष वेधून घेतले आहे.

अबरपतींच्या यादीत नाव असलेली बिझनेसवुमन सुधा रेड्डीच्या नेकलेसने Met Gala 2024 मध्ये हवा केली आहे. व्हाईट प्रिंसेस गाऊन घातलेल्या सुधाने तब्बल १८० कॅरेटचा डायमंड नेकलेस घातला होता. तिच्या या नेकलेसचा फोटो जास्त व्हायरलही झाला आहे.

सुधा याआधी Met Gala २०२१ मध्ये दिसली होती. तिने यंदा फाल्गुनी शेन पीकॉकने कस्टमाइज केलेला पांढऱ्या रंगाचा गाऊन परिधान केला होता.  तिचा हा लुक Met Gala च्या The Garden Theme ला परफेक्ट रिप्रेझेंट करत होता.

Met Gala 2024 चा Event न्यूयॉर्कमधील मेट्रोपॉलिटन म्युझियम ऑफ आर्टमध्ये सुरू आहे. तिथे प्रवेश करताच सर्वांच्या नजरा तिच्या सुंदर ड्रेसवर खिळल्या होत्या. तिने हा ड्रेस खास या कार्यक्रमासाठी डिझाइन केला होता.

सुधा रेड्डी यांनी फॅशन डिझायनर तरुण तहलियानी यांनी डिझाइन केलेला ड्रेस परिधान केला होता. हा ड्रेस, नेकलेस आणि सुधाचा संपूर्ण लुक पाहून अनेक लोक तिचे चाहते बनले आहे.

Met Gala 2024 मध्ये सुधा रेड्डी यांनी परिधान केलेल्या विशेष ड्रेसची किंमत सुमारे 10 लाख अमेरिकन डॉलर्स आहे. तिने एकूण 180 कॅरेटचे 30 सॉलिटेअर हिरे असलेला सुंदर नेकलेस परिधान केला होता. ज्यामध्ये 25-कॅरेट Heart आकाराचा हिरा होता. तसेच आणखी तीन 20-कॅरेट Heart आकाराचे हिरे होते. या नेकलेसने तिच्या सौंदर्यात अधिकच भर घातली होती.

या नेकलेससोबत, तिने 2 डायमंड सॉलिटेअर अंगठ्या देखील परिधान केल्या होत्या. ज्यांची किंमत अंदाजे $20 लाख होती. हेवी डायमंड स्टड लूकने तो छान दिसत होता. या लुकला परिपूर्ण बनवण्यासाठी तिने विंटेज चॅनेल बॅग कॅरी केली होती. (Met Gala)

सुधाने तिच्या Instagram अकाऊंटवर या लुकबद्दल पोस्ट केली आहे. सुधाचा हा ड्रेस बनवण्यासाठी तब्बल 4500 तास लागले आहेत. तर, 80 हुन अधिक कलाकारांनी हाताने हा ड्रेस तयार केला आहे. या पांढऱ्याशुभ्र गाऊनवर 3D फुलपाखरे बनवली आहेत, तर हातांच्या जागी मोत्यांची सजावट केली आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

तो जगला, तरच देश जगेल

कृषिक्षेत्र आधुनिकतेच्या दिशेनं

जातिनिहाय जनगणनेची अपरिहार्यता

निवडणूक काश्मीरची; परीक्षा केंद्राची

संघ भाजपच्या मदतीला येणार...

SCROLL FOR NEXT