Monsoon Hair Care esakal
लाइफस्टाइल

Monsoon Hair Care : औषधोपचारातून पावसाळ्यातील केसगळती रोखणे सहज शक्य

Monsoon Hair Care : महिलांमध्ये प्रामुख्याने केसगळतीसाठी हॉर्मोनल घटक जबाबदार ठरू शकतात.

सकाळ वृत्तसेवा

Monsoon Hair Care : केस हे स्त्री आणि पुरुष यांच्या सौंदर्याचा मुकुट आहे, असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. मात्र हे केस गळायला लागतात, तेव्हा मात्र चिंता होते. आजार, विविध रसायनांचा केसांवर वापर करण्यासोबतच आनुवंशिकता अशी विविध कारणे केस गळतीची आहेत.

तसेच सिझनल अर्थात पावसाळा, हिवाळा आणि उन्हाळ्यात केसगळतीला विविध कारणे असतात. मात्र योग्य औषधोपचारातून तज्ज्ञांच्या उपचारातून केसगळती सहज थांबवता येत असल्याचे निरीक्षण केस रोपण तसेच त्वचा विकार तज्ज्ञांनी नोंदविले.

सामान्यपणे प्रत्येक व्यक्तीचे दर दिवशी ५० ते १०० केस गळतात. याचे कारण म्हणजे केस सायकलनुसार वाढतात तर काही केस टेलोजेन अवस्थेत जातात. हे गळलेले केस साधारण १०० दिवसांनंतर पुन्हा उगवू शकतात. पण त्यासाठी पोषण आहार घ्यावा लागतो.

नगण्य केसगळतीमुळे डोक्यावरील केस कमी झाल्यासारखे वाटत नाहीत. परंतु जसजसे वय वाढत जाते, तसतसे व्यक्तीचे केस विरळ होत जातात. महिलांमध्ये प्रामुख्याने केसगळतीसाठी हॉर्मोनल घटक जबाबदार ठरू शकतात, असे डॉ. जैन म्हणाल्या.

गळती रोखण्यासाठी

  • जंकफूड पासून दूर राहावे

  • अल्कोहोल पासून दूर राहावे

  • धूम्रपानापासून दूर राहावे

  • केस वारंवार धुऊ नका

  • योग्य शॅम्पूचा वापर करा

  • चांगले कंडिशनर वापरा

  • टॉवेलने केस हळूवारपणे कोरडे करा

पावसाळ्यात का होते जास्त केसगळती

दमट वातावरणामुळे टाळूची त्वचा ओलसर होते.

ओलसर त्वचेमुळे केसांची मुळे कमकुवत होतात.

घाम, हवेतील आर्द्रतेमुळे टाळू तेलकट, चिकट बनते.

पावसाच्या पाण्यात प्रदूषकांमुळे नैसर्गिक तेल कमी होते.

नैसर्गिक तेल कमी झाल्यास केस ठिसूळ होतात.

महिलांच्या केसगळतीला हार्मोनल घटक कारणीभूत ठरतात. तर पुरुषाचे केस गळत असून टक्कल पडू लागते, तेव्हा त्यांचा आत्मविश्वास कमी होत असल्याचे दिसून येते. एका पाहणीनुसार वयाच्या पस्तिशीपर्यंत दोन तृतीयांश पुरुषांचे केस कमी होऊ लागतात. याला आनुवंशिकता कारणीभूत असते. पावसाळा असो की हिवाळा, केसांमधील नैसर्गिक तेल टिकून राहील याकडे लक्ष देण्याची गरज आहे. त्वचाविकार तज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार केसांसाठी पोषणहार तसेच हेअरग्रोथ औषधांचा वापर केल्यास केसाचें सौंदर्य टिकवून ठेवता येते.

- डॉ. रिचा जैन, डर्म-कॉस्मेटोलॉजिस्ट आणि ट्रायकोलॉजिस्ट, नागपूर.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ED in Action: ॲमेझॉन-फ्लिपकार्टवर ईडीची कारवाई; मोठ्या शहरांमध्ये 20 ठिकाणी टाकले छापे, काय आहे प्रकरण?

Success Story : नोकरीच्या मागे न लागता पदवीधर तरुणाने फुलवली केळी बाग; वीस गुंठ्यांत घेतले 'इतक्या' लाखांचे उत्पन्न

Bus चालवताना चालकाला Heart Attack, कंडक्टरने फिल्मी स्टाईलमध्ये स्टेअरिंग हाती घेतले, मात्र...

Nagpur Assembly Election 2024 : जातीय समीकरण साधण्यात काँग्रेसला अपयश; तेली मतदारांसह मुस्लीम, हलबांकडे दुर्लक्ष

Shah Rukh Khan: सलमाननंतर आता शाहरुख खानला धमकीचा फोन; जीवे मारण्याची धमकी, पोलिसांनी ट्रेस केला कॉल

SCROLL FOR NEXT