Monsoon Gardening Tips Sakal
लाइफस्टाइल

Monsoon Gardening Tips: बागकामाची आवड असेल तर घरच्या घरी बनवा 'या' 5 प्रकारची सेंद्रिय खते

How To Make Organic Fertilizer At Home: पावसाळ्यात झाडांची वाढ योग्य होण्यासाठी घरीच सेंद्रिय खत बनवू शकता. यासाठी कोणत्या गोष्टींचा वापर करावा हे जाणून घेऊया.

पुजा बोनकिले

Monsoon Gardening Tips: अनेक लोकांना बागकाम करायची आवड असते. अनेक लोक आपल्या घरातील बागेत पावसाळ्यात विविध झाडे लावतात. तसेच पावसाळ्यात बागायती कामे करणे झाडांच्या वाढीसाठी फायदेशीर असते. झाडांची योग्य वाढ होण्यासाठी माती, पाणी आणि सुर्यप्रकाशासह योग्य दर्जेदार खताची गरज असते. झाडांना योग्य खत दिले नाही तर त्यांची योग्य वाढ होत नाही.

सध्या बाजारात विविध रासायनिक खत मिळतात. तुम्हाला बाजारातील खत वापरायचे नसेल तर घरच्या घरी सेंद्रीय खत तयार करू शकता. हे खत बनवण्यासाठी घरातील गोष्टी पुरेश्या आहेत तुम्हाला वेगळ्या वस्तू बाजारातून आणण्याची गरज नाही. झाडांच्या योग्य वाढीसाठी घरीच सेंद्रिय खत कसे बनवायचे हे जाणून घेऊया.

चहापत्तीचा वापर

फरलेल्या चहापत्तीचा वापर सेंद्रिय खत म्हणून करू शकता. यामुळे झाडांना भरपुर फुले येतात. यासाठी फुल झाडांच्या मुळात चहापत्तीचे पाणी टाकावे. गुलाब, जास्वंद यासारख्या फुलझाडांसाठी या खताचा वापर करू शकता.

फळ किंवा भाज्यांच्या साली

स्वयंपाकघरात असलेल्या विविध फळे आणि भाज्यांच्या सालीपासून सेंद्रिय खत तयार करता येते. यासाठी केळी, संत्री, कांदा इत्यादींची साले ७ ते ८ तास पाण्यात भिजत ठेवावे. नंतर साल आणि पाणी वेगवेगळे करा. पाणी एका बाटलीत टाका. हे पाणी आठवड्यातून दोन ते तीन वेळा झाडांना देऊ शकता. यामुळे झाडे हिरवीगार राहतील आणि योग्य वाढ देखील होईल.

शेणाचा वापर

झाडांच्या योग्य वाढीसाठी गाईचे शेण किंवा गोमुत्र सेंद्रिय खत म्हणून वापरू शकता. यासाठी शेण गोळा करून ठेवावे. नंतर आठवड्यातून एक किंवा दोनदा झाडांच्या मुळात टाकावे. यामध्ये कोणतेही रासायनिक खत मिक्स करण्याची गरज नाही.

सोयाबीनचा वापर

घरी सेंद्रिय खत बनवण्यासाठी सोयाबीनचा वापर करू शकता. यासाठी एक कप पाण्यात रात्रभर सोयाबीन भिजत ठेवावे. नंतर दुसऱ्या दिवशी सकाळी एका बाटलीत काढावे. हे पाणी झाडांवर टाकावे. यामुळे झाडांची चांगली वाढ होते.

इनोचे पाणी

पाण्यात इनो मिक्स करून खास सेंद्रिय खत तयार करू शकता. जर झाडांमध्ये किड लागली असेल तर या पाण्याचा वापर करावा. झाडाच्या ज्या भागात किड लागली आहे तिथे हे पाणी टाकावे यामुळे झाडांची योग्य वाढ होईल.

डिस्क्लेमर : सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. सकाळ माध्यम समूह अशा कोणत्याही गोष्टींची पुष्टी करत नाही. अधिक तपशीलांसाठी तुम्ही तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेऊ शकता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Election: विधानसभा निवडणुकीत दुबईत आला पैसा, क्रिप्टोकरन्सीद्वारे बेकायदा फंडिंग; भाजपचा मविआवर खळबळजनक आरोप

Maharashtra Assembly Election 2024 : महाराष्ट्र नोंदवेल का ६५ टक्के मतदान? दहा वर्षांपासून ६० टक्केच नोंद

Women’s Asian Champions Trophy: भारतीय संघाची पाचव्यांदा फायनलमध्ये धडक; जपानला सेमीफायनलमध्ये केलं पराभूत

Hitendra Thakur: एका मताच्या जोरावर विलासराव देशमुखांचं सरकार तारणारे हितेंद्र ठाकूर; बदल्यात काय घेतलं होतं?

Anil Deshmukh : तुम्ही दगड मारा किंवा गोळ्या झाडा, अनिल देशमुख मरणार नाही, आणि तुम्हाला सोडणारही नाही

SCROLL FOR NEXT