Monsoon Hair Care esakal
लाइफस्टाइल

Monsoon Hair Care : पावसाळ्यात केसांची काळजी कशी घ्यायची? केस गळती अन् कोंड्यापासून ‘असा’ करा बचाव

Monika Lonkar –Kumbhar

Monsoon Hair Care : सध्या देशातील अनेक भागांमध्ये पावसाने दमदार हजेरी लावली आहे. महाराष्ट्रात तर मागच्या ४-५ दिवसांमध्ये सर्वत्र मुसळधार पाऊस पडला आहे. थोडक्यात सांगायचे झाल्यास महाराष्ट्रात मोठ्या दिमाखात पावसाचे आगमन झाले आहे. पावसाळ्यात आरोग्याच्या अनेक समस्या निर्माण होतात. त्यामुळे, आरोग्याची खास काळजी घेणे गरजेचे आहे.

परंतु, या सोबतच त्वचा आणि केसांची ही खास काळजी घ्यावी लागते. कारण, या दिवसांमध्ये दमट वातावरणाचा त्वचा आणि केसांवर परिणाम होतो. पावसाळ्यात तर अनेकांचे केस कोरडे आणि चिकट होतात. तसेच, केसांमध्ये मोठ्या प्रमाणात कोंड्याची समस्या निर्माण होते.

शिवाय, पावसात भिजल्याने टाळूमध्ये बॅक्टेरियाचा संसर्ग होण्याचाही धोका असतो. अशा परिस्थितीमध्ये पावसाळ्यात केसांची विशेष काळजी घेण्यासाठी आज आम्ही काही सोप्या टिप्स तुम्हाला सांगणार आहोत.

केसांनुसार शॅंम्पू अन् कंडिशनरची करा निवड

तुमच्या केसांनुसार, योग्य शॅंम्पू अन् कंडिशनरची निवड करणे गरजेचे आहे. पावसाळ्यात आपले केस कोरडे आणि रूक्ष होतात. शिवाय, आर्द्रतेमुळे केसांची चमक कमी होऊ लागते.

त्यामुळे, अशा परिस्थितीमध्ये तुमच्या केसांनुसार योग्य शॅंम्पू आणि कंडिशनरची निवड करा. केसांना शॅंम्पू लावल्यानंतर केसांना कंडिशनर लावा. त्यानंतर, केसांना चांगले हेअर सीरम लावा. यामुळे तुमचे केस फ्रिझी आणि निस्तेज दिसण्यापासून वाचतील.

संसर्गापासून केसांचा करा बचाव

पावसाळ्यात संसर्गापासून केसांचा बचाव करण्यासाठी सर्वात आधी तुमच्या केसांवर आणि टाळूवर नैसर्गिक घटकांचा वापर करायला हवा. जेणेकरून तुमच्या केसांना कोणत्याही प्रकारचा संसर्ग होणार नाही.

खास करून कोरफड, आवळा आणि मेथीसारख्या आयुर्वेदिक घटकांचा वापर केसांवर करण्याला प्राधान्य द्या. कारण, हे आयुर्वेदिक घटक संसर्ग होण्यापासून केसांचा बचाव करतात. तसेच, तुमच्या केसांचा कंगवा कोणासोबतही शेअर करू नका. यामुळे, केसांचा संसर्गापासून बचाव होऊ शकेल.

नारळाचे तेल

पावसाळ्यात तुमच्या केसांना शॅंम्पू करण्यापूर्वी १५ मिनिटे आधी केसांना नारळाचे तेल लावा. या तेलाने केसांचा मसाज केल्याने केसांचे प्री-कंडिशनिंग करण्यास मदत होते. केस धुताना हे खोबरेल तेल तुमच्या केसांद्वारे शोषलेले पाणी कमी करते. त्यामुळे, टाळूचा कोरडेपणा ही कमी होतो.

पावसापासून केसांचे करा संरक्षण

पावसाळ्यात तुमचे केस आणि टाळूचे पावसाच्या पाण्यापासून संरक्षण अवश्य करा. हे फार महत्वाचे आहे. कारण, जर तुमचे केस ओले झाले तर तुमचे केस आणि टाळू व्यवस्थितपणे कोरडे करा. यासाठी मऊ मायक्रोफायबरचा टॉवेल वापरा जेणेकरून तुमच्या केसांमधील पाणी लवकर शोषले जाईल. शिवाय, यामुळे केस तुटण्याचा धोका ही कमी होऊ शकेल.

डिस्क्लेमर : सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. सकाळ माध्यम समूह अशा कोणत्याही गोष्टींची पुष्टी करत नाही. अधिक तपशीलांसाठी तुम्ही तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेऊ शकता.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

तो जगला, तरच देश जगेल

कृषिक्षेत्र आधुनिकतेच्या दिशेनं

जातिनिहाय जनगणनेची अपरिहार्यता

निवडणूक काश्मीरची; परीक्षा केंद्राची

संघ भाजपच्या मदतीला येणार...

SCROLL FOR NEXT