पावसाचं पाणी घराच्या भिंतींमध्ये झिरपलं की भिंतींना ओल पकडते आणि तुम्ही भिंतीला दिलेल्या रंगाची पूर्ण वाट लागते. ओल लागल्यामुळे रंगाचे आणि प्लास्टरचे पोपडे पडण्यास सुरुवात होते.
पण भिंतींना ओल पकडल्यामुळे फक्त त्या खराब होतात असं नाही तर त्यात किड निर्माण झाली की आणखी मोठ्या समस्यांना सामोरं जावं लागतं.तुमच्याही घरच्या भिंतींना जर पावसाळ्यात ओल धरत असेल तर त्याकडे वेळेआधीच लक्ष देणं खूप गरजेचं आहे.
पावसाळ्यात भिंतींना ओल येण्यामागची कारणं आधी आपण जाणून घेऊयात.
1) पावसाचं पाणी जर बाहेरुन सारखंच भिंतींवर पडत राहीलं तर भिंती ओल्या होतात. कधी कधी घराच्या छतांवर पाणी साचतं आणि ते भिंतींमध्ये झिरपून भिंती ओलसर होतात. यामुळे भिंती आणि दरवाजांनाही तडे जातात जमिनीतील आर्द्रता वरच्या भागात येते आणि त्यामुळे भिंती खराब होतात.
2) कधी कधी तर घरातील ड्रेनेज पाईप ब्लाकमुळेही भिंती ओल्या होतात आणि त्या खराब होण्यास सुरुवात होते. ज्या ज्या ठिकाणी पाणी साचतं किंवा ज्या भिंती खराब झाल्या आहेत. त्या व्यवस्थित साफ सफाई करुन त्यावर नवं प्लास्टर करुन घेणं कधीही चांगलं.
3) कधी कधी भिंतीला बाहेरुन लावण्यात आलेला रंग वॉटरप्रूफ नसतो, त्यामुळे पाणी भिंतीत झिरपतं. त्यामुळे नवं प्लास्टर करुन घेणं हा जालीम उपाय ठरू शकेल. घराच्या बाहेरील भिंतींनी वॉटरप्रूफ कोटिंग करुन घेणं कधीही चांगलं. यामुळे भिंती पाण्यापासून सुरक्षित राहतात.ज्या ठिकाणी प्लास्टर पाण्यामुळे फुगलेलं दिसत असेल ते तातडीनं काढून टाका आणि नवं प्लास्टर करा. तसंच त्यावर वॉटर प्रूफ कोटिंग करू घ्या.
4) बाजारात सिमेंटमिश्रीत वॉटर प्रोटेक्शन केमिकल सहज उपलब्ध होतात. याचा वापर करुन तुम्ही ओलसर भिंतीची समस्या सोडवू शकता.भिंतींना पडलेल्या चिरा सिमेंटनं भरुन घ्या. जेणेकरुन भिंतीत पाणी झिरपणार नाही. तुमच्या घराच्या भिंतींना जर चिरा पडलेल्या असतील तर भिंतीत आर्द्रता पकडण्याची दाट शक्यता असते. त्यामुळे चिरांजवळील जागा ओली होते आणि भिंत खराब होण्यास सुरुवात होते.
5) पावसाळा सुरू होण्याआधीच जर तुम्ही यावर काम केलं तर ते सुकायला तितकाच वेळ मिळतो आणि व्यवस्थित डागडुजी होते.घरातील पाइपिंगमध्ये गळती लागली असेल म्हणजेत घरात पाणी पुरवठा करणारा किंवा ड्रेनेजचा एखाद्या पाईपला गळती लागली असेल तर भिंती ओल्या होतात. त्यामुळे घरातील पाइपिंगची व्यवस्था तपासून घ्या आणि काही त्रुटी असतील तर त्या दुरूस्त कराव्यात. तसंच छतावर पडणारं पावसाचं पाणी वाहून नेणारे पाईप देखील एकदा पावसाळ्याआधी तपासून पाहावेत. उन्हाळ्यामुळे प्लास्टिक पाईपना तडे जाण्याची शक्यता असते. त्यामुळे भिंतींचं नुकसान होतं.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.