Saving Tips : इंग्रजीत एक म्हण आहे Money saved is money earned. मात्र कमी पगारात नेमकी बचत करावी कशी असा प्रश्न तुम्हाला पडत असेल.कारण सेव्हिंग्ज कधीही महत्वाच्या असतात. अडचणीच्या वेळी त्या कामी येतात. आज तुम्हाला पैसे बचतीच्या काही खास टिप्स सांगणार आहोत. ज्याने तुमच्या पैशांची बचत नक्कीच होईल.
या टिप्स वापरून करा पैशांची बचत
घरातील सगळी कामे शक्य असल्यास स्वत: केली तर पुढील बचत होईल.
उदा. भांडी घासणे- ८००/-
घरातील कामांना बाई असणे, उदा. झाडझूड, कपडे आणि बरंच काही
गरज नसेल तर उगाच टीव्हीवर जास्त चैनलचे पैसे न भरणे ३००/-
शक्यतो आजारी पडल्यास होम्योपेथी डॉक्टरांचे औषध घेणे.
घरातील प्रत्येक व्यक्तीने आठवणीने वापर झाला की नळ, लाईट, पंखे, सिलेंडर, चार्जर याचे स्वीच ऑफ करावेत.
बोरवेल ची टाकी किती मिनीटात भरते याचा अंदाज घेऊन वीज व पाणी यांचा अपव्यय टाळावा.५००/-
जवळच्या अंतरावर गाडी नेण्याऐवजी पायी जाणे ५००/-
अनावश्यक खरेदी टाळणे.१०००/-
हॉटेलींग कमी करणे.१०००/- (Tips)
आणखी काही मुद्दे:
१. कपडे इस्त्रीला देण्या ऐवजी घरीच इस्त्री करणे.धोबी एका कपड्याचे १० रुपये घेतो. एका व्यक्तीमागे आठवड्याला तीन शर्ट तीन पैंट अंदाजे असतात.म्हणजे महिन्याला ६*४ =२४*१०=२४०रु. कपडे प्रति व्यक्ति प्रति महिना
२.तुम्ही जर किमान पदवीधर (सिरीअसली अभ्यास करुन)असल्यास आपल्या मुलगा / मुलगी ला शिकवणी लावण्याऐवजी घरी शिकवु शकता.(मासिक बचत ५००ते १५००) (Salary)
३. दिनशाचे सर्वोत्तम फुल क्रीम मिल्क आणु शकता. दुध महाग आहे (६५ रु प्रति लिटर). रोज एक लिटर आणल्यास चहा कॉफी होउन लहान मुलांना रोज पिता येतं. याखेरीज रोज २००ग्राम दही घरीच विरजण लावता येतं. (दही बाजार भाव प्रति लिटर ६०-८०रु.).आणि रोज साय जमा करुन महीन्याला एक ते सव्वा किलो तुप तयार करता येतं.
४. घरी मुबलक जागा, पाणी,आणि सुर्यप्रकाशाची व्यवस्था असेल तर बाराही महीने पुजेपुरती फुले मिळतील अशी फुलझाडे कुंड्यांमधे लावा. त्यात खतासाठी मातीचे एक मडके ठेऊन त्यात रोजचे भाजीपाल्यातील कचरा, फळांची साले,कांदे लसुण चे टरफल मातीचे थर लावुन गोळा करु शकता.एक महीन्यात कंपोस्ट खत तयार होते.ते झाडांना घालु शकता.उत्तम फुले येतात.(यात बचत म्हणजे रोजचा बेलफुल खर्च १० रु. प्रमाणे महीन्याला ३००रु.) कंपोस्टची बचत १००रु.) (Save Money)
(आता एकुण बचतीचा अंदाज:१४६००)
वर दिलेली कामे जर तुम्ही स्वत: करत असाल, गृहीणी असाल आणि कोणी तुम्हाला घरीच असण्यावरुन,पैसे न कमवण्या वरून बोलत असल्यात तुम्ही त्यांना आपण किती पैसे वाचवतो हे सांगु शकता.
नोट : वर सांगितलेल्या सगळे उपाय हे घरघुती अनुभवांवर आधारलेले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.