Monsoon Makeup Tips sakal
लाइफस्टाइल

Monsoon Makeup Tips : पावसाळ्यात सुंदर दिसण्यासाठी 'या' लिपस्टिक शेड्स करा ट्राय! मिळेल परफेक्ट लूक!

सकाळ डिजिटल टीम

जेव्हाही आपण बाहेर जाण्यासाठी तयार होतो, तेव्हा सर्वप्रथम आपण मेकअप करतो. यासाठी आपण आउटफिटनुसार आपला मेकअप लुक तयार करतो. मात्र, लिपस्टिकशिवाय हा मेकअप अपूर्ण आहे. पावसाळ्यात हलका मेकअप करणे जास्त चांगले आहे आणि काही विशेष प्रकारच्या लिपस्टीक तुमच्या मेकअप किटमध्ये ठेवू शकता. आज आम्ही तुम्हाला अशा लिप्स शेड्स बाबत सांगणार आहोत ज्या वापरून तुम्ही पावसाळ्यातही सुंदर दिसाल.

पिंक शेड लिक्विड लिपस्टिक

जर तुम्हाला लिपस्टिकच्या न्यूड शेड्स लावायला आवडत असतील तर त्यासाठी तुम्ही पिंक शेड लिक्विड लिपस्टिक लावू शकता. यामध्ये तुम्हाला लिपस्टिकच्या वेगवेगळ्या शेड्स मिळतील, ज्या तुम्ही कोणत्याही रंगाच्या ड्रेससोबत लावू शकता. लिक्विड लिपस्टिक लावल्यानंतर तुम्हाला कोणतेही ग्लॉस लावण्याची गरज नाही. हे तुम्ही दररोज ओठांवर लावू शकता.

ब्राऊन शेडची लिक्विड लिपस्टिक वापरून पहा

जर तुम्हाला ब्राऊन शेडची लिपस्टिक लावायची असेल तर, त्यासाठी तुम्ही ब्राऊन लिपस्टिकच्या वेगवेगळ्या शेड्स वापरून पाहू शकता. तुम्हाला लिक्विड लिपस्टिकमध्ये खूप चांगले रंग मिळतील, जे ओठांवर लावल्यानंतर चांगले दिसतील. हे मान्सून मेकअप लुकसाठी चांगले दिसेल. हा लिपस्टिक कलर तुम्ही ऑफिसमध्ये लावू शकता. यामुळे तुमचा लूक सुंदर दिसेल.

डार्क कलर लिपस्टिक शेड

तुम्ही तुमच्या ओठांवर डार्क कलरची लिपस्टिक देखील वापरून पाहू शकता. लिपस्टिक लावल्यानंतरही ती चांगली दिसेल. तुम्ही या प्रकारची लिपस्टिक कोणत्याही आउटफिटसोबत ट्राय करू शकता आणि तुमचा लुक परफेक्ट बनवू शकता. यामध्ये तुम्हाला अनेक शेड्स पाहायला मिळतील. याशिवाय लूकही चांगला दिसेल. नाईट पार्टीमध्ये तुम्ही अशा प्रकारची लिपस्टिक ट्राय करू शकता.

Haryana Assembly Election 2024: हरियानात भाजपनं तिसऱ्यांदा रोवला झेंडा! 'या' व्यक्तीमुळं साधली दमदार हॅटट्रिक

Share Market Closing: शेअर बाजाराचे कमबॅक; सेन्सेक्स 81,634 अंकांवर बंद, मिडकॅप निर्देशांकात मोठी वाढ

Nobel Prize 2024 : फिज़िक्समध्ये जॉन जे. हॉपफील्ड आणि जेफ्री ई. हिंटन यांना नोबेल जाहीर; दोघांनी बनवलं अनोखं न्युरल नेटवर्क

Latest Maharashtra News Live Updates : रामराजे निंबाळकर अखेर १४ ऑक्टोबरला राष्ट्रवादीत प्रवेश करणार

Chalisgaon MSRTC Depot : सर्वाधिक उत्पन्न देणाऱ्या चाळीसगाव आगारात नव्या बसगाड्यांची वानवा; 25 वर्षांपासून जुन्याच गाड्यांमधून प्रवाश

SCROLL FOR NEXT