Midnight Hunger causes Esakal
लाइफस्टाइल

Midnight Hunger: तुम्हाला देखील मध्यरात्री भूक लागते का? Ice cream किंवा Sweets खाण्याची इच्छा होते का? हे आहे त्यामागचं कारण

मध्यरात्री अचानक भूक का बरं लागत असेल, असा प्रश्न अनेकांना पडत असेल. शिकागो विश्वविद्यालयात केल्या गेलेल्या एका संशोधनानुसार अपुरी झोप किंवा निद्रेशी संबंधीत काही विकार रात्री भूक लागण्यासाठी जबाबदार असतात

Kirti Wadkar

Midnight Hunger Causes: गेल्या काही वर्षांमध्ये जीवनशैलीमध्ये LifeStyle मोठ्या प्रमाणात बदल घडत आहेत. या बदललेल्या जीवनशैलीचा आपल्या आरोग्यावरही Health परीणाम होतो.

कामामुळे किंवा ताण, तणाव, सोशल मीडियाचा Social Media वापर अशा अनेक कारणांमुळे अलिकडे झोपेच्या समस्या देखील निर्माण झाल्या आहेत. Midnight Craving may prove dangerous know the reasons Marathi Health Tips

यातच आणखी एक समस्या म्हणजे मध्यरात्री भूक लागणं. रात्री पोटभर जेवून झोपल्यावरही मध्यरात्री अचानक भूक Hunger लागणं हे अनेकांसोबत घडतं असतं. दिवसभर पोटभर खाऊनही तसचं झोपण्यापूर्वी देखील पोटभर जेवण Meal करून जेवल्यावरही अनेकदा रात्री मध्येच अचानाक जाग येते.

अशावेळी पोटात मोठा खड्डा पडल्याचं जाणवतं. असं अनेकांसोबत होत असेल. अशा वेळी मग रात्री फ्रिज Refregerator उघडून काही तरी खाण्याचा खास करून काहीतर गोड खाण्याचा मोह तर अनेकांना होतो.

मध्यरात्री अचानक भूक का बरं लागत असेल, असा प्रश्न अनेकांना पडत असेल. शिकागो विश्वविद्यालयात केल्या गेलेल्या एका संशोधनानुसार अपुरी झोप किंवा निद्रेशी संबंधीत काही विकार रात्री भूक लागण्यासाठी जबाबदार असतात.

गाढ आणि शांत झोप लागत नसल्याने देखील अनेकदा मध्यरात्री गोड किंवा जंक फूड खाण्याची इच्छा होते. मात्र याशिवाय यासाठी काही इतर कारणं देखील जबाबदार आहेत. ही कारणं कोणती ते पाहुयात.

हे देखिल वाचा-

तणाव- सध्या वाढत असलेला तणाव हे मध्यरात्री भूक लागण्यासाठीचं एक मुख्य कारण आहे. स्ट्रेसमुळे कोर्टिसोलची पातळी वाढते यामुळेच इन्स्युलिनही वाढतं. यामुळे अनेकांना रात्री भूक लागू शकते. यामुळे बरेचजण रात्री उठून गोड किंवा इतर जंक फूड खातात.

परिणामी शरीरावर याचा दुष्परिणाम होते. चिंता आणि तणावामध्ये असलेल्या व्यक्तीमध्ये मध्यरात्री भूक लागण्याचं म्हणजे Night cravingचं प्रमाण जास्त आढळून येतं. यामुळेच लठ्ठपणा, कोलेस्ट्रॉल आणि इतर समस्या निर्माण होतात.

खाण्याच्या चुकीच्या सवयी- अनेकजण सकाळच्या नाश्ता करण्याकडे दुर्लक्ष करतात मात्र सकाळचा नाश्ता हा शरीरासाठी अत्यंत गरजेचा आहे. यामुळे शरीराला दिवसभराची ऊर्जा मिळते. सकाळी नाश्ता न केल्यास त्याचा परिणाम संपूर्ण दिवस आणि रात्रीच्या भूकेवरही होतो.

दिवसभर शरीराला आवश्यक असलेलं पोषण न मिळाल्यास रात्री खाण्याची इच्छा होते. तसचं जर तुमच्या आहारामध्ये प्रोटीनचं प्रमाण कमी असेल तर दिवसा अखेर किंवा रात्री झोपल्यानंतर तुम्हाला भूक लागू शकते.

झोपण्याच्या बदत्या आणि अयोग्य वेळा- जर तुमचं झोपेचं वेळापत्रक ठरलेलं नसेल तर तुम्हाला नक्कीच रात्री भूक लागण्याची समस्या सतावू शकते. जेव्हा तुम्ही पुरेशी झोप घेत नाहीत तेव्हा शरीर थकल्याने कार्टिसोल हार्मोन्स वाढू लागतात. या हार्मोन्समुळे गोड किंवा फॅटी पदार्थ म्हणजेच जंक फूड खाण्याची इच्छा निर्माण होते.

एकंदरचं अपुऱ्या झोपेमुळे हार्मोन्सचं संतुलन बिघडतं परिणामी रात्री झोप मोड होत राहत असेल तर तुम्हाला भूक लागू शकते.

रिफाइंड कार्बच्या सेवनामुळे- रिफाइंड कार्ब्समध्ये फायबरचं प्रमाण कमी असल्याने रक्तातील सारखेचं प्रमाण कमी जास्त होत राहतं. तसचं कमी फायबर असल्याने शरीर ते लगेचच पचवतं. त्यामुळे तुम्हाला पुन्हा पुन्हा भूक लागू शकते.

म्हणजेच दिवसभर किंवा रात्री जेवणामध्ये तुम्ही अशा रिफाइंड कार्ब्स असलेल्या पदार्थांचं सेवन केल्यास तुम्हाला मध्यरात्री भूक लागू शकते. यासाठी रात्री ब्रेड, पिझ्झा, पास्ता अशा पदार्थांचं सेवन टाळावं.

हे देखिल वाचा-

कमी पाणी प्यायल्याने- अनेकदा दिवसभर पाणी कमी प्यायल्याने देखील सतत भूक लागते. शरीरात पाण्याची कमतरता निर्माण झाल्यास रात्री भूक लागू शकते. यासाठी दिवसभर शरीर हायड्रेट ठेवणं गरजेचं आहे.

या काही कारणांमुळे मध्यरात्री भूक लागू शकते. यासाठी जीवनशैलीत काही बदल केल्यास ही समस्या दूर होवू शकते. यासाठी जेवणाच्या आणि झोपेचं वेळापत्रक योग्य असणं गरजेचं आहे.

तसचं दिवसभर योग्य प्रमाणात आणि पोषक आहार घ्यावा. खासकरून रात्री हलका मात्र प्रोटीन आणि पोषक तत्व असला आहार घ्यावा. रात्री भूक लागली तर थोडं पाणी प्याव. How To Control mid Night Cravings

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: पुणे जिल्ह्यात महायुती, महाविकास आघाडी यांच्यापैकी कोणाला मिळणार मतदारांचा कौल?

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: मुंबईत नक्की कोण मारणार बाजी? वाचा एका क्लिकवर

Chopda Assembly Election 2024 Result Live: चोपडा विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडी विरुद्ध महायुतीत काटे की टक्कर..!

Islampur Assembly Election 2024 Results : जयंत पाटील विरुध्द निशिकांत पाटील

Erandol Parola Assembly Election 2024 result live : एरंडोल पारोळ्यात कोण मारणार बाजी?

SCROLL FOR NEXT