Mobile In Toilet esakal
लाइफस्टाइल

Mobile In Toilet : तुम्हीही टॉयलेटमधे मोबाईल वापरता का? त्याचे गंभीर परिणाम वाचून उडेल झोप

सकाळ डिजिटल टीम

Mobile In Toilet : सध्याच्या युगात मोबाईलशिवाय दैनंदिन जीवन अवघड होऊन बसले आहे, ऑफिस ते बाजारापर्यंतची बहुतांश कामे स्मार्ट फोनद्वारेच होतात. रात्री झोपतानाही आपण फोनच्याच संपर्कात असतो, एवढेच नाही तर काही लोक टॉयलेट सीटवर बसूनही मोबाईलवर गेम खेळतात किंवा व्हिडीओ पाहतात. परंतु तुम्हाला माहिती आहे का की असे करणे तुमच्या आरोग्यासाठी किती घातक आहे. याचे तुमच्यावर काय परिणाम होऊ शकतात ते जाणून घेऊया.

बॅक्टेरियाचा धोका

टॉयलेटमध्ये सर्वत्र हानिकारक बॅक्टेरिया असतात, जेव्हा आपण तिथे बसून मोबाईल ऑपरेट करतो तेव्हा त्याच हाताने मग, जेट स्प्रे, टॉयलेट कव्हर आणि फ्लश बटणाला स्पर्श करतो. यामुळे सेलफोनच्या स्क्रीनवर अनेक प्रकारचे हानिकारक जंतू जमा होतात. तुम्ही तुमचे हात साबणाने स्वच्छ करू शकता, परंतु तुम्ही मोबाईलला सहजासहजी धुवू शकत नाही. जेव्हा तुम्ही पुन्हा स्मार्ट फोनला स्पर्श करता तेव्हा जेवताना पुन्हा जंतू तुमच्या पोटात प्रवेश करतात, त्यानंतर पोटदुखी, बद्धकोष्ठता, अपचन आणि मूत्रमार्गात संसर्ग होण्याचा धोका वाढतो.

डायरीया

जेव्हा मोबाईल टॉयलेटमध्ये नेऊन तसाच मोबाईल तुम्ही परत बाहेर आल्यावर वापरता तेव्हा तो जिवाणूंनी दूषित झालेला असतो, आणि नंतर तोच मोबाईल खाताना बसताना तुम्ही जेव्हा (Disease) वापरता तेव्हा तेच बॅक्टेरिया आपल्या आतड्यात पोहोचतात आणि डायरियासारख्या समस्यांचे कारण बनतात, त्यामुळे आतड्यात जळजळ देखील होऊ शकते.

Diarrhoe

मूळव्याध

मूळव्याध होण्यामागे अनेक कारणे असू शकतात, परंतु हे सहसा कमकुवत पचनामुळे होते. सध्याच्या युगात टॉयलेटमध्ये मोबाईलच्या वापरामुळेही हा आजार वाढत आहे. याशिवाय सतत टॉयलेटमध्ये बसल्याने मांडीच्या स्नायूंवरही वाईट परिणाम होतो. (Health)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana : आता वाट बघा! लाडकी बहीण योजनेचा पुढचा हप्ता कधी? नवीन सरकार...

Share Market Today: अमेरिकन बाजार नव्या उच्चांकावर; पण गिफ्ट निफ्टी घसरला, आज कोणते शेअर्स असतील तेजीत?

Kopargaon Assembly election 2024 : कोपरगाव विधानसभेत काळे अन् कोल्हेंत पुन्हा चुरस

Shrigonda assembly election 2024 : श्रीगोंदा विधानसभा मतदारसंघात प्रस्थापितांची उमेदवारीसाठी रस्सीखेच

Latest Maharashtra News Updates : भाजपची पहिली यादी आज जाहीर होण्याची शक्यता; 100 पेक्षा जास्त उमेदवारांची होणार घोषणा?

SCROLL FOR NEXT