Monsoon Makeup Tips esakal
लाइफस्टाइल

Monsoon Makeup Tips : पावसाळ्यात मेकअप करताना काय काळजी घ्यायची? जाणून घ्या ‘या’ सोप्या टिप्स

Monika Lonkar –Kumbhar

Monsoon Makeup Tips : देशातील अनेक भागांमध्ये पावसाने दमदार हजेरी लावली आहे. त्यामुळे, या दिवसांमध्ये आरोग्यासोबतच, त्वचा आणि केसांची खास काळजी घेणे गरजेचे आहे. या दिवसांमध्ये वातावरणात आर्द्रता मोठ्या प्रमाणात असते. या आर्द्रतेमुळे तुमच्या चेहऱ्यावरील मेकअप खराब होण्याची शक्यता असते.

त्यामुळे, पावसाळ्यात मेकअप करताना खास काळजी घेणे आवश्यक आहे. अन्यथा तुमचा चेहऱ्यावरील मेकअप, डोळ्यांजवळील काजळ बिघडण्याची शक्यता असते. अशा परिस्थितीमध्ये आज आम्ही तुम्हाला पावसाळ्यात मेकअप करताना काय काळजी घ्यायची? याच्या काही सोप्या टिप्स सांगणार आहोत. चला तर मग जाणून घेऊयात या टिप्स.

क्रीम बेस्ड उत्पादनांचा वापर करा कमी

जर तुम्ही तुमच्या चेहऱ्याचा मेकअप करण्यासाठी क्रीम बेस प्रॉडक्ट्सचा वापर करत असाल तर पावसाळ्यात या प्रॉडक्ट्सचा वापर कमी करा. या दिवसांमध्ये वातावरणातील आर्द्रतेमुळे या प्रकारच्या उत्पादनांचा वापर हा ब्लेंड करूनच करा. जेणेकरून ते त्वचेवर जास्त पसरणार नाही. क्रीम बेस्ड उत्पादनांचा वापर हा पावडरसह करण्याचा प्रयत्न करा. यामुळे, तुमचा मेकअप जास्त काळ टिकण्यास मदत होईल.

स्वच्छता आहे महत्वाची

पावसाळ्यात जास्त हेव्ही मेकअप करणे शक्यतो टाळा. मेकअप करताना उत्पादनांचा वापर करताना ते स्वच्छ आहेत ना याची काळजी घ्या. तसेच, मेकअपच्या ब्रशची स्वच्छता ठेवा. मेकअप करण्यापूर्वी क्लींजरने तुमचा चेहरा स्वच्छ करा.

कारण, या दिवसांमध्ये आर्द्रतेमुळे चेहऱ्यावर जास्त घाम येऊ शकतो. ज्यामुळे, त्वचेच्या संसर्गाची समस्या देखील उद्भवू शकते, त्यामुळे, चेहऱ्यावर जास्त फाऊंडेशनचा वापर करणे टाळा.  

सेटिंग पावडरचा करा वापर

पावसाळ्यात तुमच्या चेहऱ्यावरील मेकअप जास्त काळ टिकण्यासाठी सेटिंग पावडरचा अवश्य वापर करा. या सेटिंग पावडरमुळे तुमचा मेकअप जास्त काळ टिकण्यास मदत होऊ शकेल. सेटिंग पावडर चेहऱ्यावर लावण्यासाठी मोठ्या ब्रशचा वापर करायला विसरू नका.

डार्क रंगाच्या लिपस्टिकची करा निवड

लिपस्टिकचे विविध रंग वापरण्यावर महिलांचा नेहमीच भर असतो. पावसाळ्यात डार्क रंगाच्या लिपस्टिकचा वापर करणे हा उत्तम पर्याय असू शकतो. यामुळे, तुमचा मेकअप लूक देखील बेस्ट दिसेल. आजकाल मार्केटमध्ये किंवा ऑनलाईन वेबसाईटवर वॉटर प्रूफ लिपस्टिक्स उपलब्ध आहेत. तुम्ही मार्केटमध्ये जाऊन किंवा ऑनलाईन शॉपिंग वेबसाईटवरून डार्क रंगाच्या लिपस्टिकची नक्कीच निवड करू शकता.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ajit Pawar Shirur: महाराष्ट्राच्या राजकारणातील सर्वात मोठी बातमी! अजित पवार बारामती सोडणार, शिरूरमधून लढणार?

Ladki Bahin Yojana Diwali Payment: लाडक्या बहिणींना दिवाळीपूर्वीच ॲडव्हान्समध्ये मिळणार दोन हफ्ते; अधिकाऱ्यांनी सांगितली तारीख

Latest Maharashtra News Updates : मुंबईतील मोहित हाइट्स इमारतीला भीषण आग; अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल

Navratri Fast Recipe: नवरात्रीत उपवासाला बनवा चवदार सिंघाडा पुरी, नोट करा रेसिपी

Munna Yadav Nagpur: नागपूरात पोलिसांना धक्काबुक्की करणाऱ्या भाजपच्या बड्या नेत्यासह मुलांवर गुन्हा

SCROLL FOR NEXT