Monsoon Health Care:  Sakal
लाइफस्टाइल

Monsoon Health Care: डबक्यात टाका ऑइल अन् मारा डेंगीच्या अळ्या

Monsoon Health Care: पावसाळा सुरू झाल्यामुळे जलजन्य व कीटकजन्य आजारांची साथ शहरात पसरू नये, म्हणून महापालिकेने उपाययोजना सुरू केल्या आहेत.

सकाळ वृत्तसेवा

Monsoon Health Care: पावसाळा सुरू झाल्यामुळे जलजन्य व कीटकजन्य आजारांची साथ शहरात पसरू नये, म्हणून महापालिकेने उपाययोजना सुरू केल्या आहेत. त्यात नागरिकांनीदेखील सहभाग नोंदवावा, असे आवाहन आरोग्य विभागाने केले आहे. डेंगीचा फैलाव रोखण्यासाठी नागरिकांनी वाहनांचे जळालेले इंजिन ऑइल आपल्या परिसरात साचलेल्या पाण्याच्या डबक्यात टाकावे, जेणे करून डासांच्या अळ्या मरून जातील, असे आरोग्य विभागाचे म्हणणे आहे.

राज्यभरात डेंगीचे रुग्ण वाढत आहेत. त्यामुळे शासनाने दिलेल्या आदेशानुसार, महापालिकेच्या आरोग्य विभागाने उपाययोजना सुरू केल्या आहेत. यासंदर्भात महापालिकेचे आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. पारस मंडलेचा यांनी नागरिकांना महापालिकेच्या मोहिमेत सहभागी होण्याचे आवाहन केले आहे.

मंडलेचा यांनी म्हटले, पावसाळ्याच्या दिवसांत पाणी साचून मोठ्या प्रमाणावर डासांची उत्पत्ती होते. डासांपासून डेंग्यू, मलेरियासह इतर कीटकजन्य आजारांचा प्रादुर्भाव वाढू शकतो. त्यामुळे खड्डे व डबक्यांमधील पाण्यात वाहनांतील जळालेले इंजिन ऑइल टाकावे. हे ऑइल पाण्यावर तरंगते. त्यामुळे डबक्यातील पाण्यात तयार होणाऱ्या डासांच्या अळ्यांना ऑक्सिजन मिळत नाही. ऑक्सिजनअभावी डास गुदमरून मरतात आणि उत्पत्ती चक्र थांबते. त्यामुळे ऑइल फेकून न देता त्याचा वापर करावा, असे आवाहन डॉ. मंडलेचा यांनी केले आहे.

ऑईल देणाऱ्यांचा करणार गौरव

नागरिकांनी जळालेले इंजिन ऑइल महापालिकेच्या मलेरिया पर्यवेक्षकांकडे विनामूल्य द्यावे; तसेच अनेक गॅरेजमालकांकडे जळालेले इंजिन ऑइल असते. त्यांनीदेखील ते विनामूल्य देण्यासाठी मलेरिया औषधी भांडारपाल गोरख तुपे यांच्याशी (९५७९४६३२३९) संपर्क साधावा. १०० लिटरपेक्षा अधिक जळालेले इंजिन ऑइल देणाऱ्यांचा महापालिका गौरव करणार आहे, असे डॉ. मंडलेचा यांनी नमूद केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Live Updates: राज्यातील सर्व मतदारसंघांच्या निकालाचे अपडेट्स एका क्लिकवर

Pune Online Fraud : ‘डिजिटल अरेस्ट’ करून आयटी अभियंत्याला सहा कोटींचा गंडा; सेवानिवृत्तीला काही महिने शिल्लक असताना बॅंक खाते रिकामे

Constitution of India : आणीबाणीतील सर्वच निर्णय रद्द करण्यासारखे नाहीत; सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण

Pollution : बालकांचे भविष्य संकटात! दिल्लीसह उत्तर भारतात राष्ट्रीय प्रदूषण आणीबाणीची स्थिती; राहुल गांधींकडून चिंता व्यक्त

JP Nadda : अराजकाला काँग्रेसकडून चिथावणी; मणिपूर हिंसाचारप्रकरणी भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा आरोप

SCROLL FOR NEXT